GO MAD (गो मेक अ डिफरन्स)

Submitted by manas on 13 December, 2010 - 02:37

मला माहीती आहे, हा विषय सर्वांना तोंडपाठ झाला असेल पण तरीही वाटल की एकदा उजाळा द्यावा.सघ्या पर्यावरण संरक्षणावर जोरदार चर्चा केल्या जात आहेत.विविध संस्था,मंडळे चर्चासत्रे आयोजित करतात.पण मला वाटते की अशा चर्चा करून,सभा घेऊन काही फार फायदा होणार नाही तर आपण स्वत: आपल्या दैनंदीन व्यवहारात आपण थोडेफार बदल करून पर्यांवरणाचे होणारे नुकसान भरून काढू शकतो............
त्यासंदर्भात एक साध उदाहरण मी आपणासमोर मांडत आहे....
मला सांगा आपल्यापैकी जवळ जवळ सर्वजन ए.टी.एम.कार्ड वापरतो...आपल्या जवळ ए.टी.एम.असल्यामुळे आपण आपल्या जवळ मोठी रक्कम बाळगत नाही कारण आज काल कोप-या-कोप-यावर ए.टी.एम.मशिन बसविण्यात आल्या आहेत. आपण ज्यावेळी ए.टी.एम.मधून पैसे काढतो त्यावेळी शिल्लक रकमेचे विवरणपत्र मिळते त्याचा आपण किती लोक वापर करतो. ते फक्त पाहून तिथल्याच कच-याच्या डब्यात फेकून देतो. त्या कच-याच्या डब्याकडे पाहीले तर तो भरून बाहेर सर्वत्र चिठो-या पसरलेल्या असतात. मग मला सांगा आपण किती कागद वाया घालवतो, तस पहीले तर आपल्याला आपल्या खात्यावरचा बॅलन्स माहीत असतोच आणि जरी माहीत नसेल तर आज काल सर्व बँकांनी मोबाईल सेवा चालू केली आहे. आपण ए.टी.एम.मधून पैसे काढले की पाच मिनिटाच्या आत आपल्याला SMS येतो आपण किती पैसे काढले आणि शिल्लक किती आहेत.
मग मला सांगा आपण डोळे झाकून YES हा पर्याय निवडतो व एक कागद वाया घालवतो.
हे जर टाळता आल तर आपण सुध्दा पर्यावरणाच्या संरक्षनासाठी खारीचा वाटा उचलू शकतो. बघा प्रयत्न करून आणि आपल्या मित्र मंडळींना पण सांगा ..........
......... या बरोबर पुढील पैकी काही छोट्या गोष्टी आपण अमलात आणून पर्यावरण संरक्षणाला हातभार लावू शकतो.......
1.पाणी म्हणजे जीवन,जीवन वाचविण्यासाठी स्वत:पासून,आपल्या घरापासून सुरवात करा.
2.आपल्या घरातील नळातून होणारी पाणी गळती आजच थांबवा,थेंब-थेंब पाणी दिवसभर टपकले तरी महीन्याला किमान 2000 लिटर पाणी वाया जाते.
3.कपडे-भांडी धुण्यासाठी फॉस्फेटरहीत इकोफ्रेंडली डिटर्जंट वापरणे पाणी वाचविण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
4.बाथरूममधील नळ चालू ठेवून दात घासू नये,दाढी करू नये.
5.फळे,भाजी धुण्यासाठी भांड्यात पाणी घ्यावे तेच पाणी नंतर कुंडीतल्या झाडांना टाका.
6.आपल्या जवळ गाडी असल्यास गर्दीत किंवा सिग्नलवर वाहन अडकल्यास इंजिन बंद करा.
7.मोकळ्या हवेत,मोकळ्या रस्त्यावर गाडी चालविताना गाडीतील एअर कंडीशनर बंद ठेवा.निसर्गाच्या सानिध्यात राहून प्रवास करा.
8.महीला वर्गांनी स्वयंपाकाच्या सर्व वस्तू हाताशी ठेवाव्यात,वेळ व गॅसची बचत होते.
9.स्वयंपाकासठी प्रेशर कुकरचा वापर करा,वेळ व गॅसची बचत होते.
10.पाणी आमटीला उकळी आल्यावर गॅस कमी करा.
11.शेगडीवरील भांड्यावर नेहमी झाकण ठेवा.
12.घरी विजेचा वापर जपून करा विजेच्या एका युनिटची बचत म्हणजे दोन युनिटची निर्मिती.
13.बाहेर जाताना पंखे,दिवे व इतर उपकरणे बंद असल्याची खात्री करा.
14.मोफत मिळणा-या सुर्यप्रकाशाचा घरी व कार्यालयात जास्तित जास्त वापर करा.
15.घरी CFL दिवे वापरा.
या विषयावर लिहण्यासारखे अजून खूप काही आहे. मला जे काही थोडफार माहीत होत,मी जे रोजच्या जिवनात अमलात आणतो ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला .....आणखी तुमच्याकडे असणारे मुद्दे मांडा ..........चर्चा घडवून आणूया आपली मते मांडा........
कोणी याही पेक्षा मोठ्या प्रमाणावर कार्य करत असल्यास सांगा काम व मदत करायला आनंद वाटेल......

गुलमोहर: 

good one!! Happy

स्लोगन एकदम आवडली!!
काही करता येण्यासारख्या गोष्टी, ज्या मी करतो.
१] खरेदीला जाताना कापडी बॅग वापरणे
२] बॅटरी ऑपरेटेड गोष्टींचा वापर कमी करणे
३] दिवे, पंखे बंद करणे.
४] ऑफिसमधे/घरी कमीत कमी प्रिंटआउट्स काढणे. एका बाजूलाच प्रिंट झालेले कागद परत वापरणे, प्रिंटरचे सेटींग शक्यतो 'टू साईड प्रिंट' ठेवणे. कुठलेही प्रिंट काढताना शक्य तितके फॉर्मॅटींग करुन कमी पानात मॅटर बसवणे.
५] बाग्,लॉन इ.ला अनावश्यक पाणी घालणे टाळणे.
६] कार वॉशिंग करताना पाईपमधून न घेता पाणी बादलीत घेणे.
७] इलेक्ट्रिकल वस्तू 'स्टँड बाय' मोडवर न ठेवणे.
८] आपल्या कामाच्या किंवा रहायच्या जागी वेस्ट सेग्रिगेशन करणे. जैविक कचरा कंपोस्टींग किंवा व्हर्मिकल्चरला देणे. कागद, प्लास्टीक रिसायकल युनिटला देणे.

मानस आपण खरोखरीच उत्तम लेख लिहीला आहे. त्यातल्या प्रत्येक गोष्टी सहज, सुलभतेने करतायेण्याजोग्या आहेत व ते करताना कमीतकमी त्रास होतो.

http://bolghevda.blogspot.com
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

दारू "नीट्च" प्या...त्यात पाणी टाकून पाणी waste करू नका...:)

sorry sorry...असल्या विनोदासाठी ही योग्य जागा नाही आहे I know...
पण असा विषय वाचला की लोकांच्या कपाळावर लगेच आठ्या पडतात्..."आम्हाला काय या गोष्टी कळत नाही का?" असं मनातल्या मनात लोकं बोलतात तर्...गंभीर विषय थोडा light बनवावा म्हणून हा विनोद..

anyway..अतिशय उत्तम suggestions आहेत तुमची..लोकांनी तुमच्या सूचनांचं पालन करावं अशी आशा करतो...at least मी तरी करेल...

विचार, भावना कौतुकास्पद, स्तुत्य आहेत ..

फक्त, स्वैपाकात फक्त महिलावर्गानीच मॅड व्हायचा मुद्दा पटला नाही .. मॅड व्हायचं तर महिला आणि पुरूष वर्गाने बरोबरीने मॅड व्हायला पाहिजे स्वैपाकात .. गॅस तेव्हढाच खर्च होईल असं धरलं तरी वेळ मात्र नक्की वाचेल!

तेच म्हणणार होते मी पण, पुरुषांनी पण स्वयंपाकाच्या सर्व वस्तू हाताशी ठेवाव्यात की ,वेळ व गॅसची बचत त्यांनी पण करावी Happy

जमल्यास बस वा गाडी कचरा बाहेर अथवा खालि फेकणार्‍या लोकांना थांबवा. सरकार काहिच करत नाही असे नाहि तर आपण त्याना नविन काहि करायला वेळ देत नाहि.

चांगल्या सूचना.

अनेकांना आपल्या घराच्या / ऑफिसच्या/ दुकानाच्या गच्च्या, फरशा, घरासमोरची मोकळी जागा/ पायर्‍या इत्यादी धुवायची सवय असते. एकतर त्यात बर्‍याच पाण्याचा अपव्यय होतो आणि धुळीचे साम्राज्य असल्यावर अशा उपायांनी होणारी स्वच्छता अगदी तात्पुरत्या स्वरूपाची असते. शक्यतो अशा स्वच्छतेसाठी धुण्याचे, डिटर्जंट असलेले, वापरलेले पाणी वापरावे.

झाडांच्या मुळाशी जवळ जर वापरलेल्या प्लास्टिक बाटल्यांना छिद्रे पाडून त्यात पाणी भरून त्या खोचून ठेवल्या तर थेंबाथेंबाने झाडाच्या मुळांना पाणीपुरवठा होत राहतो. अशा प्रकारात पाण्याची बचत होते. झाडांना पाणी घालताना अनेकजण त्यांची पाने अक्षरशः धुवून काढतात. रोज असे करण्याची काहीही गरज नाही. ओल्या स्पंजनेही तुम्ही हे काम करू शकता.

डाळी, तांदूळ इत्यादी प्रेशर कुकरमध्ये शिजवायचे पदार्थ जर अगोदर थोडा वेळ कोमट पाण्यात भिजवून ठेवून मग शिजवले तर कमी वेळात शिजतात व इंधनाची बचत होते.

फोन चा वापर फक्त आवश्यक गोष्टी बोल्ण्यासाठी करतो, गप्पा मारायला personally भेटायला जातो Happy

मैत्रेयी व सशलशी सहमत. स्वयंपाकघरात केवळ महिलावर्गानेच इंधनबचत करावी काय?

>>महीला वर्गांनी स्वयंपाकाच्या सर्व वस्तू
या वाक्यातून महिलावर्ग वजा करावा ही विनंती.

>>.फळे,भाजी धुण्यासाठी भांड्यात पाणी घ्यावे तेच पाणी नंतर कुंडीतल्या झाडांना टाका.
हे सरसकट योग्य नव्हे. फळे व भाज्या वाहत्या पाण्याखाली धुणे जास्त आरोग्यकारक आहे.

इतर सगळे मुद्दे व आगाऊ यांचे मुद्दे पटले.

दुधाच्या, तेलाच्या इ. पिशव्या कापताना प्लॅस्टिकचा तुकडा कापून वेगळा करू नका.

तो पिशवीबरोबरच राहू दे.(कचर्‍याचे वर्गीकरण करणार्‍या सेवकाकडून मिळालेली सूचना)

आपण कुकरच्या शिट्ट्या करतो त्यापेक्षा शिट्टी होतेय असं वाटलं की लगेच कुकर बंद करावा त्यामुळे दडपलेली वाफ आतच राहते आणि पदार्थ शिजतो. शिट्टी होऊ दिली तर उलट उपयुक्त वाफ दवडली जाते.

मृदुला ने म्हणल्याप्रमाणे तांदुळ आणि डाल अगोदर नुसत्या साध्या पाण्यात जरी भिजवून ठेवले तरीही पटकन शिजतात... शिजायला कठिण पदार्थात थोडं गोडंतेल घातलं तर कमी शिट्ट्यात पदार्थ उत्तम शिजतो.

बाकी क्या खोलित असू फक्त त्याच खोलितला दिवा/टिव्ही/पंखा वापरणे बाकी बंद ठेवणे इष्ट... फ्रिजातले पदार्थ गरम करायचे असतील तर रूम टेम्प्रेचर ला आल्यावर मगंच करावेत, गॅस बचत होते... पदार्थाची सर्व तयारी हाताशी ठेऊन मगच गॅस सुरू करून फोडण्या घालाव्यात, उगाच गॅस पेटवून फोडणिच्या तयारीसाठी नाचानाच करू नये.

सर्वांना खुप-खुप धन्यावाद,
लेख वाचल्याबद्दल व प्रतिसादाबद्दल...तसेच केलेल्या सुचनांबद्दलही.........