कुणी मदत करेल का मदत?????????

Submitted by शोभा१ on 9 December, 2010 - 02:06

समस्त मा. बो.कर नमस्कार! जय श्रीराम !
आपण बहुतेक सर्व जण दररोज पेपर वाचत असतो. त्यातील काही बातम्या वाचून आपण अस्वस्थ होतो.
कारण मनात असूनही काही वेळा आपण मदत करु शकत नाही. अशीच एक बातमी मी २७.११.२०१० च्या
सकाळ वर्तमानपत्रात (पुणे टुडे)वाचली आणि मी पण अस्वस्थ झाले. माझ्या एव्हढ्याश्या मदतीने काय होणार? असे म्हणून मी स्वस्थ बसले. पण मा.बो. वर आल्यावर मला आनंद झाला. कारण माझ्या लक्षात आले आपण एकट्या नाही आहोत. पूर्ण मा.बो. परिवार आपल्याबरोबर आहे. प्रत्येकाने थोडी थोडी मदत केली तरी, सर्वांची मिळून मोठी मदत होऊ शकते. आणि म्हणून बातमीतील गोषवारा येथे देत आहे.
<सकाळ : पुणे टुडे : २७.१०.१०
"दोन मुलांच्या सांभाळासाठी त्यांचा रोजच तुटतो जीव.''
असाध्य रोगाने पीडित मुलांच्या आईबापाची व्यथा.
सोमेश्वनगर, ता. २६:
"पोरांसाठी तीस वर्सात पंधरा लाख रुपये खर्च केल्यात. सगळा पैसा उधळला. कुणी मदत करिना आन सरकारबी कासरा लागून घ्यायना. तहसीलदाराकडं येढं घालून वाटतय जीव द्यावा." चौधरवाडी (ता. बारामती) येथील बाबूराव रघुनाथ पवार व अंबिका बाबूराव पवार या वृद्ध दांपत्याची ही व्यथा.
या वृद्ध दांपत्याची दोन धडधाकट मुले राजेंद्र (वय ४०) व प्रकाश (वय ३७)ही वयाच्या १५व्या वर्षापासून असाध्य आजाराने लुळीपांगळी झाली आहेत. प्रकाश हा विसाव्या वर्षापर्यंत काठी घेऊन चालू शकत होता. त्यामुळे त्याचे लग्न करून दिले. त्याला ८ व ६ वर्षाच्या दोन मुलीही आहेत. प्रकाशच्या बायकोचे अपघाती निधन झाल्याने त्या पोरक्या मुलींचीही जबाबदारी या वृद्ध दांपत्यावरच आहे. राजेंद्र हा पूर्ण गोळाच झाला आहे. साठाव्या वर्षीही आई मुलांचे डोके मांडीवर घेऊन घास भरवते. वाटीने पाणी पाजते. औषधे तर नेहमीचीच. सगळे विधी जागेवरच होतात. एकाला जागेवरून हलविण्यासाठीसुद्धा दोघांची गरज असते. हातात पैसा नसणे, सरकारी मदतीस विलंब, आणि ही सर्व अवघड परिस्थिती यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. तरी ज्यांना मदत करणे शक्य असेल त्यानी खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क करावा.
बाबूराव रघुनाथ पवार : ९७६५६११५०९ , सुरेश पवार : ९७६५२८०५६९

गुलमोहर: 

समस्त मा.बो.कर नमस्कर. जय श्री राम !
लोकहो माझा लेख कोणी वाचलाच नाही का? का तो अयोग्य आहे. जरा मला कळेल का? तुम्ही काहीच प्रतिक्रिया न दिल्यामुळे मी संभ्रमात आहे. मी तर गटगवाल्यांना विनंती करणार होती, की तुम्ही गटगला भेटल्यावर सर्वजण मिळून काही मदत कराल का?
काही चुकले असल्यास क्षमस्व. प्रतिसादांच्या प्रतिक्षेत आहे.

आपला लेख - बातमी वाचली. मन हेलावणारी आहे त्यात शंका नाही. मी त्या दांपत्यांना फोन करुन मदत देइन. आपण ही बातमी दिली त्या बद्दल आपले धन्यवाद.

माझ्या मते तरी आपले काही चुकले नाही - बाकी संपादक मंडळावर व संकेतस्थळाचे नियम हे संपादक मंडळ ठरवतील.

लोभ आहेच

http://rashtravrat.blogspot.com

शोभा लेख इथे टाकण्यात काहिच चूकले नाही. पण या दांपत्याला कायम स्वरुपी मदतीची आवश्यकता आहे, आणि त्यासाठी योग्य त्या संस्थेकडे हि माहिती पोहोचवायला हवी. वैयक्तीत स्वरुपात केलेली मदत त्यांच्या गरजेच्या मानाने फारच तोकडी पडेल.

दिनेशदा, प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद! अशा योग्य त्या संस्थेला आपण हि माहिती पोहोचवाल का?
तसेच वैयक्तीत स्वरुपात केलेली मदत त्यांच्या गरजेच्या मानाने फारच तोकडी पडेल.>>>>माझे म्हणणे असे होते की सर्वांनी एकत्र येऊन जर मदत केली तर त्यांना थोडी फार तरी मदत होईल. (उदा.: गटगला जमणार्‍यांनी ) (थेंबें थेंबें तळे साचे) त्या दांपत्यासाठी आत्ता १००/- रूपयेही जास्त आहेत.

खरंच मन हेलावुन गेले या गोष्टीने पण आपण साधारणपणे केलेली मदत अगदीच तोडकी होईल
मागे त्या कलावतीला एका पाठक नामक व्यक्तीने मोठी मदत केली आहे त्यांचे संस्थेचे नाव मला माहीत नाही कोणास माहीत असल्यास विचारणे

माझे म्हणणे असे होते की सर्वांनी एकत्र येऊन जर मदत केली तर त्यांना थोडी फार तरी मदत होईल>>>> मी होईल तेवढी मदत नक्कीच करेन. कधी, कुठे, कसं कळंव...

मी पण शक्य ती मदत करेन फक्त कसे ते कळव मला विपुत. आणि खरच एखाद्या संस्थेकडून त्यांना कायम मदत मिळेल अशी व्यवस्था करावी लागेल. पहीला ते खरोखर गरजू आहेत का ह्याची पडताळणी पण करायला हवी कारण हल्ली असेच मदतीच्या नावाने भुरटे चोरही असतात. ते असे नसतील पण जागरुक राहण गरजेच आहे.

स्मिहा, जागू धन्स.
<सकाळ : पुणे टुडे : २७.१०.१०च्या पेपरात हि बातमी आली होती. म्हणजे नक्कीच खरी असणार असे वाटते.