प्रवाही राहा....

Submitted by bhatkyajoshi on 7 December, 2010 - 08:04

या दिवाळी ला मी Switzerland मध्ये होतो...घरापासून सणादिवशी लांब रहायची ही पहिलीच वेळ...तसे देखील मी गणपती, दसरा इ. दिवशी सगळ्यांना खूप miss करत होतो..पण दिवाळीची गोष्ट वेगळीच असते...
(प्र चि - १ - झुरीच रेल्वे स्टेशन )
DSCN4734.JPG

४ नोव्हेंबर २०१० - सकाळ पासून हिंडतो आहे..झुरिक वरून बर्न मार्गे जीनिव्हाला येत होतो..वाटेत १ सुंदर तलाव दिसला..
(प्र चि - २ - लेक दि जिनिव्हा Montreux बाजू )
DSCN4862.JPG

Laussane, Vevey Nyon,Montreux आणि Geneva ही शहरे या तलावाच्या काठाशी आहेत..
(प्र चि - ३ - लेक दि जिनिव्हा Vevey बाजू )
DSCN4865.JPG

सूर्य मावळतीला निघाला होता...रंगांची सुंदर उधळण सुरु होती...मी Laussane मध्ये तलावाच्या काठी बसलो होतो..मस्त कारंजे सुरु होते..मनात विचारांचे आणि बाहेर पाण्याचे...मी द्विधा मनस्थितीत होतो...
एकाच वेळेला मला खूप आनंद होत होता आणि कुठेतरी खूप वाईट पण वाटत होते...माझ्याच मनाची समजूत काढत होतो मी..
(प्र चि - ४ - लेक दि जिनिव्हा Laussane बाजू )
DSCN5000.JPG

कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
(प्र चि - ५ - लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश )
DSCN5001.JPG

कधी आकाशाची निळाई,
कधी तीव्र उष्ण दाहकता,
कधी अल्लड, कधी अवखळ,
कधी नीरव, शुभ्र शांतता,
खदखदू नको, खळखळून वाहा,
साचू नको..प्रवाही राहा..
(प्र चि - ६ - लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश १)
DSCN5013.JPG

काळजीने वेढले, हळवे तुझे मन..
कुठे तरी चोर कप्प्यात, वेचलेले नाजूक क्षण...
आठवणींची ही शिदोरी,हळूच उलगडून पहा..
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
(प्र चि - ७ - लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश २)
DSCN5002.JPG

दु:ख एकटा झेलू शकतो..
सुख एकट्याला सोसवत नाही...
ध्यासपंथी पावलांना, सुख दु:ख सम राही..
स्थितप्रज्ञता प्रकाशते, वेध स्वप्नांचा लागता...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...
(प्र चि - ८ - लेक दि जिनिव्हा संधिप्रकाश ३)
DSCN5021.JPG
--------------------------------------------------------------------------------------------------------------------

(खरे तर मला प्रकाशचित्रे किंवा कविता या दोन्ही पैकी कशात टाकावे हे ठरविताना खूप गोंधळ होत होता...जाणकार माबो करांनी मार्गदर्शन करावे...थोडासा वेगळा प्रयत्न आहे..प्रकाशचित्र बरोबर कवितेच्या ओळी आहेत..तुमचे अभिप्राय वाचायला नक्कीच आवडतील...:) Happy

गुलमोहर: 

कारंज्याचे प्रचि आणि

कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...

या ओळी फार आवडल्या... Happy

मस्त प्रचि!!!

कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...>>>>>खुप आवडलं Happy

अप्रतिम, अश्याच सांजप्रकाशात हि कविता नक्कीच ऐकायला आवडेल. Happy

प्रकाशचित्रे अन लिहिलेल्या ओळी अप्रतिम...

दु:ख एकटा झेलू शकतो..
सुख एकट्याला सोसवत नाही...
ध्यासपंथी पावलांना, सुख दु:ख सम राही..

>> मस्त लिहिलं आहेस. Happy

मस्त....

मस्त फोटो. या परिसरात भटक भटक भटकलो आहे. लेक झुरिक पण मस्त आहे. त्यावेळी डिजिटल कॅमेरा नव्हता, पण मनात सगळे फोटो आहेत अजून.

फोटो छानच तरीपण, शेवटचे सहा फोटो अगदी खासच.. Happy
आणी कवितेच्या ओळी,
कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा >>>> अफलातून.. Happy लगे रहो..

अजो, प्रचि सुंदरच, कविताही मस्तच.
<<<दु:ख एकटा झेलू शकतो..
सुख एकट्याला सोसवत नाही...
ध्यासपंथी पावलांना, सुख दु:ख सम राही..
स्थितप्रज्ञता प्रकाशते, वेध स्वप्नांचा लागता...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा... >>>आवडली......

आणि वर्णनही अप्रतिम.........
<<<मस्त कारंजे सुरु होते..मनात विचारांचे आणि बाहेर पाण्याचे...मी द्विधा मनस्थितीत होतो...
एकाच वेळेला मला खूप आनंद होत होता आणि कुठेतरी खूप वाईट पण वाटत होते...माझ्याच मनाची समजूत काढत होतो मी..

छान.

तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचून खूप बरे वाटले... Happy Happy
परदेशी एकट्याने प्रवास करताना खूप एकाकीपणा जाणवला...विशेषत: Switzerland मध्ये खूपच...ही कविता त्या कारंज्यासमोरच सुचली...
मी भीत भीतच प्रकाशचित्रे आणि कविता टाकायचा प्रयत्न केला...
तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.... Happy Happy Happy

कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...

या ओळी फार आवडल्या...
माझा एक मित्र world tour ला गेला आहे म्हणजे कामासाटी फिरायला नाहि. मी त्याला खुप miss करते.

कारंज्या समोर बसलो आहे...दिवाळी आहे उद्या...
पाणी सांगत आहे...साचू नको..प्रवाही राहा...>>>>>
कवितेच्या ओळी फार आवड्ल्या