मज्जाखेळ[३-५]: वाफेचे पाणी

Submitted by सावली on 5 December, 2010 - 21:43

जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तेव्हा पाऊस कसा पडतो असा एक प्रश्न घरी विचारला जातो. गेले अनेक दिवस मी "वाफ वर जाते, मग थंड झाली कि पाऊस पडतो" वगरे थोडक्यात सांगत होते.
परवा चहा प्यायला बसले आणि परत हाच प्रश्न आला. त्यावेळी दाखवलेला हा पिटुकला प्रयोग.

वयोगट: [३-५]

साहित्य:
कुठलीही गरम वाफाळणारी वस्तू , चहा, दुध, वरण काहीही.
एक थंड स्टीलचा पेला / चमचा

कृती:
-चहा कसा गरम आहे, त्यातून कशा वाफा येत आहेत ते सांगा.
-मग स्टीलचा पेला कसा थंड आहे ते हात लाऊन दाखवा
-आता पेला वाफेवर १ ते २ मिनिट पकडा किंवा झाकून ठेवला तरी चालेल.
-पेल्यावर जमणार्‍या वाफेचे पाण्याच्या थेंबात होणारे रुपांतर दाखवून मग नीट स्पष्टीकरण देता येईल.

काळजी:
गरम चहा/ दुधात बाळ हात घालणार नाही याची काळजी घ्यालच Happy

मज्जाखेळ मालिकेबद्दल अधिक माहिती साठी इथे बघा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यासाठी प्लॅष्टिकचा पारदर्शक ग्लास घेतला तर वाफ जमा होताना दिसेल. मिनरल वॉटरची बाटली घेऊन तिचा झाकणाकडचा भाग कापून वापरली, तरी चालेल. (ती पकडताना एका फडक्यात पकडायची, म्हणजे हात भाजत नाही.)
इडल्या वगैरे करताना, कूकरमधून वाफ यायला सुरवात झाली, कि हा प्रयोग करता येईल.

मस्त आयडिया आहे!
बी रुजत घालून कोंब येताना दाखवणे, दुधाचे दही कसे होते ते दाखवणे, शिळ्या पोळी किंवा ब्रेडच्या तुकड्यावर बुरशी येते ती भिंगाखाली दाखवणे ( लहान असताना फार मजा वाटली होती), एखादे लांब दांड्याचे फूल रंगीत पाण्यात ठेऊन, देठात तो रंग कसा चढतो हे पहाणे, हे ही करता येईल.

थोडे पुढे जाऊन, थोड्या मोठ्या मुलाना, २ मोठे चेंडु घेऊन, एका बाजूने बॅटरीने प्रकाश टाकून, दिवस्-रात्र, ग्रहणे कशी होतात हे ही दाखवता येईल.
आता हे प्रयोग वेगवेगळे करुन वेगवेगळ्या धाग्यावर टाकायचा उत्साह ज्यांच्याकडे असेल, त्यानी कृपया करा!! Happy

अर्रे सही ! मस्त धागा आहे हा.
सावली, वाफेचा खेळ आवडला.:)
दोन रंग एकमेकात मिसळून नवीन रंग कसा तयार होतो, हे पहायला पण मुलांना मज्जा येते. माझ्या लेकाने जेव्हा लाल आणि पिवळा मिसळून नारिंगी रंग तयार केला, तेव्हा तो दिवसभर युफोरियात होता.....मी बध कस्सली जादू केलीये म्हणून !

धन्यवाद दिनेशदा, जिप्सि.

अश्विनी, रुणुझुणू छान कल्पना. Happy इथे खाली लिहिल्याप्रमाणे नविन धागे काढाल का प्लिज? मग शोधायला सोपे जाईल.
http://www.maayboli.com/node/21686