"मनमोर" : माझा पहीला कविता संग्रह प्रकाशन : ई-टीव्ही चित्रफीत

Submitted by Girish Kulkarni on 2 December, 2010 - 16:46

मित्रांनो : शुभप्रभात !

माझ्या पहील्या वहील्या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ आज कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांच्या हस्ते व ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक श्री राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. "मनमोर"च्या जडणघडणीत मायबोली अन इथल्या सगळ्या मित्रांचा मोलाचा वाटा आहे अन त्या ऋणात मी सदैव राहीनच !!!

प्रकाशन स्थळ :

साऊथ हॉल , मेफेअर बॅंक्वेटस,
डॉ. अ‍ॅनी बेसंट रोड
वरळी ,मुंबई

आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे !!!

सस्नेह

गिरीश कुलकर्णी

दिनांक : ४/१२/२०१०
काही क्षणचित्रे :

प्रकाशन स्थळ :मेफेअर - साऊथ हॉल , वरळी , मुंबई

P1070943.JPGसन्माननीय पाहुणे : श्री मंगेश पाडगावकर , श्री राजदत्त , श्री बाजपेयी ( निवृत्त चेअरमन सेबी व एलआयसी) , श्री भीमराव पांचाळे व श्री अरुण म्हात्रे

All-A.jpg प्रकाशन समारंभाला जमलेली मित्रमंडळी व आमंत्रित श्रोतेगण :

Audience-2.jpgAidience-3.jpg"मनमोर" प्रकाशित करतांना श्री मंगेश पाडगावकर व इतर मान्यवर

Prakashan-4.jpgLaunch-All-1.jpg

धन्यवाद !

सस्नेह

गिरीश

दिनांक २२ डिसेंबर २०१०
पुस्तक प्रकाशन सोहोळ्याची बातमी ई-टीव्हीने उत्तमरीत्या कव्हर केलीय त्याची चित्रफीत नुकतीच युट्युबवर अपलोड केलीय त्याची लिंक इथे देतोय. धन्यवाद !

http://www.youtube.com/watch?v=oAzYItGNaBw

चिअर्स !!!

गिरीश कुलकर्णी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या मित्रांचे खुप खुप आभार !!!

कार्यक्रम नेटका पार पडला. विशाल्,कौतुक, निनाद्,भाऊ या मायबोलीकर मित्रांच्या उपस्थितीने बहार आली !!!

तुर्तास एव्हढेच !

सस्नेह

गिरीश

हार्दिक अभिनंदन गिरिशराव IT च्या युगात ही आगळीवेगळी वाट चोखाळणारे तुम्हीच Happy
खूप अभिमान वाटला वाचून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

पुनश्च धन्यवाद !!! Happy

नंदन : अ‍ॅडमिनला हा धागा इतरत्र ( चालु घडामोडी ..)हलवायचा असल्यास हरकत नाही. मी प्रयत्न केला पण जमले नाही .

आपल्या काव्यप्रतिभेचे चांदणे सदैव असेच चमकत राहो.

पुनश्च अभिनंदन !!!

मनमोर हातात घेउन येणार्‍या पोष्टमेनची वाट पाहतोय. Happy

मनःपुर्वक अभिनंदन, गिरिशजी.

समारंभ छोटेखानी पण रुबाबात झालेला दिसतोय.

कविता संग्रहाचा दुवा मिळेल का?
म्हणजे आस्व्वाद घेता येईल.

गिरीशजी

मनापासून शुभेच्छा आपल्याला.. हा टप्पा गाठतांना दिग्गज कवीची आणि एका प्रतिभावंत सिनेकर्मीची उपस्थिती लाभली याबद्दल अभिनंदन...!!

इतक्या उशिरा हा धागा पाहील्याबद्दल मनापासून क्षमा मागतो

अभिनंदन गिरीशजी!
.थोडं आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो समारंभाला.
असो.कधीतरी प्रत्यक्ष भेटायला आवडेल.

कर्यक्रम मिस झाल्याची हुरहुर नक्कीच लागून राहिली आहे. कारण त्या दिवशी राजदत्त यांच्या हातून माझ्या अजून एक मित्राच्या "तपस्या" सिरियल चे निर्माते एकनाथ सातपूरकर यांच्या त्याच डी व्ही डीचे प्रकाशन होते मुंबईला ज्यासाठी नाशिकहून अनेक जण गेले होते त्यात मीही येणार होतो. पण नाही जमले. असो. फोटो छान आलेत. कर्यक्रम छानच झाला असणार. कौतुक आणि विशाल नशीबवान आहेत. Happy

Pages