स्त्री-पुरुष समानता आणि स्त्री-पुरुष कायद्यातील विषमता

Submitted by निमिष_सोनार on 2 December, 2010 - 05:25

भारत हा मजबूत कुटुंबव्यवस्था आणि विविध प्रकारचे नातेसंबंध यामुळे ओळखला जातो.
तथाकथित पाश्चिमात्त्य संस्कृतीमुळे आधीच काही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होत आहे.
त्यात वेगवेगळे कायदे करून सरकार किंवा न्यायालय आणखी ते नातेसंबंध बिघडविण्यात हातभार लावत आहे.

***भाग १ : मुलगा आणि मुलगी या नात्यातल्या "मुलगी" कडून असणारे कायदे: ***

पारंपारीक प्रथेनुसार वडील आपल्या मुलाला शिक्षण देवून मोठे करतात आणि मोठेपणी मुलगा त्यांना सांभाळतो.
मुलगा मुलगी समानता यामुळे मुलीलाही मुलाच्याच तोडीचे शिक्षण आज पालक देतात.
मुलीचे लग्न करतांना हुंडा मिळूनही मुलगी नोकरी करते आणि तो पगार सासू-सासऱ्यांना ती देते.
किंवा आजकाल त्याला हुंडा न म्हणता आम्ही स्वखुशीने देतो से म्हटले जाते.
आणि सरकार इकडे कायदा करतं की-सासऱ्याच्या संपत्तीवर सूनेचा हक्क नाही.
असे कसे काय बुवा?
मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो?
तो मग तीने आई-वडीलांना दिला पाहिजे.
मुलगा मुलगी समानता आली असे वाटत असतांनाच स्त्रीधार्जिण्या कायद्यांमुळे अमाप फायदा फक्त स्त्रीलाच होतो आहे.
मुलगा मुलगी समानतेच्या मी विरोधात नाही. कुणी नसावं सुद्धा.
पण मग जर समानता आहे, तर विशिष्ट कायदे मात्र स्त्रीयांनाच फायदेशीर का?
मग स्त्रीयांना प्रत्येक ठिकाणी आरक्षण कशाला हवे?
मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही.
आणि संपत्ती मध्ये काय काय मोडतं हे कायदा स्पष्ट करेल का?
वडीलांचे पेन्शन ही सुद्धा संपत्ती मानली जाते का?
वडिलांचे रिटायर झाल्यावरचे पैसे ही सुद्ध वडिलांची संपत्ती असते का?
याबाबत कायदा काय सांगतो?
मुळात सरकार अश्या प्रकारचे कायदे जेव्हा करतं तेव्हा घरा घरांत जावून सर्वेक्षण करतं का?
आता मुलीचा सुद्धा वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा असतो असा कायदा आहे.
ती संपत्ती मुलीला मिळाली म्हणजे अर्थातच जावयाला आपोआपच मिळाली.
इकडे सून आणि मुलगा त्या सासू-सासऱ्यांचं सगळ करणार (जे क्रमप्राप्त आणि योग्यच आहे याबद्दल दुमत नाही)
पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय?
मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का?
की त्या सूनेला ते तीच्या माहेरी पाठवून देणार?
आणखी एक कायदा असा आहे की मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे.
म्हणजे ती संपत्ती पुन्हा वडीलांकडून "मुलीला" आणि पर्यायाने "जावयाला" जाणार.
सगळा "गो गो गो गोलमाल" आहे.
अस कसे काय?
कुणी यावर एक शक्कल शोधून काढील की जो मुलगा आहे तो कुणाचा न कुणाचा जावई सुद्धा असतोच की.
आणि जी मुलगी आहे ती कुणाची न कुणाची सून आहेच की.
होय हे बरोबर आहेच.
पण, मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही!
हे योग्य नाही.
आजकाल म्हणतात की, आजकालची मुलं मोठी झाल्यावर आई- वडीलांना सांभाळत नाहीत.
वृद्धाश्रमात पाठवतात वगैरे.
आता हे जे "आजकालचे मुलं" आहेत ती ज्यांची जावई आहेत ते वृद्ध जोडपे मात्र त्या जावयाचे कौतुक करतात.
"जावयाचे आई-वडील जावयाजवळ राहात नाहीत" याचे कारण ते खालीलप्रमाणे देतात:
"त्या जावयाची पत्नी (म्हणजे मुलगी)चांगली आहे हो,पण तीच्या सासू सासऱ्यांचाच स्वभाव खडूस आहे"
म्हणजे प्रत्येक मुलगा आणि सून एकाचवेळेस चांगले आणि वाईट असतो.
कसे काय?
सगळे सापेक्ष असते.
पण कायद्यांमुळे कुणा एकाच्या पारड्यात गरज नसतांना खुप काही येते आणि ज्याला खरोखरी गरज आहे त्याला काहीही मिळत नाही.

***भाग २ : लग्न संस्थेतले पती अणि पत्नी या नात्यामध्ये "पत्नी" कडून असलेले कायदे ***

पती-पत्नी च्या नात्यांत ही तसेच.
बहुतेक घटस्फोटासंदर्भातले कायदे हे स्त्री कडूनच आहेत.
जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
पत्नीही जर कमावती असेल तर पोटगीची गरज नाही आणि फक्त पत्नी कमावती असेल तर पत्नीने पतीला पोटगी द्यायला हवी.
पती पत्नी यांच्या एकमेकांतील मानसिक छळ हा प्रकारही तसाच आहे. तो कायदा सुद्धा स्त्री कडूनच आहे.
पत्नी मानसीक छळ करत असेल तर त्या संदर्भात कायदा का नाही?
मुलगा आणि मुलगी समान आहेत ना!
स्त्री तर उलट मानसिक दॄष्टया जास्त सक्षम असते.
बहुतांश हार्ट एटॅक पुरुषांनाच येतात.
तरीही फक्त पुरुषच स्त्रीचा मानसिक छळ करतो असे कसे?
निदान कायदा तरी असेच सांगतो.
विविध पॉलिसी काढण्यासाठी सुद्धा पुरुषांवर स्त्रीयांकडून दबाव आणला जातो, असे मी मध्यंतरी वाचले होते तसेच आजकाल पॉलिसीच्या जाहिराती सुद्धा अशाच बनत आहेत, जेणेकरून पत्नी व मुले यांच्या दृष्टीकोनातून वडील म्हणजे कर्ता पुरुष हा मरेपर्यंत पैसे कमावणारी न थकणारी आनी मेल्यानंतरही पैसे देणारी एक मशीन आहे.

***भाग 3 : लिव्ह ईन रिलेशनशीप मधील पुरुष आणि स्त्री या नात्यामध्ये "स्त्री" कडून असलेले कायदे ***

आता तर यावर कडी म्हणजे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये मजा दोघेही मारणार आणि सोडून जातांना मुलगा मुलीला पोटगीचे पैसे देईल कारण ती त्याच्या पत्नीच्या दर्जाची आहे? असे कसे?
मला तरी या सगळ्या कायद्यांत एकवाक्यता दिसत नाही.
सगळा सावळा गोंधळ आहे.
आपल्यासारख्या सामान्य माणसाला तर हा सगळा अगम्य प्रकार वाटतो.
आपल्याला काय वाटते?
कुणी जाणकार सांगेल काय?

गुलमोहर: 

"मग सुनेचा पगार सासू-सासऱ्यांना कसा चालतो?": सुनेने आपल्या (अख्ख्या) पगाराचे काय करावे हे कोणता कायदा सांगतो? ती तो सासरी देईल, नवर्‍याला देईल, माहेरी देईल किंवा स्वत:साठी वापरेल. आणि यातले सगळेच कुठे ना कुठे होते. तिच्या पगारावर हक्क तिचाच असतो. अन्य कुणाचा कसा? आपल्या मुलांनी त्यांचा पगार आपल्याला द्यावा म्हणून आम्ही त्यांना शिक्षण दिले असे म्हणणारे पालक अजून आहेत का?
मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे. : अलीकडे आलेल्या ज्येष्ठ नागरिक कायद्यात मात्यापित्यांच्या सांभाळाची जबाबदारी फ़क्त मुलावर टाकलेली नाही. तिथे चाइल्ड आणि रिलेटिव्ह असा उल्लेख आहे, यात मुलगी, जावई पण आले.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. तसे होत नाही. - हे ठामपणे कसे काय म्हणता? माझ्या पाहण्यात अनेक वृद्ध जोडपी आहेत, ज्यांना फ़क्त मुलीच आहेत, आणि त्यातले कोणी ना कोणी त्यांची काळजी घेतात. आईवडिलांनाच मुलीकडे जाऊन राहणे प्रशस्त वाटत नाही त्याला कायदा करायचा का?

आता मुलीचा सुद्धा वडीलांच्या संपत्तीत अर्धा वाटा असतो असा कायदा आहे. ती संपत्ती मुलीला मिळाली म्हणजे अर्थातच जावयाला आपोआपच मिळाली. : पुन्हा याचा कायद्याशी काही संबंध नाही. आपल्याला मिळालेल्या संपत्तीचा स्वत:च्या हयातीत कसा वापर करायचा ते ती स्त्रीच ठरवेल. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलच सर्व वारसांना ती मिळावी असा कायदा आहे. पेन्शन, स्वत: केलेली बचत, इ. आई वडिल स्वत:च्या मर्जीप्रमाणे वाटू शकतात.
इकडे सून आणि मुलगा त्या सासू-सासऱ्यांचं सगळ करणार (जे क्रमप्राप्त आणि योग्यच आहे याबद्दल दुमत नाही) पण सूनेला संपत्तीत वाटा नाही असे कसे काय? : मुलीला मिळालेली संपत्ती जावयाला आपसुक मिळाली असे जर वाटते तर मुलाला मिळालेली संपत्ती सुनेला आपसुक मिळाली असे का नाही वाटत?

मग मुलाचा अपघाती म्रूत्यू झाल्यास सुनेला मग सासऱ्याचा संपत्तीत काहीच मिळणार नाही असे समजायचे का? की त्या सूनेला ते तीच्या माहेरी पाठवून देणार?
आणखी एक कायदा असा आहे की मुलाच्या संपत्तीवर वडीलांचा हक्क आहे.
म्हणजे ती संपत्ती पुन्हा वडीलांकडून "मुलीला" आणि पर्यायाने "जावयाला" जाणार. :
याची काळजी त्या मुलाने घ्यायला हवी. आपल्या पीएफ़ , इंश्युरंस अन्य गुंतवणुकीचे नॉमिनेशन पत्नीच्या नावे केले व मृत्यूपत्र केले तर ते सगळे तिलाच मिळणार. वडिलांना किंवा अन्य कुणाला नाही. जर नॉमिनेशन नसेल तर मात्र कायद्याप्रमाणे सगळ्या वारसदारांचा हक्क येतो.

आजकाल म्हणतात की, आजकालची मुलं मोठी झाल्यावर आई- वडीलांना सांभाळत नाहीत. वृद्धाश्रमात पाठवतात वगैरे. आता हे जे "आजकालचे मुलं" आहेत ती ज्यांची जावई आहेत ते वृद्ध जोडपे मात्र त्या जावयाचे कौतुक करतात. "जावयाचे आई-वडील जावयाजवळ राहात नाहीत" याचे कारण ते खालीलप्रमाणे देतात:
"त्या जावयाची पत्नी (म्हणजे मुलगी)चांगली आहे हो,पण तीच्या सासू सासऱ्यांचाच स्वभाव खडूस आहे" म्हणजे प्रत्येक मुलगा आणि सून एकाचवेळेस चांगले आणि वाईट असतो. कसे काय? सगळे सापेक्ष असते.
: या सगळ्याचा कायद्याशी काही संबंध नाही.
संपत्तीबाबतचा कायदा हा फ़क्त वडिलोपार्जित संपत्तीबद्दल आहे. त्यावर सगळ्या वारसांचा हक्क असतो. स्वत: कमावलेल्या संपत्ती आपल्या मृत्यूनंतर कुणाला द्यायचे हे स्वत: ठरवता येते. मृत्यूपत्र केले नसेल तर मात्र पुन्हा सगळ्या वारसांचा हक्क येतो. पण सगळे बजावतातच असे नाही. सगळ्यांच्या मर्जीने एकाला किंवा काहींनाच वाटा मिळू शकतो. माझ्या पाहण्यात आलेल्या केसेसमध्ये (म्युच्यल फ़ंडमध्ये डेथ क्लेम्स सेटल करताना) बहुधा मुली आपला हक्क सोडून देतात. क्वचित आई हक्क बजावते. बहुतांश केसेसमध्ये मुलेच हक्क बजावायचे. हे वृद्धांच्या बाबतीत. अन्यथा पत्नीच हक्क बजावायची. म्हणजे कायदा कसाही असला तरी समाजाची मानसिकता तीच आहे. इथेच कायद्याची गरज स्पष्ट होते.
मृत्युपत्र (नुसते नॉमिनेशन नव्हे) हाच यावरचा उपाय, त्यात सगळ्या स्व-अर्जित संपत्तीचा नीट उल्लेख व कोणाला वाटणी हे स्पष्ट केलेले असावे. पण आपल्या मृत्य़ूची तयारी करायला (आपल्यासारखे सामान्य) लोक धजावत नाहीत. मग मागे राहिलेल्यांना त्रास- भांडणे , कचे‍र्‍यांचे कोर्टाचे हेल्पाटे.
२ आणि ३ अजून वाचले नाही.

अतिशय बालिश लिखाण आहे. या लेखकाला मिनिमम जनरल नॉलेजही नाही. कोणता कायदा असे सांगतो हेही तो सांगत नाही. याला उत्तरे देण्यात वेळ घालवण्यात अर्थ नाही...

योग्य उत्तर भरत, सुनेने सासर्यांना सर्व पगार देणे वेडेपणाचे आहे. आईवडिलांची, सासुसासर्यांची काळजी घेणे म्हणजे, लहान मुलांसारखे त्यांना पैसे मिळाले की जाउन देणे नव्हे. निमीष, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे कायदा सर्व गोष्टीत न्याय देउ शकत नाही तर तो जास्तित जास्त लोकांना न्याय मिळेल याप्रमाणे केला जातो.

वडीलांचे पेन्शन ही सुद्धा संपत्ती मानली जाते का?
वडिलांचे रिटायर झाल्यावरचे पैसे ही सुद्ध वडिलांची संपत्ती असते का?
>> वडिलांची संपत्ती म्हणजे म्रुत्युसमयी नावावर असलेली संपत्ती.

पण, मग अशा वेळेस अश्या कायद्यांमुळे "पैशांनी गरीब" असलेल्या वडिलांच्या मुलीशी कुणी लग्न करणारच नाही!
>> पण समजा केलेच तर तिला सांपत्तिक स्थितीमुळे श्रीमंत घरात गरीबासारखे रहावे लागणार नाही.

जर मुलगा आणि मलगी समान आहेत तर घटस्फोट घेतांना फक्त पतीनेच पत्नीला का पोटगी द्यावी?
पत्नीही जर कमावती असेल तर पोटगीची गरज नाही आणि फक्त पत्नी कमावती असेल तर पत्नीने पतीला पोटगी द्यायला हवी.
>> मला वाटायचे की नवर्याला सुध्दा पोटगी मिळु शकते आणि मानसिक छ्ळाची केस दोघेही करु शकतात?
http://www.indidivorce.com/alimony-in-india.html

आता तर यावर कडी म्हणजे लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये मजा दोघेही मारणार आणि सोडून जातांना मुलगा मुलीला पोटगीचे पैसे देईल कारण ती त्याच्या पत्नीच्या दर्जाची आहे?
>> हा कायदा गरीब लोकांनी लिव इन चा गैरवापर करु नये म्हणुन आहे. महिना ५०००० पगार असलेल्या माणसाला चार पाच हजार (माझ्या माहितीनुसार पोटगीची amount बायको कमवती असेल तर फार कमी असते) द्यावे लाग्ले हा जरी सौम्य अन्याय असला तरी गरीब स्त्रियांना कोणी वापरुन उघड्यावर टाकु नये या द्रुष्टीने केला आहे. बरेचदा legislation process मध्ये supreme court किती टक्के households affect होतील हे पाहुन कायदा सौम्य वा कडक करते.

इथे हे मान्य आहे की जुन्या पारंपारिक पद्धतीने रहाणार्यांना याचा त्रास होणार पण कायदा अगदीच गोलमाल नाही, तर काही लोक त्याचा दुरुपयोग करतात. पोलिसांकडुन्ही कधी कधी याचा दुरुपयोग होउ शकतो. लग्न करताना मुला, मुलीकडची व्यवस्थित चौकशी करणे श्रेयस्कर.
तुम्ही ही चर्चा चालु केली हे उत्तम, मला वाटते जर कोणी असा दुरुपयोग करत असेल तर काय करावे असा प्रश्न विचारणे जास्त सयुक्तिक होईल.

http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=118783:...
पुरुषांनाही मिळणार छळवणुकीविरोधात गुन्हा दाखल करण्याचा हक्क!
घ्या आता तुमचा दुसरा मुद्दा मार्गी लागतोय.
What is alimony?

Alimony is a monetary compensation granted to the spouse who is unable to support himself/herself. However, this compensation depends on matrimonial laws and varies across religions.

For instance, the Hindu Marriage Act, 1955, is applicable to all marriage- and divorce-related matters of Hindus, Jains, Sikhs and Buddhists. While the Shariat Law and the Dissolution of Muslim Act, 1937, are applicable to Muslim marriages, the Indian Christian Marriage Act, 1872, and the amended Indian Divorce Act apply to Christians, and for Parsis, it’s the Parsi Marriage and Divorce Act.

Apart from these religion-based laws, there are civil laws like the Special Marriage Act, 1954, and the Foreign Marriage Act, 1969, which are largely used for inter-religious or inter-caste marriages and divorces. Interestingly, it’s not women who always receive the alimony. There is a provision that a working wife should offer an alimony or monthly maintenance to a non-working/unemployed husband. However, in other matrimonial laws, it’s usually the wife who claims compensation.

या विनोदी लेखना वर मिपा वर आलेल्या प्रतिक्रिया पाहता फार विचार करून लिहायची गरज वाट्त नाही.
चालुद्या.

जय गौरी!

अश्विनीमामी,

तुमच्या संपूर्ण पोस्टचा आदर!

मात्र! आता दिवस बदललेले आहेत. बायका आक्रस्ताळ्या असल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत . अगदी इथेही! इतक्या काही बायका इनोसन्ट वगैरे राहिलेल्या नाहीत. मी पाहिलेले आहे की बहुतांशी ठिकाणी त्यांचा आदरच ठेवला जातो. मनोभूमिका 'मी अन्यायग्रस्त आहे' अशी करायची असल्यास अलाहिदा!

-'बेफिकीर'!

टीप - तुम्ही स्त्री म्हणून जे काही केलेले सांगीतले आहेत ते स्तुत्य आहेच.

कायद्याने बायकांना दिलेले रक्षण गेल्या कैक वर्षांचा इतिहास व परिस्थिती पहाता योग्यच आहे. स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, हुंडाबळी, शरीरविक्रयास भाग पाडणे, लैंगिक अत्याचार, शारीरिक व मानसिक अत्याचार, कोणत्याही आपत्कालीन युध्दसदृश किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत स्त्रियांना भोगावे लागणारे अत्याचार यांच्या आकडेवारीवरून जरी नजर घातली तरी स्त्रीला कायद्याने मिळालेले संरक्षण आजच्या घडीलाही किती अपुरे आहे याची जाणीव होते. जर पुरुषांवर स्त्रियांकडून अत्याचार होत असले तर त्यांची पुढे येणारी आकडेवारी त्या तुलनेत बघू जाता अगदीच किरकोळ आहे असे निदर्शनास येते.

समाज किंवा कुटुंबव्यवस्थेतील एका घटकाने दुसर्‍या घटकावर बळजबरी करणे, गैरफायदा घेणे, वर्चस्व प्रस्थापित करणे इत्यादी गोष्टी आपल्याच काय, जगाच्या कोणत्याच संस्कृतीला नव्या नाहीत. परंतु जसजसे कायदेकानून आले, प्रस्थापित राज्यव्यवस्था आली तसतसा व्यापक कल्याणाच्या दृष्टीने, समाजात न्याय रूढ व्हावा, गुन्हेगारीला आळा बसावा, नैतिक मूल्ये जपली जावीत ह्या दृष्टीने जो विचारप्रवाह आला त्यातूनच सध्याच्या घडीचे कायदेकानून आले हेही उघड आहे. त्यांचा एकांगी नजरेतून विचार न होता ते कायदे कोणत्या गरजेतून पुढे आले, सध्या त्या कायद्यांची कितपत अंमलबजावणी होते, त्या कायद्याचे फायदे-तोटे व दृश्य परिणाम काय आहेत, सद्य सामाजिक स्थितीला हे कायदे कितपत योग्य आहेत यांचा समग्र विचार करणे आणि त्यानुसार आपले विचार मांडणे हे जास्त उचित ठरेल. फक्त मोठ्या शहरांमधील आकडेवारीवर न जाता छोटी शहरे, खेडी, ग्रामीण व आदिवासी भागातील परिस्थिती लक्षात घेऊन (व तेथे भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या निवास करते हे जाणून) त्याप्रमाणे आपले विचार मांडावेत.

आक्रस्ताळ्या बायकांकडून गांजल्या गेलेल्या पुरुषांसाठी बातमी
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=119...
‘४९८ ए’चे खटले कौटुंबिक न्यायालयांकडे वर्ग करावेत -
मुंबईतील वकिलांची महत्त्वपूर्ण मागणी.
यात ४९८ अ कलमाच्या गैरवापराचे बळी ठरलेल्यांना विशेष आवाहन आहे.

मुलगा-मुलगी दोघांचा जर संपत्तीवर "समान" हक्क आहे तर दोघांनीही आई-वडीलांना सांभाळायला हवे.
मुलीनेसुद्धा वडिलांना सांभाळायला हवे. >>>
हे जर तुमच्या बायकोने आग्रह धरला तर नको असते. आणि बहिणीनी मात्र आग्रह धरावा असे वाटत असते. ही आहे भारतीय पुरुषांची मानसिकता Sad
म्हणजे बायकोने म्हटले की मी माझ्या आईवडीलांना सांभाळणार, तर हेच नवरे "आपला समाज, संस्क्रूती, आजकालच्या स्त्रीयांचे नखरे" वगैरे तारे तोडतात. पण जेव्हा याच नवर्‍यांना त्यांच्या बहिणींना हिस्सा द्यायची वेळ येते तेव्हा "बहिणींनी आईवडीलांची जबाबदारी घ्यावी" असे वाटते.

चांगली बातमी भरत. ज्या पुरुषांवर स्त्रिया किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून खरोखरीच अन्याय होतोय त्यांच्यासाठी हा दिलासा ठरेल.

आता काय लिहिणार? माझं सगळं आधीच लिहून झालंय.... Happy

( बायांच्या विरोधात लिहिताना काळजी घ्या रे... नाहीतर बाई येऊन तुमचं सोंग सजवतील Proud )

टिपिकल बाफवर टिपिकल पोस्टे आलीचः)
"मात्र! आता दिवस बदललेले आहेत. बायका आक्रस्ताळ्या असल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत . अगदी इथेही! इतक्या काही बायका इनोसन्ट वगैरे राहिलेल्या नाहीत. मी पाहिलेले आहे की बहुतांशी ठिकाणी त्यांचा आदरच ठेवला जातो. " >>>> कसलं काही प्रमाण माहित नाही, ना आकडेवारी, जनरलाइज्ड विधान दिलं आपलं ठोकून!
असली बेजबाबदार पोस्टे टाकून मग नंतर कुणी तुमच्या मानसिकतेबद्दल मते बनवली तर त्या लोकांना आक्रस्ताळे म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकारच नाही . नंतर कितीही नायिकाप्रधान कादंबर्‍या पाडल्यात तरी फायदा नाही हो! असो.

बेफिकीर साहेब... प्रत्येक ठिकाणी आपली बायकांबद्दलची मौलिक मते मांडलीच पाहिजेत का....एकदा हसं करून घेतलंत ना स्वत:चं.....पाडा अजून नायिका प्रधान कथा पाडा....

निमिष सोनार कुठे आहेत? त्यांनी वाचले का प्रतिसाद आणि दिलेली माहिती?

मायबोलीवर बाफ उघडणा-यांना लगेच स्मृतीनाशाचा झटका येतो. ती आयडी सोडुन बाकी लोकांना मात्र हा त्रास होत नाही... Happy