मनातला चिंटू

Submitted by शिरिन on 29 November, 2010 - 20:43

आजचा सकाळ चालत असताना चिंटूचा विनोद वाचला . विनोद वाचून हसू आलं.

मी लहान असताना चिंटू खूप प्रसिद्ध होता . आम्हाला शाळेत असताना तो खूप आवडायचा . सगळे त्याच्या बद्दल गप्पा मारत. शाळेतल्या मुलांमध्ये चिंटू इतका प्रसिद्ध होता म्हणून आमच्या मुख्याध्यापिकाबाईंनी चिंटू लिहिणारे प्रभाकर वाडेकर आणि चारुहास पंडित यांना क्रिसमस संमेलनात अतिथी म्हणून बोलावले . ते येणार म्हणून शाळेतल्या सर्व मुलामुलींना खूप आनंद झालं . त्यांच्या स्वागतासाठी छान फुले आणली होती. त्याचा स्वागत खूप मस्त झाला. सर्व मुलांनी त्यांना चिंटूचा एक विनोद संगैचा आग्रह केला आणि शिवाई त्यांना चिंटूचे चित्रही काढायला लावले. त्यांनी आमच्या आग्रहाखातर चित्रही काढले आणि विनोदही सांगितले, याचाच आम्हा सर्व मुलांना खूप अप्रूप वाटले. सगळ्याने त्यांची स्वाक्षरी घेतली . आमच्या नाचगाण्यात त्या दोघांनी खूप धमाल केली .

आता मी मोठी झाले, लग्न झालं संसार सांभाळू लागले तरी हा बापडा अजून लहानच आहे. अजून किती दिवस तो लहानच राहणार ? माझ्याबरोबर त्याचेही वय वाढत का नाही ?

लहानपणी चिंटू वाचताना त्याच्यासारखे खूप बालिश वागणे ,त्याची हुशारी , विनोदी वृत्ती सगळा वाचून अगदी तसं वागलं की खूप मजा येई . चिंटूला त्याचे आई बाबा जसं ओरडत त्याप्रमाणे माझेही आई बाबा मला बोलत . कुठल्यातरी गोष्टीची गम्मत करणे , कोणाची तरी फजिती करणे या सगळ्या गोष्टी करताना प्रचंड मज्जा येत असे.

पण मध्यंतरीच्या काळात कामामुळे असो अथवा इतर काही कारणाने चिंटू वाचिला वेळच मिळत नसे . त्याला पूर्ण विसरून गेले होते असं नाही . खरा तर २ मीन चं चिंटूचा विनोद तरीही ती २ मिनिटे देखील मिळत नसत .

काम, काम आणि काम. कधी कधी अस वाटत आपण कामाच्या किती आहारी जातो , नाही का?
पण आपण करणार तरी की , आपला नाईलाज असतो . कारण काम हि गोष्ट कोणाच्या ताब्यातली गोष्ट नाही, ते किती वाढेल , कधी वाढेल हे काही सांगता येत नाही . कामामुळे सगळेच भांबावून
जातात . असा खूप वाटत कि आता सुधा आपले काही छंद आपण नेहमीच जोपासावेत. मग किती हि काम असले तरी आपल्या छंदांना काही वेळ देता आला पाहिजे.

वास्तविक पाहता लोकांकडे वेळ नसतो असं नाही पण कामाच्या तणावा मुले ते आपला वेळ नीत देऊ शकत नाहीत काही चांगल्या छंदांना, थोडक्यात निखळ आनंदाला.
परंतु कितीही काम असले तरी आपण आपल्या मनाचा ताजेपणा,टवटवीतपणा कायम टिकवून ठेवावा.

असो पण आता जे चिंटू वाचत असताना विचार आले ते लिहून काढाव म्हटलं.

खरंतर आपल्या प्रत्येकाच्या मनात एक खोडकर चिंटू लपलेला असतो त्यामुळे त्याच्या खोड्या आणि खट्याळ पणा आपल्याला आपला वाटतो , त्याच्या खोड्या, व्रात्यपणा आपल्याला खूप आवडतात. एक प्रकारे आपण आपल्यालाच त्याच्यामध्ये पाहत असतो.

जीवनाच्या या पैलू वर चिंटूला अनन्यसाधारण महत्व द्यावे वाटते. चिंटू हि एक व्यक्ती नसून वृत्ती आहे, आणि वृत्तीला कधीही वय नसते.

चिंटू - हा कायम लहान राहणार , कायम सगळ्यांना तो हसवणार. मिस्कील चाले करणारा चिंटू . कायम स्मरणात राहणारा चिंटू.
आपण आपल्या वयाचा विचार ना करता त्याचा आनंद घेत राहावा आणि मानाने लहानच राहावे ,हो किनई ?

गुलमोहर: 

आवडलं! मी पण चिंटू फॅन आहे! Happy
>>चिंटू हि एक व्यक्ती नसून वृत्ती आहे, आणि वृत्तीला कधीही वय नसते.>> पूर्ण अनुमोदन!

पूर्ण अनुमोदन तुला शिरिन.. ही चिंटूवृत्ती सर्वांनी टिकवून ठेवलीच पाहिजे.. मग लाईफ इतकं हार्श नाही वाटणार Happy
आपण मोठे झालो तरी आपल्या लहानग्यांबरोबर पुन्हा इनिड ब्लिटन ,चंपक वाचण्याची मजा लुटता येते. माझी एक मैत्रीण आहे ,ऑल्मोस्ट ५०..ती कुठेही प्रवास करत असली कि तिच्या हातात आर्ची कॉमिक्स असलेच पाहिजे.. ती तिची अन्वाईंड होण्याची आयडिया आहे.

सुंदर लिहिलं आहे.. चिंटू हा लहानपणापासूनचा मित्र. जवळपास २ वर्षे चिंटूची कात्रणं एका फूल्स्केप वहीत चिकटवलेली आहेत. आजही ती वही चाळताना नकळत त्या वयात पून्हा एकदा स्वतःची करमणूक करवून घेतल्यासारखं वाटतं. सकाळमधली उन्हाळ्यातल्या सुट्टीतली पाने त्यातल्या काही गोष्टी अजूनही आठवतात.

सर्व प्रकाशचित्रे गुगलवरून.

5754594268523664755_Org.jpg

चिंटूची पुस्तके वाचून 'ती' बरी झाली.
pun.jpg

चिंटूची वीस वर्षातीळ सफर इथे पहा-
http://www.esakal.com/esakal/20101120/5233509166462567021.htm

चिंटू मुळे घरातला संवाद वाढतो.
http://www.esakal.com/esakal/20101118/5619721261235174565.htm

'चिंटू' छानच आहे. तो आबालवृद्धांचा लाडका आहे. खुसखुशीत विनोदाबरोबच समाजप्रबोधनाचे कार्यही कौतुकास्पदच आहे.

हा चिंटू माझ्या शाळकरी वयाच्या खुप पुढचा. पण घरातल्या छोट्या मंडळींवर त्याचा खुप प्रभाव होता एवढे नक्की.

मस्त... आणि 'चिंटू हि एक व्यक्ती नसून वृत्ती आहे, आणि वृत्तीला कधीही वय नसते.' ह्या वाक्याला प्रचंड अनुमोदन...

आजचा चिंटू खरच महान होता.... वडिलांना १८ रुपये परत आणि स्वतःसाठी चॉकलेट..

मी पण चिंटू फॅन आहे! लोकसत्तामध्ये हे कार्टुन यायचे तेव्हा रोज पहिल्यंदा शेवटचे पान बघायचे "चिंटुसाठी".. Happy