मन जळाया लागले ....

Submitted by वर्षा_म on 19 November, 2010 - 01:29

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21323

>>>>>>>>>>>>>>>

मन जळाया लागले ....

मज कोडे अबोल्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !

बघ ओघळले गाल खाली दोन इंच आता
सुरकुत्यांचे अस्तित्व कळाया लागले !

संपले होते सौदर्य माझ्या नयनीचे
डोळे खोबनीत दिसाया लागले !

बघते उघडुन मी फोटो तारुण्याचे
फरक पडला पाहुन रडाया लागले !

दुर्लक्षले तुला धुंदीत धावण्याच्या
प्रेमाचा तुझ्या विचार कराया लागले !

गुलमोहर: 

बघ ओघळले गाल खाली दोन इंच आता
सुरकुत्यांचे अस्तित्व कळाया लागले ! << हे सुद्धा छान जमलय.

वर्षे, पूरे झालं विडंबन. चव घालवू नकोस तुझ्या विडंबन शैलीची. Uhoh

वर्षा... काय गं तुझी काव्यप्रतिभा............. मुळ कवितेची शाई वाळायच्या आधीच तुझे विडंबन तय्यार.. आणि तेही एकदम दर्जेदार...................... वा....

अदितीतै, येलकम गं Wink
लै दिवसानंतर.... Happy
वर्षे हि तै खरी ईडंबन सम्राज्ञी हाये बर्का Happy