मन जळाया लागले ....

Submitted by विशाल कुलकर्णी on 19 November, 2010 - 01:04

मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !

बघ ओघळले गालावरी थेंब दोन आता
मला आसवांचे अस्तित्व कळाया लागले !

संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले !

बघतो वळुन मी छाटलेले बंध आठवांचे
क्षण आता वार्‍याच्या वेगे पळाया लागले !

जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या
नुरला वेळ पश्चातापा मन जळाया लागले !

विशाल.

गुलमोहर: 

संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले ! >>>

सहीच रे, विशल्या. आवडली कविता.

मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !

लई वाईट झाले राव... मला हे चार वर्षांपुर्वी अचानक कळाले आणि तेव्हा बसलेला धक्का अजुनही ओसरला नाही Proud

गजल्/कविता जे काही आहे ते छान आहे.

जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या
नुरला वेळ पश्चातापा मन जळाया लागले !

अरे खूप दिवसांनी. वाचून छान वाटले.!!

विशाल्भौ..... फार छान कविता... तू हीची गझल लीलया बनवू शकशील... Happy

कैलासदादा, कशाला नाही त्या फंदात पाडताय, डोक्यावरचे उरले सुरलेही उडून जातील माझ्या Wink
हा आता तुम्ही मदत करणार असाल तर आपली त्याला पण तयारी आहे. Happy

आभार Happy

विशाल कविता अप्रतिम

मज कोडे आयुष्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !

एवढ्या लवकर जाणीव झाली

दिल तो बच्चा है जी...........

निखिल Happy

जिंदगीचे गूढ जेव्हा आकळाया लागले
जाणले तारुण्य माझे ही ढळाया लागले

थेंब ओघळले जसे मम दोन, ह्या गालावरी
अश्रु म्हणजे काय्?हे आता कळाया लागले

कापले गेलेत माझे मार्ग परतीचे तरी
नेत्र हे आता पुन्हा मागे वळाया लागले

आठवांचे छाटलेले बंध मी बघता वळुन
क्षण बनूनी वात वेगाने पळाया लागले

धावलो धुंदीत इतुका,की कधी जगलोच ना
वेळ ना उरली अता मन मम जळाया लागले.

विशालभाउ,आपल्या कवितेची गझल बनविली आहे...... आशय सांभाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे.गोड मानुन घ्या.

मस्त रे, विशाल.
आम्हालाही तुझे 'अंतरंग' आता कळाया लागले.
जगायचे गेले राहुन धुंदीत धावण्याच्या>>>>>
आता जगून घे मित्रा! मनमुराद.

>>संपले होते मागे मार्ग कधीच परतीचे
अन पुन्हा डोळे.., हे मागे वळाया लागले!<< भारीच, मस्त लिहिलयस विशाल.