मठ्ठपणाचा भाव असणारी दुपार !!

Submitted by प्रकाश१११ on 15 November, 2010 - 23:49

सुस्त अशी दुपार उगवली आहे
सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...!
सर्वत्र सुन्न असे वातावरण ...
माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय
सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ...
कान नि मन बधीर व्हावे असे वातावरण
वटवाघळ! सारखी टांगून राहिलेय दुपार ..!!

झाडांच्या पानापानानी कसे घेतलेय स्वताला मिटवून
चिडीचुप्प स्वप्नात हरवून
काही गायी म्हशी स्वताला गुंडाळून
रवंथ करीत बसल्यात ही दुपार
कुत्रे देखील डोळे मिटून पेंगत बसलेय
भुंकायचे सोडून

सूर्य नारायणासारखा खत्रूड शिक्षक
नि मठ्ठ अशी ही दुपार ......!
गणित सुटले नाही की पट्टी हातावर
मग दुपार अशी केविलवाणी
रडकुंडीला आलेली ..
त्यामुळे कोरड पडलीय तिच्या घशाला ...!!

मठ्ठ चेह्र्यासारखी दिसतेय ही दुपार
मास्तरांनी शिक्षा दिल्यासारखी ...
पायाचे अंगठे धरून कंटाळलिय ही दुपार
ती वाट पाहतेय घंटेची
मग होईल संध्याकाळ नि गार हवा सुटेल
ही दुपार वाट पाहतेय त्या क्षणाची
तोपर्यत ती निमूट
सहन करतेय आपल्या प्राक्तन-भोगाला ...!!

गुलमोहर: 

पायाचे अंगठे धरून कंटाळलिय ही दुपार.... वा वा! मस्त कल्पना प्रकाश! शाळेचे दिवस आठवले. मधल्या सुट्टीनंतरचे तास अस्सेच जायचे रटाळ, कंटाळवाणे. मराठीचा तास असेल तर मात्र त्याला अपवाद असायचा... एकतर माझा आवडता विषय आणि सुदैवाने सगळ्याच मराठीच्या शिक्षिका मस्त लाभल्या मला Happy

Happy छानै.. कडक उन्हाळ्याच्या दिवसातल्या आळसावलेल्या दुपारचं मस्त वर्णन .. डोळ्यासमोर दृष्ये आली सगळी..

कान नि मन बधीर व्हावे असे वातावरण
वटवाघळ! सारखी टांगून राहिलेय दुपार ..!!<<

सूर्य नारायणासारखा खत्रूड शिक्षक<<

उत्तम शब्द प्रयोग आहेत्...निसर्गाला जवळुन पाहण्याची वृत्ति दिसून येते..असेच चालु द्या.....

निसर्ग प्रेमी
चातक