आत्महत्या

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 11 November, 2010 - 03:55

अवघावी संसार टाकुनी
करतो का रे आत्महत्या
नाहीत काय रे तुझेजवळ
संसारात रमणार्‍या युक्त्या
नाही मिळाले गुण उत्तम
जातोस करायला तु आत्महत्या
तेवढे गुण मिळविण्यास
अपुरी पडते रे तुझी विद्या
मग करावी का आत्महत्या?
प्रेमाला नाही मिळाली साथ
करतो तु तीची हत्या
मग आपोआपच घडते
स्वतःचीही आत्महत्या ....

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रगो.... Angry

इथे हत्या ... युक्त्या...... आणि अजून एक यमक चपखल बसते....... Rofl
प्रगोस सांगणे न लगे...... Proud

मुक्ता.... तु ह्या अरसिकांच्या नादाला नको लागुस ...

परवाच मी माधव ज्युलीयन यांचे " छंदो रचना" हे पुस्तक वाचत होतो .... त्यात " यमक जरुरीचे नाही " ( ते फक्त सोयीचे आहे) असे स्पष्ट लिहीलेय ....

संसाराबरोबर नाहीतर संसाराशिवाय माणसान नेहमी मस्त राहायला शिकलं पाहिजे, जगात मस्त राहण्यासाठी भरपुर काही आहे ..मग आत्महत्या कशाला ?
Happy

यमक जरूरी नाही, सोयीचे आहे >>>>

ज्युलियन हे एक सोंग असावे या माझ्या जुन्या मताला पुष्टी मिळाली.

धन्यवाद!

सदर रचनेतील संदेश शुद्ध आहे. मात्र शब्दरचना व शब्दनिवड मला आवडली नाही.

चु.भु.द्या.घ्या.

-'बेफिकीर'!

ज्युलियन हे एक सोंग असावे या माझ्या जुन्या मताला पुष्टी मिळाली...>>>>> आता हे काय नवीन ....???

आपलं मत एकदा..परत श्पष्ट पणे मांडाल का इथे ... उगाच पणजोबा खापरपणजोबांच्या वयाच्या व्यक्तीवर काही बोलण्या आधी मुद्दा क्लीयर करा Proud

मुक्तेश्वर तुमच्या या काव्यात एक वेगळा व महत्वाचा विचार आहे. एक रसिक म्हणून मी आपल्या या कवितेत एक प्रतिभासंपन्न कवी पाहतो आहे. आपल्या अशाच नवनवीन कविता वाचायला आवडतील. पु.ले.शु.

(बघा त्या ह बा माझी कीव आली)
>>>
मुक्तेश्वर,
मला वायफळ विनोद आवडत नाहीत. मी तुम्हाला मनापासून दाद देतोय आणि तुम्ही स्वतःलाच कमी लेखत माझ्या प्रामाणिक प्रतिसादावर शंका घेताय? मला कुणाचीही कीव येत नाही. चुकीचे वाटल्यास तसेही मी स्पष्टच(जरा जास्तच) बोलतो. असो तुम्हाला प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व!!!

हणमंत शिंदे यांच्याशी सहमत आहे.

मनापासून प्रतिसाद दिला त्यांनी! कीव येऊन वगैरे दिला नाही. उलट चांगला सपोर्ट केलेला आहे.

मुक्तेश्वर १११ हे कवी आहेत या प्रसादराव गोडबोले यांच्या विधानाने नवीन हल्लकल्लोळ सुरू होऊ शकतो असे वाटते.

त्यामुळे मी आता इथेच थांबतो.

-'बेफिकीर'!

मनापासून प्रतिसाद दिला त्यांनी! कीव येऊन वगैरे दिला नाही. उलट चांगला सपोर्ट केलेला आहे.

मुक्तेश्वर १११ हे कवी आहेत या प्रसादराव गोडबोले यांच्या विधानाने नवीन हल्लकल्लोळ सुरू होऊ शकतो असे वाटते.

>>>> ह्या दोन्ही विधानातुन

हबा फालतु कवींना सपोर्ट करतो ...किंवा प्रगो चांगल्या कवींचे खच्चीकरण करतो असे २ अर्थ निघतात ...आपल्याला काय अभिप्रेत आहे ???

शिवाय ज्युलियन हे एक सोंग असावे या माझ्या जुन्या मताला पुष्टी मिळाली.>>>> हे काय ते स्पष्ट ही केले नाहीत ...

आपण पुन्हा 'कवी कोण आहे' अशा स्वरुपाच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यासारखे केले आहेत. 'कवी म्हणजे काय' असा प्रश्न होता. अर्थात, उत्तर द्यायचे की नाही हा तुमचाच प्रश्न आहे. मी फक्त विनंती करू शकतो.

कवी म्हणजे काय याचे उत्तर द्यायचे झाले तर मग त्यातून "कविता म्हणजे काय??" हा उपप्रश्न निर्माण होईल.......

एका सरकशीत ५-५० टॉम्या गोम्या सोम्या असल्या नावाचे वाघ होते !

आपण मला विचारलेत की वाघ म्हणजे काय ?

माझे उत्तर टॉम्या वाघ आहे .

आता हे उत्तर सर्वसमावेशक आहे की नाही ???

( कैच्याकै कवितेवर कैच्याकै चर्चा चालु आहे ...वाईट वाटुन न घेणे ....
राग आल्यास ....
ज्याला येतो राग
त्याला खातो वाघ

+

वाघ हा काफिया घेवुन रचलेली माझी छोटया बहरातली कैझल ऐकावी लागेल ! Proud )

कैझल म्हणजे काय??

वाघ ही रदीफ असू शकते. वाघ हा काफिया घेतला तर इतर कवाफी काय घेणार? जांघ चालणार नाही कारण त्यात अनुस्वार आहे. आणि आग चालणार नाही कारण तो अकारान्त स्वरकाफिया होईल!

ना घ देशपांडे नावाचे एक कवी (?) होते. त्यांचे नाव म्हणून 'नाघ' हा एक काफिया घेता येईल.

http://www.maayboli.com/node/21021

ही घ्या पहिली कैझल= कैच्याकै गझल ( कैच्या कै असलयाने नियम पाळले जातील ही अपेक्षा बाळगु नये )!!!

हा तर कविता म्हणजे काय ???

हणमंत शिंदे यांच्याशी सहमत आहे.

मनापासून प्रतिसाद दिला त्यांनी! कीव येऊन वगैरे दिला नाही. उलट चांगला सपोर्ट केलेला आहे.

मी ते वाक्य हे मुद्दाव गंमतीने लीहीले
त्याबद्दल ह बा चा दिलगीर आहे

मी

हबा फालतु कवींना सपोर्ट करतो ... >>> ashi vakye lihun kunihi krupaya vadaala suruvat karu naye. mi jya kavinna saport karto te phaltu aahet ase mala vatat nahi. me sarvannach saport karato. tumchyapeksha te changale lihit nahit asa tumacha samaj asel tar to maza kinva kavicha dosh nahi. kunacha apaman karanyacha adhikar kunalahi nahi.

Pages