भक्त महिमा

Submitted by पुरंदरे शशांक on 10 November, 2010 - 02:20

भक्त महिमा

केवळ मित्राच्या आग्रहावरून,
पंढरीच्या विठ्ठलासमोर
छातीवर हात बांधून उभे राहिलेले
ते..........
विचारवंत, साहित्यिक..... वगैरे
बहुतेक.......
विठ्ठलाचीही छाती दडपलेली असणार !

त्याच्यापायी लीन होणार्‍यांकडे तुच्छतेने ,
आणि ताठ मानेने त्या पाषाणमूर्तिकडे पहात....
जरा गुर्मीतच ......
....... या दगडासमोर मीही या मेंढरांसारखे वाकायचे ?
............

गर्दीतून अचानक उमटलेले शब्द ......
"अरे हेच ते .....
..... परवा साहित्यिक दिंडी वाहून नेणारे थोर......"

विचारवंतांनाही विचार करायला लावणारे शब्द

.....गाथा, ज्ञानेश्वरी डोक्यावरून वाहणारा तू ...
त्या तुकोबा, ज्ञानोबांचे दाखले सतत देणारा तू .....
त्यांचे ॠण मानणारा तू ....
तू खरंच विचारवंत, साहित्यिक ?
त्यांच्या "जीवनसर्वस्वा"कडे "दगड" म्हणून बघणारा तू ....
तू खरंच विचारवंत ? .......

शरमेनं मान खाली जाताना,
अश्रु पुसण्याचंही भान नसलेलं
त्यांचं ते रूप पाहून चकित झालेला मित्र
आणि
समोरचं ते कटेवरी कर तसेच ठेवलेलं ध्यान .....
बहुधा ...
भक्तांना आठवत असणार....
" भक्तांचाच महिमा हा ...
एरव्ही मी तर ...
.... तसा मानला तर देव नाहीतर ....."

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्याच्यापायी लीन होणार्‍यांकडे तुच्छतेने ,
आणि ताठ मानेने त्या पाषाणमूर्तिकडे पहात....
जरा गुर्मीतच ......
....... या दगडासमोर मीही या मेंढरांसारखे वाकायचे ?>>>>>>

वाहवा... क्या बात है.... चांगलं लिहिलंय. पुलेशु.

डॉ. व श्यामली ,
प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

विठ्ठलाला शब्दबद्ध करता आहात त्यासाठी मनापासून आभारी आहे !!
तरी;>>>आवडली पण, मांडणी थोडी विस्कटल्यासारखी वाटते.+१