अनपेक्षित पाऊस

Submitted by रेव्यु on 9 November, 2010 - 00:42

अनपेक्षित पाऊस
अंधारलेल्या आभाळाने आज पहाटेचे स्वागत केलय
एक धूसर गूढ पांघरूण घेवून
हाडापर्यंत बोचणारा वारा पण तोही आल्हाद दायक वाटतोय

रस्त्यावरची तुरळक रहदारी
तितक्याच तुरळ सरीनी विस्कळतेय

गाडीतली जुनी गाणी मनातही वाजतायत
मनाचा वेध घेत
आत कुठेतरी आठवणींना छेद देतायत,तळ गाठताहेत
मन भिरभिर उडतय
कशावरच केन्द्रित होत नाहिये

कळत नाहिये कंटाळा आहे की उदासी
आठवणींचा मोहोळ आहे
की सुखद जाणिवेचे पांघरूण आहे
मी स्तब्ध अन अंतर्मुख आहे की विरक्त आहे?

तरिही या पहाटेची ही पोकळी
मला शांत समाधानाने सुखावते आहे
कित्येक वर्षात न अनुभवलेली ही जाणीव
भ्रम आहे की सत्य???.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तरिही या पहाटेची ही पोकळी
मला शांत समाधानाने सुखावते आहे
कित्येक वर्षात न अनुभवलेली ही जाणीव
भ्रम आहे की सत्य???.

अनपेक्षित पाऊस मला आवडली.
छान नि छान वाटले !!

सुंदर !!

कळत नाहिये कंटाळा आहे की उदासी
आठवणींचा मोहोळ आहे
की सुखद जाणिवेचे पांघरूण आहे
मी स्तब्ध अन अंतर्मुख आहे की विरक्त आहे?

एकदम मस्त. तंतोतंत !! Happy अगदी अस्वस्थ

मित्रहो
धन्यवाद
याची माझी मूळ इंग्रजी रचना अशी आहे!!
त्यावर ही रसिकांनी भाष्य करावे ही विनंती-म्हणजे आणखी एका भाषेत प्रयत्न चालू ठेवीन.
Unexpected rains this morning!!!

An overcast sky welcoming the morning
In a grey shroud
Wind biting my bones yet soothing
Stray traffic on the road
Punctuated by an equally stray drizzle

Soulful old melodies play in the car
Piercing my mind
Reaching my inner conscience and memories somewhere
Mind wanders listlessly
I am unable to concentrate

Unable to guess if it is melancholy ,sheer boredom,
Nostalgia or cocoon of soothing thoughts
Plunging me into silence ,introspection
Or a strange detachedness??

Yet the nothingness of the early morning hours
Fills me with calmness and peace
Not experienced for years together .

छान..............वेल् डन...

एक फर्माईश...........
अशिच एखादि ह्रदयस्पर्शि कवीता चातकावर लिहा ना....जो पावसाचिच वाट पाहत असतो...

मी एक .....

कळत नाहिये कंटाळा आहे की उदासी
आठवणींचा मोहोळ आहे
की सुखद जाणिवेचे पांघरूण आहे
मी स्तब्ध अन अंतर्मुख आहे की विरक्त आहे?

वाव्वा!!!