महाराष्ट्राच्या मुख्य मंत्र्यांचा राजिनामा मागण्यात आला

Submitted by रेव्यु on 9 November, 2010 - 00:22

नुकतच वाचलं -अशोक चव्हाण यांचा राजिनामा सोनिया गांधीनी मागितला.
हा निर्णय कितपत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने योग्य आहे???

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हा निर्णय कितपत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने योग्य आहे हे जरी नक्की सांगता येत नसले तरी भ्रष्ट मंत्र्याचे निर्मुलन होत आहे याचेच समाधान आहे........इतरांनाही रांगेत उभं करा

हा निर्णय भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने कितपत योग्य आहे???
अतीशय योग्य आहे! फक्त वरवरची छाटणी नको, समूळ ऊच्चाटन करा. "सोनीयाने कान टोचले" Happy

>हा निर्णय कितपत भ्रष्टाचार निर्मूलनाच्या दिशेने योग्य आहे???
कितपत भ्रष्टाचार अन कितपत निर्मूलन हे सांगणं अवघड आहे. जागतिक बँक वा ईतर आंतर्राष्ट्रीय संस्थांच्या सर्वेक्षण अहवालानुसार भ्रष्टाचारात आपण फिलीपाईन्स पेक्षाही वाईट आहोत. तेव्हा या निर्णयाने निर्मूलना पेक्षा त्या प्रकाराला आळा बसण्याची शक्यता अधिक आहे.

योग्य की अयोग्य माहित नाही, कारण मुख्यमंत्री बदलणे म्हणजे एक चोर जाऊन दुसरा त्याजागी येणे एवढंच होय.

अहो, चेंबूरला सिनेमाची तिकिटे ब्लॅक करणारा आणि परिसरात गुंडगिरी करणारा माणूस महसूलमंत्री होतो तर बाकीचं काय घेऊन बसलात हो Sad

ह्या पेक्षा रामायण, महाभारत तरी बरं.. पात्र तरी बदलत नव्हती. इथे कापडं बदलल्यासारखी राजकारणी लोकं बदलली जातायेत. चला म्हणजे आता चॅनलवाल्यांचा सुळसुळाट पून्हा एकदा.

चेंबूरला सिनेमाची तिकिटे ब्लॅक करणारा आणि परिसरात गुंडगिरी करणारा माणूस महसूलमंत्री होतो>>> हाच माणूस आधीच्या एका 'प्रखर राष्ट्रवादी' सरकारात मुख्यमंत्री होता ना?

>> हाच माणूस आधीच्या एका 'प्रखर राष्ट्रवादी' सरकारात मुख्यमंत्री होता ना?

अरे हो की, ते विसरलोच. हे गृहस्थ चक्क एक वर्ष मुख्यमंत्री होते (आणि ते ही मनोहर जोशी यांची रिप्लेसमेंट म्हणून!!!!!!

भ्रष्ट मंत्री नेहमीचेच आहेत, माजी लष्करप्रमुखांचा सहभाग ही या प्रकरणातील सर्वात धक्कादायक गोष्ट आहे, त्यांच्यावर काय कारवाई होणार? मुळात 'कारगिल शहिदांच्या कुटूंबांना दक्षिण मुंबईत फ्लॅट' ही बादरायण कल्पनाच संशय वाढ्वणारी आहे.

राकट देशा ..कणखर देशा ...चोरांच्या देशा !.....:राग:

जय जय महाराष्ट्र माझा ....:राग:

......अन दिल्लीचे पाय चाटतो......:राग:

.

छ्या: आपण त्रागा करुन काहीच उपयोग नाय ... सोडा ...

(मनोहर)पंत गेले आणि (नारायण्)राव चढले

आता अशोकराव गेले, कोणता साव पणाचा आव आणणारा चोर येईल ते बघुया! Sad

लिंबु ,
यथा प्रजा तथा राजा!
का करता उगा त्रागा? >>>>
हे पटले नाही ....यथा प्रजा तथा राजा! हे राजेशाहीत ठीक आहे ...इथे लोक शाहीत ५०% लोकांना मतदान करावेसे ही वाटंत नाही ...शिवाय हे सरकार काही अ‍ॅब्सोलुट मेजॉरीटीचे नाही ....अर्थात हे सरकार फक्त २०-२५% लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे ....ते चोर आहेत असे म्हणा हवे तर ...( ते कोण आहेत हे मी लिहायचे टाळतो ...उगाच राजकीय वाद नको .)

आम्हाला जास्तीत जास्त निष्क्रीय म्हणता येईल ...हे असलं शहीदांच्या टाळुवरचं लोणी खाण्याचं पाप आम्हा ७०-७५% लोकांच्या माथ्यावर का मारता ?

<स्वगत....>
बाकी मतदान न करणार्या त्रागा करायचे तरी काय कारण ??

पण " स्वराज्य व्हावे हे तो श्रीं ची इछा.." हे आठवते ....अन ही महाराष्ट्राला लागलेली वाळवी दिल्लीचे पाय चाटते अन दिल्ली महाराष्ट्राचा नेता ठरवते ...याचे कुठे तरी वाईट वाटले म्हणुन बोललो ...:( )

आता अशोकराव गेले, कोणता साव पणाचा आव आणणारा चोर येईल ते बघुया!

जो दिल्लीच्या चाटूगिरीत पुढे,तो खुर्ची मिळवणार.... बाकी काय? Angry

ईथल्या या विषयाशी संबंधीत सर्व बा.फ. वर पोस्टी पाडून त्यातून काही निष्पन्ना होणार नाही पेक्षा सर्व पंत, राव, साव यांना या बा.फ. ची लिंक पाठवा रे- काहितरी निष्पन्न होईल अशी आशा करुयात Happy (नको नको मा.बो. बंद करायचे. थोडक्यात दोन्ही कडून आपणच मार खायचा आहे!)

बाकी या "आदर्श" वाद्यांची कीव येते- २५% लोकांनी दिलेली ईतकी चांगली संधी वाया घालवायची. किती कर्मदरिद्रीपणा? या अशा लोकांबदल मला कायम असे बिनबूडाचे प्रश्ण पडतातः
१. यांची कातडी किती जाड असते? गेंड्याला त्यांचा हेवा वाटत असेल का? किंव्वा हे सापासारखी कात टाकून नविन घेत असतील का?
२. यांना रात्री शांत झोप लागते का? कुठलेही घोटाळे न करता निव्वळ दमल्याने टाळूवर तेल ओतल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही.
३. असे पदावरून दूर करण्यात आल्यावर ते cv update करतात का?
४. पुन्हा त्याच लोकांबरोबर ऊठ बस करतांना त्यांना काहीच वाटत नाही का?
५. हे लोक जनतेला ठार बावळट्टच समजतात का?
६. "पुन्हा त्या वाटेला गेलास तर याद राख" असे म्हणून यांचे आई वडील यांचे कान पकडत नाहीत का?
७. हे सर्व लोक ऊत्तम अभिनेते होवू शकतील का?
८. रोज सकाळी आरश्यात चेहेरा पाहिल्यावर त्यांना काय दिसते?
९. हे लोक मायबोली नियमीत वाचतात का?
१०. कोई माई का लाल है क्या?
११. सत्ता, संपत्ती, अधिकार अन घराणे हे सर्व यांच्याकडून जप्त केले तर हे कशावर ऊपजिवीका करतील?
१२. जाताना काय काय बरोबर नेणार अन काय मागे ठेवणार?
१३. हे एकदा तरी झक्कींना भेटले आहेत का?

१२. जाताना काय काय बरोबर नेणार अन काय मागे ठेवणार?>>>> हाच प्रश्न मला नेहमी पडतो, पैसे खाताना 'स्काय इज द लिमीट' हा फॉर्म्युला जवळ जवळ सगळेच राजनेते का पाळतात? भारतातील कॉमन मॅनला ७० हजार करोड लिहण्यासाठी ७ च्या पुढे किती शुन्य येतील हे देखिल सांगताना चुकायला होते. CWG ईतका पैसा उडवताना यानां देशात आत्महत्या करणारे शेतकरी, बेकार तरूण, रस्त्यावर भिक मागणारे भिकारी का डोळ्यासमोर येत नाहीत? यांची भुक शमणार तरी कधी? आंगावर पांढरे कपडे चढवले की सगळी पाप धुतली गेलीत अस यानां वाटत का? ६० ते ८०+ वर्षाच आयुष्य जगायला यानां नक्की किती पैसा हवाय?
.
.
.इथे लोक शाहीत ५०% लोकांना मतदान करावेसे ही वाटंत नाही ...शिवाय हे सरकार काही अ‍ॅब्सोलुट मेजॉरीटीचे नाही ....अर्थात हे सरकार फक्त २०-२५% लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे>>>>>> हाच तर प्रॉब्लेम आहे. जोपर्यंत मतदान न कराणारे 'चलता है' म्हणत सगळं चालवून घेतील तोपर्यंत ही परिस्थीती सुधारणार नाहीच male30-male-sad-lonely-smiley-emoticon-000072-large.gif

>>>> हे पटले नाही ....यथा प्रजा तथा राजा! हे राजेशाहीत ठीक आहे ...इथे लोक शाहीत ५०% लोकांना मतदान करावेसे ही वाटंत नाही ...शिवाय हे सरकार काही अ‍ॅब्सोलुट मेजॉरीटीचे नाही ....अर्थात हे सरकार फक्त २०-२५% लोकांचे प्रतिनिधित्व करत आहे ....ते चोर आहेत असे म्हणा हवे तर .<<<<<
बाबारे, लोकशाहीत तर ते सोळा आणे खरे ठरते, कारण राजा निवडायचा अधिकारच प्रजेकडे अस्तो!
मूळात "जसा राजा तशी प्रजा" अशी म्हण आहे, लोकशाहीकरता मी ती उलटी फिरवली आहे.
एकुण नोन्दलेल्या(?) [व यादीतून गाळलेल्यान्ना सोडून उरलेल्या] १०० मतदारान्पैकी, ५० च्या आत मतदान होते, या ५० पैकी कसे तरी २२ ते २६ या आकड्यावरील "मेजॉरिटीने" सत्ता स्थापन होते, म्हणजे एकुन १०० मतदारान्पैकी केवळ एक चतुर्थान्श किन्वा त्यापेक्षाही कमी प्रतिनिधित्वाने ही लोक सत्ताधारि होतात. प्रत्यक्ष नाबालिग/मतदान यादीतुन गाळले गेलेले धरुन एकूण लोकसन्ख्येबरोबर प्रमाण काढले तर ते अजुनच कमी म्हणजे १० टक्के देखिल भरेल की नाही शन्का हे! मग प्रश्न उरतो तो या उरलेल्या (नोन्दलेल्यान्पैकी ५०% वा एकुणच) लोकान्चा, त्यान्चे काहीच उत्तरदायित्व नाही का?
म्हणून मी म्हणतो लोकशाहीत, यथा प्रजा, तथा राजा! Proud

हे वाचा:
गीरे तो भी....
>>http://timesofindia.indiatimes.com/india/Resignation-doesnt-prove-my-gui...

वरती ही मुक्ताफळे:
"I am 100 per cent sure, I will come out clean on this. There are ups and downs in political life. I will continue to work as party worker," he said.

थोडक्यात ही गोष्ट निव्वळ राजकीय कारकिर्दीतील चढ ऊतार ईतकी शुल्लक आहे म्हणे. २६/११ पण एक असाच चढ ऊतार होता यांच्यासाठी. फक्त तेव्हा लोक चढ चढ चढले म्हणून आर. आर. अन देशमुख यांना पदच्युत व्हावे लागले. आर. आर. पुन्हा काळाच्या ओघात त्याच खुर्चीवर आले आहेत- तसेच हेही येतीलच- आम्हाला तीळमात्र शंका नाही.

"I am prepared for an inquiry by any agency the government deems fit," he said.
हा तर महान विनोदच, कोण, कोणाची ,कसली चौकशी करणारे?

Justifying his decision to offer to quit, he said that "perception matters a great deal now-a-days...There was some confusion is people's mind, that confusion had to be cleared."
बरोबर- लोकशाही हे निव्वळ परसेप्शन आहे सत्त्य सर्व कंफ्युजन आहे. भैया ऑल इज वेल!

"She twice gave me the opportunity to become Chief Minister. I still enjoy the confidence of my leader Soniaji. I am grateful for whatever she has done for me," he said.
आणि लोकांचे काय? कारगिल मध्ये शहीद झालेल्यांचे काय?

About the role his successor was expected to play, he said, "Every person who sits on this (chief minister's) chair is competent. I don't need to give sermons to him."
अर्थात! सत्तेला शहाणपण शिकवायचे नसतेच!

भयानक आहे
अन आपण त्या ऑबाम्याच्या स्तुतीने शेफारून गेल्लोय
आपल्या डेमॉक्रसीची वस्तुस्थिती ही आहे

राजकारण्या कडे एक बोट दाखवताना उरलेली चार बोटे आपल्याकडेच वळली आहेत हे आपण सोयीस्कर रित्या विसरतो.

आपल्या मधील कितीजण जबाबदारीने मतदान साठी जातात?

राजकारण आपला प्रान्त नाहीये. ती दलदल आहे असे म्हणून आपण नेहेमी आपली जबाबदारी झटकतो.

असे राजकारणी आपल्यावर राज्य करणे हीच आपली शिक्षा आहे.

बदल हवा असेल तर आधी आपल्याला बदलावे लागेल. जे व्यक्ती स्वतःला बदलू तेच जगामध्ये बदल घडवू शकतात.

आपण जर स्वतःला बदलू शकत नसू तर आपल्याला बोलायचा काहीही अधिकार उरत नाही.

सोनियांनी राजिनामा मागणे ही फार मोठी गोष्ट नाही. पुढच्या निवडणुकित जनतेने त्यांचे डिपॉझीट जप्त करायला लावणे ही खरी लोकशाहीतली शिक्षा ठरेल.

राजा-प्रजा वगैरेबद्दल मला असे वाटते की योग्य वाटणारा उमेदवार असेल तर मतदान करा. तसा उमेदवार नसेल तर आहे त्यापैकी पर्याय निवडणे काही अंशी तरी योग्य होईल असे वाटते का? उत्तर अगदी नाहीच असेल तर मतदान करू नये.

अशोकरावांना काही महिने शांत बसायला सांगतील, काही काळाने पार्टीतील एक बर्‍यापैकी महत्त्वाचे पण फार नजरेत न येणारे पद देतील, तो काळ अशोकराव संकटविमोचनसोनिया स्तोत्रपठणात घालवतील, पुन्हा मागल्या दरवाजातून गडी हजर होईल ''लोक''सेवेसाठी. राजकारण हा त्यांचा बिझनेस आहे. त्यामुळे त्यात त्यांना सर्व गुन्हे माफ आहेत.

२. यांना रात्री शांत झोप लागते का? कुठलेही घोटाळे न करता निव्वळ दमल्याने टाळूवर तेल ओतल्याशिवाय आम्हाला झोप लागत नाही.
६. "पुन्हा त्या वाटेला गेलास तर याद राख" असे म्हणून यांचे आई वडील यांचे कान पकडत नाहीत का?
८. रोज सकाळी आरश्यात चेहेरा पाहिल्यावर त्यांना काय दिसते?
>> प्रश्न एकदम मार्मिक आहेत. पण या प्रश्नांची तरी खरी उत्तरे मिळतील का?

त्यातल्या त्यात एकच समाधान वाटत , हल्ली एखाद्याचं पितळ उघडं पडलं की ताबडतोब त्याला बाजुला काढतात, पुर्वीसारखं पाठीशी घालणं थोड्याफार प्रमाणात कमी झालयं असं वाटतयं.

त्यातल्या त्यात एकच समाधान वाटत , हल्ली एखाद्याचं पितळ उघडं पडलं की ताबडतोब त्याला बाजुला काढतात, पुर्वीसारखं पाठीशी घालणं थोड्याफार प्रमाणात कमी झालयं असं वाटतयं.

Pages