दो नैना इक कहानी!!

Submitted by वर्षू. on 7 November, 2010 - 10:35

मला जर लहानपणी कोणी सांगितलं असतं कि भविष्यात माझ्या डोळ्यांचं ऑपरेशन चीन मधे होणारे म्हणून, तर मी त्याला अक्षरशः वेड्यात काढलं असतं..
पण माझ्या नशिबात हा आगळा वेगळा अनुभव घ्यायचा लिहिलेला असेल.. (आणी तुमच्या नशिबात हे सर्व मी लिहिलेलं ,वाचण्याचा.. Proud )
तर झालं असं कि साधारण एका महिन्यापूर्वी मी सकाळी झोपून उठले तर उजव्या डोळ्याने काही दिसेनाच स्पष्ट.. चश्म्याच्या काचा घासघासून धुतल्या तरी तोच प्रकार.. मग मी निर्णय घेऊन टाकला कि बहुतेक चश्म्याच्या लेन्सवर क्रॅक्स गेल्या असाव्यात.. गप्प बसले..
दुसर्‍या दिवशी अजून अंधुक दिसू लागले. मग मात्र माझं धाबं दणाणलं आणी घाबर्‍या घाबर्‍या नवर्‍याला सांगितलं. त्याने मात्र शांतपणे निदान सांगून टाकलं,'तुला नक्कीच तुझ्या फॅमिलीत हेरेडिट्री असलेलं (पाचवीला पुजलेलं) कॅटरॅक्ट झालं असेल.. असा र्राग आला ना मला.. that was the last thing I was hoping to get.. नेमका त्या दिवशी रविवार असल्याने नवर्‍याच्या अंगात ऑटोमॅटिकपणे आळस भरलेला होता..पण मी मागेच लागल्याने त्याने गाडी काढली आणी इकडल्या डोळ्यांच्या हॉस्पिटल मधे गेलो. सतरा सतरा मजल्यांच्या ३ अवाढव्य बिल्डिन्ग्स शिस्तीत उभ्या होत्या. हे भलेमोठे हॉस्पिटल फक्त डोळ्यांसाठी आहे.
तिथे शिरल्यावर कळले कि आज रविवार असल्यामुळे स्पेशालिस्ट डॉक्टर्स हजर नसतात. पण होऊ घातलेले डॉक्टर्स अवेलेबल असतात. मग प्रथम रजिस्ट्रेशन विभागात जाऊन एका लांबलचक लायनीत उभे राहून नांव रजिस्टर करून घेतलं.खिडकीतल्या हसर्‍या मुलाने एक फॉर्म आणी रेकॉर्डबुक दिलं.मग त्या फॉर्म वर नांव,वय,पत्ता इ. माहिती आपण स्वतःच भरायचे. .. इकडे डॉक्टर नंबर वाइज पेशंट तपासतात म्हणून या बुक बरोबर त्याने एक नंबर ही दिला. हे बुक घेऊन आम्ही दुसर्‍या लांबच्यालांब व्हरांडा रूपी हॉल मधे गेलो. इकडे छतावर पंखे मंद गतीने गरगरत होते. अर्ध्या व्हरांड्यावर कौलाचे छप्पर होते. या भागात लाकडी बाक ठेवले होते. पेशंट बरोबर आलेल्या लोकांसाठी बसायला ही सोय होती.
या पूर्ण हॉलभर एक लांबलचक रांग होती.रांगेत वय वर्षं १ ते ७० + चे लोकं एकमेकांना चिकटून रांगेत उभे होते. ते पाहून इकडे बहुतेक रांग तोडून पुढे घुसण्याची प्रथा असावी म्हणून हे लोकं प्रिकॉशन घेत असावेसे वाटले. पण अंह..कुणीच रांग तोडताना दिसत नव्हते. इतक्या मोठ्या रांगेत बराच वेळ ताटकळल्यामुळे कंटाळलेली कोकरं इकडे तिकडे धावत होती. मग त्यांच्या आया आपापल्या मोबाईल वर बोलण्यात बिझल्या असल्या तरी मध्येच वस्सकन खेकसून त्या पोरांना आपल्या जवळ बोलावत होत्या.
शेवटी सव्वा तासानंतर माझा नंबर आला एकदाचा. समोर मोकळ्या जागेतच एका उंच स्टुलावर नर्सबाई बसल्या होत्या. मी त्यांच्या समोरच्या एका लहानश्या स्टुलावर बसले. माझ्या मागे E अक्षर उलट सुलट लिहिलेला बोर्ड होता. माझ्या समोर असलेल्या आरश्यात पाठीमागचा बोर्ड दिसत होता.नर्सबाई आपल्या हातातली छडी ई वर ठेवून मला विचारायच्या. मला समोरच्या आरश्यात पाहून एक डोळा झाकून ई कोणत्या दिशेने ओपन आहे ते फक्त हाताच्या अंगठ्याने दर्शवायचा होता. यामुळे निरक्षरांची पण सोय होत होती.प्रत्येक पेशंटला डोळे झाकायला एक प्लॅस्टिक खोल चमचा मिळत होता. आपला चमचा वापरून झाला कि तो खाली ठेवलेल्या एका टबात टाकायचा. तो भरला कि दुसरी एक नर्स टब घेऊन जायची. हे सर्व चमचे परत गरम पाण्यात उकळून ,कोरडे करून आणायची.
माझं आय टेस्टिन्ग संपल्यावर माझ्या रेकॉर्ड बुक मधे नर्सबाईंनी अगम्य भाषेत काहीबाही लिहिलं.मग मी दुसर्‍या हॉलमधे जाऊन परत एका रांगेत उभे राहिले. एक रिसेप्शन डेस्क ही होते. परत माझं बुक चेक करून तिथल्या नर्सनी मला कोणत्या नंबरच्या खोलीत जायचे ते सांगितले. माझा नंबर ६६ वा होता. त्यामुळे मला ओरडून सार्खं म्हणावंस वाटत होतं,' मेरा नंबर कब आयेगा?" या मोठ्या हॉलमधे तीन खोल्या होत्या. प्रत्येक खोलीत ३,३ शिकाऊ डॉक्टर्स तपासणी करत होते. सिनेमाच्या तिकिट विन्डो सारखीच पेशंट्स धक्काबुक्की करत होते. या सर्व कलकलाटात डॉक्टर्स मात्र शांतपणे आपले काम करत होते. शेवटी एकदाचे मलाही विठोबा...सॉरी सॉरी.. डॉक्टराचे दर्शन घडले. त्याने परत डोळे चेक केले. डोळ्यात औषध टाकून १५ मिनिटानंतर यायला सांगितले. प्युपिल्स चं डायलेशन झाल्यावर त्याने परत चेक केले आणी रिझल्ट सांगितला कि तुमच्या दोन्ही डोळ्यात कॅटरेक्ट ची सुरुवात झालिये म्हणून .
मला तसा जरासा धक्काच बसला.. आणी मी बाहेर येऊन इतका वेळ पुस्तकात डोकं खुपसून बसलेल्या नवर्‍याला पडेल चेहर्‍याने ही बातमी सांगितली. त्यावर त्याने शांतपणे म्हटले..अगं तुझ्या घरात आजी,आजोबा,वडिल,काका,आत्या, त्यांची मुलं सर्वांनाच झाला आहेनं? मग त्यात एव्हढं आश्चर्य करण्यासार्खं क्वाये??
हे मात्र पटलं मला..
दुसर्‍या दिवशी सकाळी ८ वाजता परत हॉस्पिटलला गेलो. परत नंबर लावला.परत लायनीत दीड तास उभे राहणे इ. सोपस्कार झाले.यावेळी स्पेशलिस्ट ला भेटण्यासाठी वेगळ्या बिल्डिन्गच्या तिसर्‍या मजल्यावर जावे लागले.पण गर्दी तशीच.इकडे प्रत्येक पेशंट बरोबर त्यांचे ३,४ कुटुंबियही आले होते.त्यामुळे रांगेत अजूनच धुसमुस चालू होती. त्यातून कोणा म्हातार्‍या आजीला धक्का लागला तर तिला डोळ्यांच्या बारक्या फटीतून भरपूर राग बाहेर सांडता येत होता.
चायनामधे एकही प्रायव्हेट हॉस्पिटल नाही. प्रायव्हेट रूम,वी आय पी पेशंट असले नखरे नाहीत. रोज हजारो लोकांची वर्दळ झेलत असलेले प्रत्येक हॉस्पिटल मात्र अतिशय स्वच्छ,चकचकीत फरश्या,भिंती असलेले कोणत्याही प्रकारच्या वासारहित असतात.
इथे बरेच वय झालेले लोकं आरामात ३,३ मजले जिन्याने चढत उतरत होते.लिफ्ट साठी थांबायला कोणाला पेशन्स नव्हता. इकडे ९,९ मजल्याच्या रेसिडेन्शिअल बिल्डिंग्स बिना लिफ्ट च्या पाहिल्यात. इथे राहणारे लोकं रोजच इतकी उतर चढ आरामात करत असतात.असो!
इथल्या कॅटरेक्ट डिपार्टमेन्ट ने तिसरा मजला पूर्णपणे व्यापला होता. या मजल्यावर ३ खोल्यांमधून ३ स्पेशलिस्ट्स होते..सॉरी होत्या. तिघी डॉक्टरणी चाळीशीतल्या वाटत होत्या. या विभागात रोजची ५०,६० ऑपरेशन्स होतात.
प्रेमळ,मृदू,हसरा चेहरा आणी स्वर असलेली माझी डॉक्टर्..तिचे नांव 'छांग पिंग' . तिचं नांव ओळखीच्या दुसर्‍या डॉक्टरने रेकमेंड केलं होतं.मात्र तिला इंग्लिश चा एक शब्द ही बोलता येत नव्हता. पर तपासणी झाली आणी याही वेळी वर्डिक्ट मधे काही बदल झाला नाही Sad . उलट तिने लवकरात लवकर सर्जरी उरकून टाकण्यास सांगितले. त्याप्रमाने मी १२ ऑक्टोबर डेट ठरवली आणी घरी परतले.
मला लहानपणापासून इंजेक्शन,हॉस्पिटल इ.बद्दल प्रचंड भीती आहे. वडिल आय स्पेशलिस्ट होते. लहानपणी त्यांनी मला ते करत असलेले कॅटरेक्ट ऑपरेशन दाखवायला त्यांच्या हॉस्पिटलच्या थिएटर मधे घेऊन गेले होते.पण त्याचा काहीही उपयोग झाला नव्हता.
आता मात्र माझा मलाच निर्णय घ्यावाच लागला.. बकरे की मां,कबतक... त्याप्रमाणे १२ ऑक्टोबर ला एक आणी १३ ला दुसर्‍या डोळ्याचं उरकून टाकायच ठरवलं.
त्याप्रमाणे १२ ला रिकाम्या पोटावर ,सकाळी ८ वाजता हॉस्पिटल ला पोचले. बरोबर नवरा आणी माझी एक चायनीज मैत्रीण ही होते. तिथे रक्त तपासणी, ECG,X RAY इ.इ. काढण्यासाठी मैलोगणती लांब रांगा होत्या.पण माझी केस त्याच दुपारला असल्याने डॉ नी मला माझ्याबरोबर तिची इन्ग्लिश येणारी ३rd year ला असलेली एक विद्यार्थिनी दिली होती. मग मी ,माझी चायनीज मैत्रीण आणी ती विद्यार्थिनी अशी वरात या बिल्डिंग मधून त्या बिल्डिंग मधे, या डिपार्टमेंमधून त्या डिपार्टमेंट मधे पायी पायी निघाली.
शेवटी सर्व आटपून आय वॉशिंग डिपार्टमेंटमधे आलो. तिथे मला सलून मधे केस धुण्यासाठी असतात तश्या खुर्चीवर बसवले.तेव्हढ्यात एक पोरगेलीशी नर्स इंजेक्शन कम दाभणरूपी काहीतरी घेऊन आली. कसलातरी फवारा डोळ्यात मारला. मग त्या तीक्ष्ण दाभणाने डोळ्याचे सर्व काने कोपरे उलटून सुलटून काही इन्फेक्शन नसल्याची खात्री करून घेतली . मग एका डोळे तपासणार्‍या मशिनीसमोर बसवले.मशिनीतूनच दोन्ही डोळ्यात पिचकारीने कसलेले द्रव्य फुस्सकन स्प्रे केले.डोळे स्वच्छ झाले. मग एक तासापास्न चाललेली आमची वरात एकदाची येऊन डॉ. कडे थांबली.
मग तिने सर्व रिपोर्ट चेक केले. सर्व नॉर्मल असल्याने दुपारी १ वाजता जेऊन परत यायला सांगितले.
दुपारी १ वाजता आम्ही तिसर्‍याच एका बिल्डिंग मधे १५ व्या मजल्यावर गेलो. इथे मला माझी खोली दाखवण्यात आली. एका १५ बाय १५ च्या खोलीत साडे तीन बाय सव्वा पाच असे ४ लोखंडी बेड्स टाकलेले होते . त्यांवर स्वच्छ निळ्या चादरी,उश्या आणी स्वच्छ पण सरसकट एकाच मापाचा पायजामा आणी लांब बाह्याचा शर्ट प्लॅस्टिक आवरणात पॅक करून ठेवलेला होता. प्रत्येक बेड च्या डोक्याच्या बाजूला त्या त्या पेशंट च्या नांवाचा बोर्ड लटकवलेला होता. (या खोलीत एक भलेमोठे वॉशरूम ही होते. चायनाच्या पब्लिक वॉशरूम्स ची एक खासियत असते.. बहुतेकांच्या दारांना कड्याच नसतात.. आत गाणं म्हणण्याचं ऑप्शन ही नस्तं.. Uhoh
मला माझ्या बेडपाशी नर्स घेऊन आली. माझ्याबरोबरचे इतर तीन पेशंट्स सत्तरीच्या आजी होत्या. त्या प्रत्येकांबरोबर ३,४ घरचे लोकं आलेले होते आणी खोलीभर विखुरलेल्या के जी च्या वर्गातल्यासारख्या अतिशय छोट्या स्टुलांवर(आरामात) बसले होते. लकिली माझ्या नवर्‍याला एक मोठी खुर्ची कोपर्‍यात ठेवलेली दिसली आणी त्याने तिच्यावर झटकन कब्जा जमवला.
खोलीत आल्यावर सर्व पेशंट्स्नी हे निळे सूट चढवले आणी आम्ही पुन्हा कॉरिडोरमधून एका लहान खोलीत जाण्यासाठी परत क्यू मधे लागलो. त्या खोलीत एक पोरगेलिशी नर्स एकेकाला एका आरामखुर्चीत बसवून कसकसली द्रव्ये ओतून ज्या डोळ्याचे ऑप्रेशन व्हायचे असेल तो डोळा स्वच्छ धुवून काढत होती. धुतलेल्या डोळ्यावर पांढरे स्वच्छ ,जंतूनाशक कव्हर लावून झाकून टाकत होती. हळूहळू आम्ही सर्व पेशंट्स ,पायरट्स दिसू लागलो.
पुन्हा आमची रांग,एका गार्डबरोबर एका भल्या मोठ्या लिफ्टमधून तळमजल्यावर गेली. मग साधारण अर्ध्या किलोमीटर लांबीचा कॉरीडॉर क्रॉस करून दुसर्‍या इमारतीत आठव्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटर जवळ आली. या थिएटरला भले मोठे ऑटोमेटिक,केवळ कोड दाबल्यावर सरकणारे दार होते.
इथे मात्र फक्त पेशंट आणी डॉक्टर्स ना शिरकाव होता.
परत एका खोलीत छोट्या छोट्या खुर्च्यांवर बसलो. मग परत ओळीने डोळा धुण्याचा कार्यक्रम झाला. आता प्रत्येक पेशंट च्या डोक्यावर प्लॅस्टिकच्या शॉवर कॅप्स आल्या. मग एकेका वेळी ३,३ पेशंट थिएटरमधे नेण्यात आले. ऑप. थिएटर अतिशय चकचकीत स्वच्छ,अद्यावत ,पांढरं शुभ्र,मॉडर्न इक्विप्मेंट्सनी सज्ज असून तिन्ही डॉक्टर्स हिरव्या युनिफॉर्ममधे सज्ज होते.
मला एका ऑप. टेबलावर पडायला सांगितले.त्या टेबलावर पडताक्षणी त्या जागेबद्दलची असलेली भीती परत जड जड गोळ्यांचं रूप घेऊन सर्वांगावर दाटून आली. खोटी खोटी हिम्मत दाखवत मी पडले खरी...पण हे क्क्व्वाय!!! नर्सेसनी माझे हात कडेला वेल्क्रो च्या पट्ट्याने बांधून टाकले.. आता माझ्या (दुष्ट!! दुष्ट)claustrophobia ने डोकं काढायला सुरुवात केली. तेव्हढ्यात कुणीतरी एक जाडीजुडी, एक भोक असलेली ,हिरव्या रंगाची चादर माझ्या डोक्यापासून पायापर्यन्त घातली...त्याबरोब्बर मी हात पाय जोरजोरात झाडले, हात सोडवून टाकले, चादर फेकून दिली आणी जीवाच्या आकांताने चायनीज मधे बोंब मारायला सुरुवात केली..,' मला श्वास घेता येत नाही>>>>ये' हा प्रकार पाहून माझी डॉ. धावत आली. तिचा आवाज खरोखरीच शांत,प्रेमळ आणी धीर देणारा होता. माझ्याशी हळूहळू बोलत तिने मला शांत केले. माझ्या नाकात ऑक्सीजनच्या नळ्या लावल्या. मलाही नीट श्वास घेता येऊ लागला. तिने परत ती चादर माझ्यावर ताणली. हात बांधले. चादरीला असलेल्या भोकातून तिला फक्त माझा एक डोळा दिसत होता.. मला उगीचच तेंव्हा अर्जुनाचा बाण आणी पक्ष्याच्या डोळ्याची गोष्ट आठवली..
तिने डोळा पूर्ण ताणून चपळाईने दोन्हीकडे क्लिप्स लावून लॉक केला. डोळ्यात anesthetic ड्रॉप्स टाकले.
पूर्ण वेळ ती मला करत असलेली प्रत्येक अ‍ॅक्शन सांगत होती.
कॅटरेक्ट म्हणजे आपल्या डोळ्याच्या लेन्सवर आलेले पातळ कव्हर ,ज्यामुळे आपल्याला सर्व अंधुक दिसू लागते.
कॉर्निआच्या साईडला एक अतिशय सूक्ष्म कट देऊन त्यातून 'phaco प्रोब' हे अल्ट्रासोनिक instrument डोळ्याच्या आत घालून वायब्रेशन ने कॅटरॅक्ट चे अति सूक्ष्म (३ ते ४ ) तुकडे केले जातात. मग हे कण सक्शन ने बाहेर काढले जातात. मग राहिलेले softer outer lens cortex फक्त सक्शन नेच काढले जाते.
मग The foldable Intraocular Lens Implants (IOL)- It is then inserted and placed in the posterior chamber in the capsular bag, made of silicone or acrylic of appropriate power is folded either using a holder/folder, or a proprietary insertion device provided along with the IOL.
हे सर्व व्हायला फक्त दहा मिनिटाचा अवधी लागला.. एका लाल रंगाच्या झाकणाने डोळ्याला हलकेच पॅक करून टाकले.
पुन्हा वरात.. पण यावेळी पेशंट ला व्हील चेअर वर बसवून एक आनंदी म्हातारा व्हीलचेअर काळजीपूर्वक ढकलत आठव्या मजल्यावरून ,तळमजला..पुन्हा तो लांब कॉरिडॉर्,पुन्हा दुसर्‍या बिल्डिन्गमधला १५ वा मजला..क्रॉस करत थेट माझ्याकरता असलेल्या बेडपर्यन्त घेऊन आला..
आत्तापर्यन्त मला फार दमायला झालं होतं.. एक दिव्य पार पडल्यामुळे अचानक वीक वाटत होतं,थोडं डोक ही दुखत होतं.. आणी नर्सने पण छानशी झोप काढायला फर्मावलं होतं.. त्याप्रमाणे बेडवर पडले..
थोड्याच वेळात एकेक जखमी सोल्जर्स रूमवर परत येऊ लागले.
मला वाटलं सर्व शान्तपणे झोप काढतील.. पण कस्चं काय .. त्यांच्या नातेवाईकांनी येऊन तिथे एकच गलबला चालू केला. सर्वच जोरजोरात बोलू लागले,झालच तर पेशंट आज्या ही त्या बोलण्यात भाग घेऊ लागल्या की!!! अर्रे देवा.. आता कसची शांत झोप मिळणार... मी लगेच उठले आणी बाहेर जाऊन नर्सच्या डोक्याशी कटकट सुरू केली कि मला घरी जायचेय.. तिनी मला स्ट्रिक्टली फर्मावले कि आज ची रात्र इथेच राहणं कंपलसरीये.. मग मात्र मी नेटाने नाही म्हटले..शेवटी माझी गोड डाँ नी माझं म्हणणं मान्य केलं आणी दुसर्‍या दिवशी सकाळी येऊन पट्टी काढून घ्यायला सांगितले.
दुसर्‍या दिवशी सकाळी ७.३० ला हजर झालो. परत लायनीत लागलो.. एकेकाची डोळे तपासणी झाली. माझंही सर्व नीट झालेलं होतं ऑप. म्हणून लगेच त्याच दुपारी दुसर्‍या डोळ्याचही करून टाकायच डॉ.ने ठरवून टाकले.. भारतात माझ्या बहिणीला प्रचंड टेन्शन आलेलं कि मी एकदम दोन दिवसात दोन्ही डोळ्यांच ऑप. सहन कर्णार कशी म्हणून.. पण मी तिला समजावलं कि हे मी आणलेलं उस्न अवसान गळून पडण्याआधी मलाही आटपून टाकायच म्हणून..
झालं दुसर्‍या दिवशी दुसर्‍या डोळ्याचही निपटलं.. सेम ष्टोरी.. Happy
घरी जाण्यापूर्वी सर्व सूचना आणी औषधं घेतली..आणी सुखाने घरी गेले..

माझ्या ऑपरेशनमुळे मला चीन चा साम्यवाद जवळून अनुभवायला मिळाला. नंबर घ्यायची लाईन असो,डॉक्टरांना भेटायची रांग असो नाहीतर कॅशियर जवळ पैसे भरायचा क्यू असो वा औषधं कलेक्ट करायला खूप वेळ ताटकळणं असो.. कोणत्याही ठिकाणी गरीब-श्रीमंत यात कुठेही भेदभाव पाहायला मिळाला नाही. साध्या प्यून पासून ते नर्स , स्पेशालिस्ट डॉक्टर कडून प्रत्येक पेशंटला सारखीच, अत्यंत सौजन्यपूर्ण व प्रेमळ वागणूक दिली गेली. एकेका रूम मधे टाकलेल्या ४ बेड्स वर मर्सिडिज मधून आलेल्या रुग्णाशेजारी अगदी भाजीवाला, शेतकरी सुद्धा पाहायला मिळाला. ते पाहून आपल्याकडली, देवाचे दर्शन ही पैशाच्या बळावर विकत घेणार्‍या मंडळी ची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही. हम्म्म्म्म!!
ऑप. साठी झालेला खर्च भारतातील एका मावशींना कळला तर त्या म्हणाल्या..'अग्गोबाई,इतक्या पैशात तुला इकडे ४,५ डोळे मिळाले अस्ते की!!"
त्यांना मी म्हटलं कि मावश्ये.. मला दोनच डोळे पुरेत गं.. पण नवीन दृष्टी बरोबर हा केव्हढा अनोखा अनुभव गाठीशी आला..तो कितीतरी अनमोल आहे, नै का??अशी साठा उत्तराची कहाणी दोन दिवसात संपली...
नंतरच फॉलो अप चालू राहील एक दो महिने..

गुलमोहर: 

वर्षु, माझ्या कल्पने प्रमाणे हे तुमच पहिलच ललित. या आधी तुमचे ट्रीपचे फोटो आणि त्यासोबतचे लिखाण होते.

मराठीत एक इष्टापत्ती नावाचा शब्द आहे. या शत्रक्रियेनंतर तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे का ? लेखन इतके सुंदर आहे की सर्व दृष्य डोळ्यासमोर उभे राहिले.

लिहीत रहा, लिहीत रहा.

अभिनंदन. झाली ना सर्जरी व्यवस्थित ? Happy
मस्त लिहीले आहे अगदी. नितीनला अनुमोदन.

आमच्याकडेही जपानातील एका सर्जरीचा आपल्यासारखाच अनुभव आहे. पण न वाचता येणार्‍या फॉर्मस वर सही करताना मात्र हात कापत होते. Happy

काय हे, सर्जरीलाही लायनीत उभं Uhoh
व्यवस्थित पार पडल्याबद्दल अभिनंदन.

माबोवर व्यवस्थित वाचता येऊ लागलंय ना, ते महत्वाचं. Proud

सायो Proud अगदी अगदी..
लायनीत उभं राहिल्यावरच इकडल्या प्रचंड लोकसंख्येची कल्पना येते स्पष्ट
धन्स रचु, रेव्यु... व्हय व्ह्यय.. त्या पूर्ण हॉस्पिटलातली मीच पहिली फॉरेनर आणी मर्‍हाठी पेशंट होते इतक्या वर्षात..

@ बित्तुबंगा.. खरोखरच दिव्यदृष्टी प्राप्त झाल्यासारखं वाटतंय Lol
मला तर वाटलं होतं आता मला भिंतीपलीकडलही दिसू लागेल कि काय

चीन मधल्या साम्यवादावरती, तिथल्या साम्यवादी जीवन पद्धती बद्दल बरच वाचलं होतं; पण हे अगदी फर्स्ट हँड नॉलेज झालं गं Happy
मस्त लिहिलयस. अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं सगळं Happy
काळजी घे. अन हो दिव्यदृष्टी बद्दल अभिनंदनही Wink

वर्षू.. छान लिहिलं आहेस. तरीच मी तुला भेटायला आलो होतो तेव्हा .. सुरुवात होती काय याची?

तेरे मस्त मस्त दो नैनो पे वोह चष्मा.. ये बात कुछ हजम नही हुई.. Wink Light 1

तेव्हाही तू बोलली होतीस मला चष्म्याशिवाय वाचणं कठीण जातं. पण आता परत एकदम टकाटक नैन.. ना !

वर्षुताई, सह्हीच लिहीलयस...
काळजी घे गं Happy

माबोवर व्यवस्थित वाचता येऊ लागलंय ना, ते महत्वाचं<<<< तुम्हाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे <<< ..... आता वर्षुताई सगळ्या ड्यु आयड्यांचे बींग फोडणार Lol

छान वर्णन वर्षू... पण इथे आमच्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी इतका सव्यापसव्य करावा लागत नाही. पूर्णपणे मोफत केली जाते शस्त्रक्रिया.... व तपासणी आणि इनवेस्टीगेशन्स २ दिवसांत पूर्ण करुन ऑपरेशनची तारीख दिली जाते (१ ते दिड आठवड्यानंतरची ) व सकाळी ऑपरेशन करुन ३.३० ते ४.०० वाजता घरी सोडले जाते.

असो,खूप चांगला अनुभव शेअर केलास ..धन्यवाद. Happy

@ सुक्या.. 'तरीच मी तुला भेटायला आलो होतो तेव्हा ...' तेंव्हा काय रे???
तू इतका बारिक आहेस कि मला दिसेनाच एक्दम कोण आलय भेटायला ते Proud
तेंव्हा कॅटरेक्ट नव्हता झाला काय!!!

@ स्वप्ना -तुषार-- अगं लेसर वापरूनच केलं Happy डीटेल इन्फो
Lasers are beams of energy which can be targeted very accurately. The YAG laser is a focused laser with very low energy levels which can be used to cut structures inside the eye without any risk to the other parts of the eye. The doctor aims the laser exactly onto the posterior lens capsule in order to cut away a small circle shaped area.

This leaves some of the capsule to keep the lens in place (like a cuff around the lens) but removes enough to allow the light to pass directly through the eye to the retina. The very small part of the lens capsule which is cut away falls harmlessly to the bottom of the inside of the eye.

Under an operating microscope, at least one small incision is made into the eye. The surgeon will then remove your cloudy lens (the cataract).

This procedure can be performed using an ultrasound-driven instrument that "sonically" breaks up the cataract (phacoemulsification) as it is suctioned (aspirated) out of the eye.

डॉ.कैलास गायकवाड | 8 November, 2010 - 08:27 नवीन

छान वर्णन वर्षू... पण इथे आमच्याकडे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी इतका सव्यापसव्य करावा लागत नाही. पूर्णपणे मोफत केली जाते शस्त्रक्रिया..

हो डॉक आपला भारत प्रसिद्द आहे त्यासाठी... ३-४ वर्षांपुर्वी मोट्ठी बातमी होती ती.... पण ती फक्त त्यासाठी भारतात कशी येयिल Biggrin

अनुभव चांगला आहे पण भारतात चांगली नेत्र चिकित्सा उपलब्ध आहे. एल वी प्रसाद आय इन्स्टिटयूट हैद्राबाद, शंकर नेत्रालय चेन्नै अतिशय प्रसिद्ध आहेत. मी एल वी प्रसाद मध्ये स्वयंसेवकचे काम केले आहे. तिथे ५०% केसेस चॅरिटीच्या व पूर्ण पणे पेशंटला फ्री असतात. प्रत्येक अनुभवाची भारतातील वाइट अनुभवाशीं सांगड घालायची हे पट्ले नाही. India rocks. आता जर त्या देशाला आपले म्हट्ले आहे तर मग सारखी तुलना का?

lvpei.org वर माहिती मिळेल.

छान लिहिलं आहेस वर्षू Happy
>>चायनाच्या पब्लिक वॉशरूम्स ची एक खासियत असते.. बहुतेकांच्या दारांना कड्याच नसतात.>> मला सुद्धा बिजिंगला गेल्यावर हे बघुन Uhoh असंच झालं होतं Happy

Pages