राज-ए-desert

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

पिटसबर्गहून फिनिक्सला आले... हिरव्या गर्द जंगलातून रखरखीत वाळवंटात... या वाळवंटाची सवय व्हायला जरा वेळ लागला खरा..पण जितकी जास्त भटकले तसे तसे ह्या वाळवंटाचे 'राझ' हळूहळू उमगत गेले.

रेगिस्तानकी एक सच्चाई है.. यहा बहुत कुछ छुपा हुवा है !
जो होता है वो दिखता नही !
जो दिखता है वो होता नही !

अ‍ॅरिझोनाच्या वाळवंटातनं फिरताना अनेक जागांनी मला ह्या ओळींची आठवण करून दिलीये.... त्यातलीच एक जागा म्हणजे अ‍ॅन्टलोप कॅनियन. युटा-अ‍ॅरिझोना सीमारेषेवरची !
इथे फोटो काढणं जरा tricky आहे.. कारण सगळा सूर्यकिरणांचा खेळ... आणि वाळवंटातला सूर्य तुमच्या कॅमे-यावर कोणत्याही क्षणी प्रचंड नाराज होऊ शकतो !
सुर्यकिरणांशी खेळण्याचा (फिल्टर न वापरता!) हा एक प्रयत्न...

DSC_1708f.jpg

For the original photo please click http://farm2.static.flickr.com/1119/5149911174_b4d2d249bf_b.jpg

सुंदर फोटो, (पण एकच का ?) अशा ठिकाणी हमखास पाणी सापडते आणि त्याचा निळा हिरवा रंग, फारच सुंदर दिसतो. त्याचा एखादा फोटो ? !

जबरी!!

अप्रतीम कलाकारी! पण हे "राज" असं हवंय का? त्या ज च्या खाली नुक्ता आल्यामुळे त्याचा उच्चार राझ असा वाटतो पण तो ज आणि झच्या मधला आहे. पण लिहिताना राज असं असावं.

वाळवंटात घडणार्‍या चित्रपटासाठी उत्तम फ्रेम... ऊन पडलेल्या भागात एक सावली आली माणसाची की आतल्या बाजूला असलेल्या हिरवीणीच्या भयावह चेहर्‍याचा क्लोजअप..

फोटो जबरीच..

फोटो आवडल्याचं सांगीतल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद !
मानुषी, कदाचित रा़झ लिहिण्यात माझी चूक झाली असायची शक्यता आहे.. मी शब्द कसा लिहितात ते नक्की पाहीन आणि त्याप्रमाणे चूक (झाली असल्यास!) दुरुस्त करीन Happy

नंद्या, फोटोमधे नंतर modifications करून तो आहे त्यापेक्षा खूप चांगला/परिणामकारक होऊ शकतो/शकेल हे अगदी मान्य आहे. पण मला फोटो digitally modify करायला (अगदी crop करायला सुद्धा) नाही आवडत व्यक्तीश: ! कारण हे सगळे after thoughts/post session analysis आहे.
फोटो काढताना नजर, दिल, दिमाग (जास्त वेळा 'दिल' च माझ्या बाबतीत!) आणि कॅमेरा यांच्यातलं नातं, संवाद खरं तर 'त्या क्षणी" जसा घडला ते अनुभवणं म्हणजे फोटो काढणं - निदान माझ्यासाठी तरी !
पण होय, तू सुचवलेले बदल नक्की करून पाहीन Happy

दिनेश, मला नाही हो पाणी दिसलं ह्या ठिकाणी... पुढच्या वेळी गेले इथे कधी तर शोधायचा प्रयत्न करीन Happy

जबरी!

पण मला फोटो digitally modify करायला (अगदी crop करायला सुद्धा) नाही आवडत व्यक्तीश: ! कारण हे सगळे after thoughts/post session analysis आहे.>>>> हे फार आवडले.