अंदाज ढापण्याचा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मूळ गझल : इलाही जमादारांची सुरेख गझल अंदाज आरश्याचा

अंदाज ढापण्याचा, वाटे खरा असावा
बहुतेक सुंदरीचा, तो चेहरा असावा

जखमा कश्या हजारो झाल्यात थोबड्याला
केलेत वार ज्याने तो वस्तरा असावा

सुंदर सुरेख मुखडा, डोळे किती टपोरे
आवाज हाय ’राणी’, का घोगरा असावा

पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा

बढती मला न मिळता त्याला कशी मिळाली
नक्कीच बॉसचा ह्या, तो सोयरा असावा

संतूर साबणाने न्हावे कशास राणी
वाटे तुझा गं भाऊ, जो छोकरा असावा

दिसते तसेच नसते, जग हे म्हणून फसते
वाटेल मोगरा जो, तो धोतरा असावा

रक्तामधे पसरते, साखर तुझ्या ’मिल्या’ही
दाही बश्या रव्याचा तो तर शिरा असावा

विषय: 
प्रकार: 

वाह मिल्या बढीया !! संतूर आणिक शिरा खासच !!

कायच्या कायच. आणि राणी हल्ली मार्गो साबणाने नहाते रे. Wink

मुळची गझल भीमराव पांचाळें नी गायलेली मी ऐकली आहे. हे विडंबन त्या गझलसारखेच मस्त जमले आहे.
संतुर साबणाचा उल्लेख का करण्यात आला आहे हे थोडेथोडे लक्षात आले आहे माझ्या Happy

ती 'आवाज घोगरा' वाली राणी वेगळी आणि ही संतूर वाली राणी वेगळी. Happy

मोगरा आणि धोतरा काहीच्या काही अगदी.... Lol

    पेला आणि मदिरा बुधवारकरांसाठी का? Wink

    सही रे मिल्या....
    ==================
    ढिंग चँग ढिचँग... ढिंग चँग ढिचँग...

    सहीच रे...........
    एकदम आवडल................. Happy

    मिल्या ! मस्तच रे ! पण मार पडला का 'राणी' कडून ?

    >> पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
    ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा >>

    बेवड्याच्या ओठात "झरा" नसून "झुरका" असतो. Happy

    विडंबन मस्तच जमले आहे.

    जबरी म्हणजे जबरी म्हणजे... जबरीच.
    मतला, मक्ता (म्हंजे डायाबिटीस का रे मिल्या भाऊ?), धोतरा, सोयरा.. आरपार!

    हो! आणि राणी....'घोगरा' सुद्धा.... फक्तं मीच जरा लेट करंट ह्यावेळी.

    क्या बात है! मस्त विडंबन!
    पेल्यामधे उतरली, मदिरा तहानलेली
    ओठात बेवड्याच्या, बहुधा झरा असावा >>>>>>