आठवण

Submitted by मनोमयी on 30 October, 2010 - 03:59

तुला पाहीलं चाफ्याच्या फांदीवर
आणि भूतकाळात हरवले
डोळ्यापुढील अंधारलेल्या आठवणींनी पछाडले
इथेच हिंदोळ्यावर झुलताना सारे दिवस मावळले
याच बागेत याच चाफ्याखाली माझे बालपण हरवले
हसत-खिदळत बागडताना आपली मैत्री जुळलेली
चाफ्यालाही बहर येऊन कळीन-कळी फुललेली
याच फांदीवर बसुन तू गायचाच रोज गाणी
सुख-दू:खात आपणच शिंपल झाडाला घालुन अश्रूंच पाणी
मी झाडाखाली आल्यावर रोज फांदी हलवायचास
वेचलेल्या जागेत पुन्हा फुलं पाडायचास
अशाच एका दिवशी ती तुझ्या जीवनात आली
ओबड-धोबड चाफ्याची फांदी सुंदर घरट्याने ल्याली
दिवसा मागुन दिवस गेले काळा मागुन काळ गेला
आणि एकदा घरट्यामद्धे चिमुकल्यांचा चिवचिवाट झाला
पण नियतीला आनंद पाहवत नाही, वादळ घेऊन आली
त्या सुकुमार,निष्पाप पिलांचा जीव घेऊन गेली
तेंव्हा पासून दिसला नाहीस कधीच तू मला
वसंता वर वसंत आले अनं ग्रिष्मात चाफाही गळून गेला
अजूनही आठवते ती दू:ख भरलेली कहाणी
आज पुन्हा दिसलास चाफ्यावर म्हणून डोळ्यात आलय पाणी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान. Happy