अंधारातील सूर्य - भाग १ - तारे जमि पर चा खरा हीरो!

Submitted by चाणक्य. on 30 October, 2010 - 02:12

" मला असे वाटते कि आम्हि असे काहि चालु केले आहे कि त्याचा परिणाम पाण्यात उठणार्या तरंगाप्रमाणे व्हावा. एक तरंग दुसर्याला जन्म देइल, दुसरा तिसर्याला. मी फक्त असाच बाहेरच्या तरंगातला कोणीतरि शोधतो आणी हे तरंग वाढवायचा प्रयत्न करतो "

तेरा वर्षाचा जोन हेन्री लैम्बीन ला अस्थमाचे निदान करण्यात आले. अस्थमा मधे bronchial tubes ज्या फुफ्फुसामधे हवा घेउन जातात त्या दबल्या जातात. प्रत्येक वर्षामधले काहि दिवस त्याला होस्पिटल्मधे काढावे लागतात.हे पुरेसे नव्हते म्हणुन कि काय, त्याला dyslexia चे हि निदान झाले.

असे असुनहि अवकाश अभियंता बनण्याचे स्वप्न असलेल्या जोनने अतुलनीय संयम आणी धैर्य दाखवीले. कित्येक तास आणी दिवस संशोधन करुन जोन हेन्री लैम्बीन या सहाव्या इयत्तेत शिकणार्या मुलाने kids extreme हा उपक्रम चालु केला ज्याच्यामधुन अस्थमा आणी dyslexia असलेल्या मुलांनी इतर मुलांना शिकवायला सुरवात केली. 3d learner foundation च्या मदतीने त्याने शाळा/कोलेजेस मधुन presentations दिली ज्याच्यामधुन अस्थमा आवक्यात ठेवण्यासाठी काय करायचे ह्याचे प्रक्षिक्षण जोन देतो, dyslexia चा एक देणगी म्हणुन वापर करुन स्वतामधील गुण कसे विकसित करायचे याबद्दल त्याने पक्षिक्षण देतो.

जोनने आतापर्यत ५००० मुलांना मदत केली आहे. अस्थमा आणी dyslexia वर १६ research papers प्रसिद्ध केले आहेत. आतापर्यत कित्येक अमेरिकन आणी जागतीक पारितोषिके आणी कौतुक मिळवलेला जोन मात्र स्व्ताच्या कामात व्य्स्त आहे.

गुलमोहर: 

मी हे प्रसिद्ध केले. नंतर आताच बेफिकीर यांच्या कादंबरिवरिल प्रतिसाद वाचले - शेवटच्या भागातील - old munk
आणी वाइट वाटले - मुख्य म्हणजे त्यांचा admin ला लिहिलेला प्रतिसाद पाहुन. आता प्रश्न वाटतो कि पुढचे भाग लिहावेत का नको ? का माझ्याहि या लेखांवर असाच हल्ला होइल "कंपुंकडुन " ? हल्ला झाला तरि या मालिकेतील लेखांवर झाल्यास वाइट वाटेल कारण ही माणसे खरेच फार मोठी आहेत.
असो.!

गणू,अतिशय छान माहीती.

जोन हेन्री लैम्बीन च्या किड्स एक्स्ट्रीम विषयी सविस्तर वाचायला खूप आवडेल.

लेखांवरच्या हल्ल्या ची पर्वा करु नका. तुमचे लेख म्हणजे कादंबरी नाहिये... Happy

गणु लहरोंसे डरकर नौका पार नही होती........ दुसरे म्हणजे ज्या दगडाला छिन्ने आणि हातोडी चे भय वाटते त्यचे मुर्तित रुपांतर होणे शक्य नाही (माफ करा तुम्हाला दगड म्हणत नाहीये मी, गैरसमज नसावा)

छान माहिती आहे.

आता प्रश्न वाटतो कि पुढचे भाग लिहावेत का नको ? का माझ्याहि या लेखांवर असाच हल्ला होइल "कंपुंकडुन " ? हल्ला झाला तरि या मालिकेतील लेखांवर झाल्यास वाइट वाटेल कारण ही माणसे खरेच फार मोठी आहेत.
असो.!

याचा संबंध काय ते कळले नाही. मायबोलीवर माहितीप्रद लेखमाला ब-याच जणांच्या सुरू आहेत. ज्याला ज्या विषयातली माहिती आहे तो ती देणार आणि वाचणारा वाचणार. यात हल्ला होण्याचा काय संबंध?? आता दिल्या गेलेल्या माहितीत काही तृटी असतील तर त्या प्रतिसादातुन दिसतील. त्याला हल्ला म्हणता येईल काय?

http://www.maayboli.com/node/20224?page=1#new

इथे बघा १० ते १६ वर्शाच्या मुलांसाठी चा ग्रूप आहे इथे पण पेस्ट करा. योग्य लोकांपरेन्त जाईल. चांगली माहिती देताय तर की.

याचा संबंध काय ते कळले नाही

माझ्या हरवलेल्या भारतीय या लेखावर असेच हल्ले झाले म्हणुन लिहिले आहे. मंदारच्या एका चारोळिविरुद्ध मी लिहिल्यामुळे त्या कंपुकडुन ते हल्ले झाले. आता मी काहिहि लिहिले तरि ते होइलच असे वाटते. अशा लोकांसाठी लेख काय आणी कादंबरी काय!. असो.

जोन हेन्री लैम्बीन च्या किड्स एक्स्ट्रीम विषयी सविस्तर वाचायला खूप आवडेल.
किड्स एक्स्ट्रीम ची साइट आहे. गुगल केल्यावर मिळेल. नाहि मिळाली तर मी लिंक पाठवतो. मी अमेरिकेत असताना माझे जोन बरोबर प्रत्यक्ष बोलणे झाले. - . भारतात त्याची presentations पाठवण्याचा प्रयत्न करत होतो मी. नंतर इकडे परत आलो आणी संबध तुटला.

http://www.extremekids.rs/

ही क्रोशियन भाषेतील साईट मिळाली...त्यामुळे समजू शकलो नाही.

आपण लिंक दिलीत तर बरं होईल. Happy

जॉन हेन्री विषयी,जास्त माहिती मिळाली नाही,परंतु थर्ड लर्नर्स फाउंडेशन ची वेबसाईट सापडली. बरीच उपयुक्त माहिती आहे.

http://www.3dlearner.com/

गणू..तुमचा लेख आवडला..अजून माहीती नक्कीच चालली असती..
तेवढ्यात तुमचाच तुम्हाला प्रतिसाद पाहिला....
तुम्हाला हौस आहे का एकदंरीत हल्ला ओढवून घेण्याची....
माहीतीपूर्ण लेखावर उगाच्या उगाच हल्ला करायला माबोवर काय दंगलखोर मंडळी येत नाहीत.
माझे तरी स्पष्ट मत आहे की हा प्रतिसाद टाकून तुम्ही आमंत्रण दिले आहे..त्यातून बेफिकीरजींचे नाव घेण्याचा काय संबंध..ते पूर्णपणे काल्पनिक कादंबरी लिहीत आहेत तुमचे तसे आहे का...
कैच्याकै...
अजून पुढचे भाग येऊ देत...नाही ते काहीतरी फाटे फोडत बसू नका....

चांगली माहीती दिली आहे..जरा त्रोटक वाटतेय.. अजुन वाढवता आले तर उत्तम!
रच्याकने आशुचँपला अनुमोदन. तो प्रतिसाद टाकायची गरज नव्हती.
असो.
लिहीत रहा. Happy

आशुचँपना अनुमोदन.

>>>मी हे प्रसिद्ध केले. नंतर आताच बेफिकीर यांच्या कादंबरिवरिल प्रतिसाद वाचले - शेवटच्या भागातील - old munk
आणी वाइट वाटले - मुख्य म्हणजे त्यांचा admin ला लिहिलेला प्रतिसाद पाहुन. आता प्रश्न वाटतो कि पुढचे भाग लिहावेत का नको ? का माझ्याहि या लेखांवर असाच हल्ला होइल "कंपुंकडुन " ? हल्ला झाला तरि या मालिकेतील लेखांवर झाल्यास वाइट वाटेल कारण ही माणसे खरेच फार मोठी आहेत.>>>

तुम्हांला खोड्या काढायची आवड असेल तर नक्कीच होतील इथेही वाद. आणि वर हे लिहून आहेच आवड हे दिसतंय.
बेफिकिर यांच्यावर २४ व्या भागावर झालेल्या वादामागची कारणं आणि मूळ माहित नसेल तर काहीही संदर्भ इथे न देणं योग्य.
तुम्हांला लेख लिहावासा वाटला तर नक्की लिहा. त्यावर सकारात्मक, नकारात्मक प्रतिसाद नक्कीच येणार. ते सहन होणार नसतील तर लिहिण्यापूर्वीच विचार करा.

आता प्रश्न वाटतो कि पुढचे भाग लिहावेत का नको ? का माझ्याहि या लेखांवर असाच हल्ला होइल "कंपुंकडुन " ? >>>

Lol

हास्यास्पद आणि निरर्थक पोस्ट. अगदी गणू ष्टाईल. लेख लिही, लेखात मालमसाला व्यवस्थित लिही उगाच इतर फिकिर का करतोस? की टिआरपी व्हावी म्हणून आधीच उपाययोजना? नाहीतरी लेखावर प्रतिक्रिया कमी अन ह्या वरिल पोस्टवरच जास्त आहेत.

उगाच मायबोलीकरांना बदनाम करण्यासाठीचे हे खोडसाळ पोस्ट आहे. जणू काही मायबोलीकर प्रत्येक लेखकुच्या (खासकरुन मालिका लिहिणार्‍यांच्या) विरोधात आहेत. ह्या मनोवॄत्तीचा निषेध.

तसाही लेख सुमार आहेच. कारण चांगला विषय पण खोलवर न मांडता दोन चार ओळीत बोळवण केली आहे. (विषय सुमार नाही!!) एखादा विषय कसा मांडावा ह्या विषयी इतर मायबोलीकरांचे लिखाण वाचावे हा अनाहुत सल्ला.

माझा अनुभव सांगतो गणु. इथे कोणाचा कंपु नाही. टोकाचे लिहले की हल्ला होणार. कालपर्यत आपला फॅन असलेला टोकाच्या लिखाणावर टिका करणार. कोणी मुद्दाम टिका करत असेल तर मात्र आज पर्यंत आपला संबंध नसलेला मायबोलीकर आपल्या बाजुने भांडतो. मायबोलिकरांनी ही टीका लेखकाने व्यक्तीगत घ्यायची नसते. शक्य झाल्यास आपली मते तपासुन पहायाची असतात.

मुळात बालसंगोपन व मुलांना वाढवायचे ह्या विषयाअंतर्गत पोस्ट केले तर ते योग्य जागी पडेल.
मूव ऑन फोक्स