राजाचे आगमन होत आहे हो.....................

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 29 October, 2010 - 05:55

पावसाच्या धारा संपत आल्या आणि लगेच फळांच्या राजाची चाहुल लागायला सुरवात झाली आहे.
Mohor.JPGmohor1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

दिनेशदा कोकीळ पक्षी दिसतात आता झाडावर पण अजुन त्यांनी गायला सुरुवात नाही केली. खुप वेळ आहे अजुन पावसाची चाहुल लागली की ते गातात.

खुप वेळ आहे अजुन पावसाची चाहुल लागली की ते गातात.

अगं ते वेगळे.. चातक बहुतेक. त्यांची हाळीही कोकिळेसारखीच असते. कोकिळ फक्त वसंतऋतुतच गातात ना......

तुझा फोटो एकदम मस्त हा.. मला आवडला.

मला हा मोहोराचा वास खूप आवडतो.

मलाही. चारपाच वर्षांपुर्वी जानेवारीत दुचाकी घेतल्यावर लाँग ड्राईवला म्हणुन खोपोलीपर्यंत गेले होते. पनवेल सोडल्यावर पुढच्या पुर्ण रस्त्यावर आंबेमोहोराचा धुंद वास भरुन राहिला होता. इथल्या प्रदुषणाची सवय असल्याने आधी लक्षात आले नाही वास कसला येतोय ते. मग पाहिले तर दुतर्फा आंबा बहरला होता. अगदी फुफ्फुसे भरुन वास घेत राहिले... Happy

कोकिळ बर्‍याच आधीपासून तयारी करतात. त्यांचे कूक कूक असे आवाज येत राहतात. शेवटची लकेर कुहु कुहु कुहु जमायला, बराच काळ जातो. ते साधारण मार्च एप्रिल मधे. (मग ते कावळ्यांची घरटी शोधायला लागतात. !)

सुंदर.. Happy
या कोकिळ पक्ष्यांनी माका वात आणलेला.. Sad सासरी घरासमोरच आंब्याची झाडे आसत मी प्रेग्नंट असताना प्रचंड झोप यायची अणि हे रोज भल्या पहाटे ५ पासुन ह्यांचे कुजन चालु व्हायचे आणि मग झोपेचे खोबरे अणि ९.३० नंतर ते चिडीचुप व्ह्यायचे ते दुपारी परत झोपेच्या वेळी सुरु.. Sad तसेच मला ह्या मोहोराच्या वासाने देखील मळमळायचे.. Sad पण आंबा हे माझे सगाळयत फेवरेट फळ.. मी तेव्हा अभ्रपुरा आंबे खाल्लेले तेच गुण पुर्णपणे लेकीत उतरलेत.. Happy

साधना, दिनेशदा मला वाटत नर कोकीळ गातो मादी कोकीळा गात नाही अस काहीतरी मी ऐकलय.

स्वाती, मस्तच वास असतो मोहराचा. आंब्याचा मोहोर शंकरालाही वाहतात आमच्याकडे.

मुक्तेश्वर, हा कलमी आहे म्हणुन एवढ्या लवकर आलाय. गावरानीला अजुन सुरवात नाही झाली यायला पंधरा एक दिवसांत त्यालाही येईल मोहोर.

रुपाली, मला आणि माझ्या लेकीलाही आंबे खुप आवडतात.

आंब्याचा मोहोर शंकरालाही वाहतात आमच्याकडे. >> जागुदी खयची गो तु? आमच्या कडेव वाहतात "मोहोर" शंकराक.. Happy

मलाही आंबा खुप आवडतो .. पण खाइन तर तुपाशी .... या न्यायाने केवळ देवगड हापुसच. Happy त्याचा तो केशरी रंगाचा घट्ट गर .. अहाहा .. तों.पा.सु.
बाय द वे गेल्या वर्षी पेपरात वाचले होते की दादरला हिंदु कॉलनीत एका झाडाला असाच लवकर मोहर येऊन दिवाळित फळ धरले होते. त्यानी ती दिवाळी मिठाई ऐवजी आंबे भेट देऊन साजरी केली.

सुरेख फोटो. आरे कॉलनी भागात चिकार झाडं असायची आंब्याची. रस्त्यावरून फिरताना इतकं मस्त वाटायचं तेंव्हा. कॉलेजच्या दिवसातल्या रंगी बेरंगी आठवणी जागा झाल्या फोटो पाहून!

मस्त फोटो , मलाही आवडतो मोहराचा वास , मोहरातनं निघालेल्या पिटुकल्या कैर्‍या ( कैर्‍या तरी कसं म्हणावं त्याला) मस्त दिसतात.

मस्तच!!!!

मोहरातनं निघालेल्या पिटुकल्या कैर्‍या ( कैर्‍या तरी कसं म्हणावं त्याला) मस्त दिसतात.>>>>श्री ला हापूस आंब्याचे मोदक Happy

मेघा आरए कॉलनी म्हणजे गोरेगावची ना ? तिथे कुठे राहत होतीस ?

श्री, योगेश लहान असताना असा कैर्‍या आलेला मोहोर पडला की मी त्या पिटुकल्या कैर्‍या खेळायला घ्यायचे. त्यांना आंब्याचा आकारही नसतो आलेला.

वर्षा धिर धर मार्च - एप्रिल मध्ये भरपुर आंबे येतील.

रुणुझुणू, सायली, सिंडरेला धन्यवाद.

भारतात सगळी फळे कशी मोसमी असतात नाही ? इथे आफ्रिकेत मी फेब्रुवारी मार्च मधे भरपूर जांभळे खाल्ली. आता आंबे आणि फणस खातोय !! इथे आंब्याला वर्षातून दोनतीन वेळा मोहोर येतो.

सुकी, सुमेधा धन्यवाद.

आर्या अग हा कलमी आंबा आहे आणि जात वेगळी आहे. तोतापुरीसारखा साधारण आकार असतो पण तोतापुरी नाही. त्यामुळे लवकर आलाय मोहोर. मागच्या वर्षी उशिरा आला होता आणि पावसात आंबे मिळाले होते. हापुस वगैरेंना अजुन नाही धरलाय मोहोर. पण पुढच्या महिन्यांपर्यंत धरेल.

दिनेशदा अफ्रिकेतल्या फळांना आपल्याकडच्या फळांसारखी गोडी असते का हो ?

जागू
आपले हापूस आंबे सोडले, तर बाकी सर्व फळे भारतातल्यापेक्षा मधुर चवीची असतात. अगदी जांभळे सुद्धा.
इथे अजूनही नैसर्गिक (ऑर्गॅनिक ) शेती करतात. फळे पिकल्याशिवाय झाडावरुन तोडत नाहीत.
शिवाय भारतात न मिळणारी, अनोखी फळे पण मिळतात इथे.

अरे वा. आपल्याकडे हल्ली संकरीत करण्याच प्रमाण खुप वाढलय. त्यामुळे फळाचा आकार मोठा झालाय पण गोडी मात्र कमी झालेय.