शकुन

Submitted by जया एम on 27 October, 2010 - 02:15

शकुन

तुझ्या आवर्ती डोहाचा थांग लागता लागेना
जीव वाळवंट झाला माझी तहान भागेना

निघे स्वप्नांचा काफिला, वाट सरता सरेना
पुण्याईने अस्तित्वाचा कुंभ भरता भरेना

पोथी जन्माची वाचता मृत्यू शकुन सांगतो
कान्हा देवकीचा यशोदेच्या अंगणी रांगतो

देह वाहून थकला पूर्वसंचिताचे भार
होती बंद माझे डोळे, तुझे उघडता द्वार

गुलमोहर: