माणूस

Submitted by निलेश उजाल on 25 October, 2010 - 05:01

मित्रहो नमस्कार,

मी निलेश उजाळ.माझे वय २२ वर्षे आहे.आज मी तुमच्या समोर आपल्यामधील एक वेगळ्या प्रकारचा माणूस या विषयावर काही माझे विचार मांडणार आहे.जे आजपर्यंत माझ्या प्रत्यक्ष दिसण्यात,जाणण्यात आले आहेत.

आज या विज्ञान युगात माणसे खुप व्यस्त झाली आहेत आणि त्या व्यस्ततेत त्याची गरज बनलेला त्यांचा साखा म्हणजे संगणक.म्हणतात कि परिस्थिती बदलली कि माणसाचा स्वभाव सुध्दा बदलतो पण असं मुळीच झालेलं नाही.वेळ बदलली,काळ बदलला,जग बदलला पण माणसाचे विचार काहि बदलले नाहित आजही आपण अंधश्रध्दा,रुढी-परंपरांमध्ये अडकलेलो आहोत.वाढत्या शिक्षणप्रणालीचा आपल्यावर जराही फरक पडलेला दिसत नाही.मग कशासाठी हे शिक्षण घ्यायचे?उगाचा पैसा खर्च करण्यासाठी,कि काहि काम नाही म्हणून वेळ निघुन जावा म्हणून्?आज शासनाने आपल्यासाठी कित्येक सुविधा चालु केल्या आहेत पण त्याचा फायदा किती जण घेतात?मोजकेच.आपल्यामध्ये एक गोष्ट मात्र खास आहे आणि तीचा उपयोग करायला आपन कधीच विसरत नाही,ती म्हणजे दुसर्‍याची निंदा करणे,थट्टा करणे,दुसर्‍याच्या यशावर हसणे,गरिबाला त्रास देणे हे गुण आपण कधी मुळीच विसरत नाही.

पण आजच्या युगात काहि अशीही माणसे आहेत कि सदैव दुसर्‍यांसाठीच जगतात.दुसर्‍याच्या सुखात आपले सुख त्यांना दिसतं.मग अशा माणसांना आपण काय म्हणायचं देव कि साधारण पुरुष?पुरर्विची माणसे एकनिष्ठ असायची,आपल्या मतांशी ठाम असायची पण आज पावलोपावली आपले विचार बदलणारी माणसे ठीक-ठीकाणी मिळतील.पण एकमेका साह्य करणारे फार कमी.

मी नेहमी १ तासांचा ट्रेनचा प्रवास करतो आणि याच प्रवासात मला एक मित्र मिळाला होता त्याची नी माझी चांगली ३ वर्षांची मैत्री होती.तो भजनाचा बुवा होता.मी त्याला एकेरी नावाने कधीच आवाज देत नव्हतो.सरळ बुवाच म्हणायचो.त्यांचा आवाज सार्‍या प्रवाश्यांना धुंद करुन सोडायचा,सतत मला आणि इतर मित्रांना ते वागणं कसं असावं,माणसाने कोणत्या प्रकारे जीवन जगले पाहीजे,या विषयांर मार्गदर्शन करायचे.त्यांची हिम्मत कमालीची होती १०लोकांसमोर दोन हात करायची त्यांची तयारी असायची.ते नेहमी म्हणायचे दुसर्‍याचे दु:ख समजून घ्या तरच तुम्हाला जीवनात मोक्ष मिळेल,इतरांना कधीच कमी लेखु नका,भेदभाव मनात कधीच बाळगु नका,कारण त्याने माणसाचे अस्तित्व नष्ट होते.माणूसाला माणूस म्हणायची लाज वाटते आणि त्या गर्विष्ठ व्यक्तीची किंम्मत मग शुन्य असते हे लक्षात घ्या.आम्ही सारे मात्र त्यांचे विचार ऐकायचो आणि सोडुन द्यायचो.पण त्यानी सांगितलेल्या सार्‍या गोष्टी मला आज खुप-खुप आठवतात त्यांचे विचार नुसते डोळ्यासमोर जरी आले तरी डोळे पाण्याने भरतात.कारन आज ते आमच्यामध्ये राहीले नाहीत ते आम्हाला सोडुन खुप दुर निघुन गेलेत.

मला तो दिवस अजुनही आठवतोय,दांडीयाचा पहिलाच दिवस होता.बुवा नेहमीप्रमाणे आम्हाला ट्रेनमध्ये मिळाले आज ते खुप खुष आणि सर्वांना पार्टी देण्याच्या मुडमध्ये होते.पण आज सार्‍यांचा उपवास असल्याकारणाने सर्वांनी त्यांच्या आमंत्रणाला नकार दिला.आणि सारेजण आपापल्या घरी गेले.ठीक रात्री बारा वाजता मला फोन आला माझ्या दुसर्‍या मित्राचा आणि त्या फोनवरील संभाषणाने मी तर पार कोलमडुनच पडलो.काय करावे माझे मलाच कळत नव्हते माझे पाय थरथर कापत होते.मी फटाफट जे हातत होतं ते तिथेच सोडुन सरळ विरारला जायला निघालो माझ्या खिशात पैसे आहेत कि नाही याचेही भान मला नव्हते.वेळ रात्रीची असल्या कारणाने रिक्षा मिळाली नाही मी धावतच स्टेशनवर पोहचलो कसाबसा बुवांच्या घरी पोहचलो तर काय..............किचनमधल्या फंख्याला गळ्यात मुलीचा दुपट्टा घालुन मस्त काय झोकेच घेतायत,आम्ही त्याना खाली उतरेपर्यंत त्यांचे प्राणपखेरु यमसदनात पोहचले होते.या गोष्टीवर आम्ही पाहुन सुध्दा आम्हाला विश्वास बसत नव्हता.कारण जी व्यक्ती जीवन सुंदर बनवण्याचे उपदेश करायची ती व्यक्ती अशी अचानक स्वतःचे जीवन संपवेल हे काही आम्हाला पटले नाही.कुठेतरी पाणी मुरतंय हे आम्ही जाणलं होतं पण असं अच्यानक कोणत्या नात्याने आणि कोणत्या पुराव्याने त्यांच्या मृत्युची कारणे शोधणार???याचं कारण हे त्यांच्या बरोबर निघुन गेलं समजुन आम्ही सार्‍या विधी संपऊन आपापल्या घरी गेलो...

हे झालं माणसाचं एक अंग आता तुम्हांला दुसरी एक कथा सांगतो म्हणजे तुम्हाला माणसाच्या दुसर्‍या रुपाचा चांगलाच परिचय होईल.काही माणसे जन्मजातच खुप रागीट आणि तापट स्वभावाचे असतात,त्यांना ना लहान-थोर,ना आई-वडिल,ना नातलग ना बायको पोरं यातलं जणु काहि त्यांना ठाऊकच नाही.अशी माणसे कोणाचीच तमा बाळगत नाहीत.स्वतःच्या रुबाबात आपणच फार मोठे या विचाराने मनात गर्वाचे घर बांधुन एकटे राहत असतात.कुणालाही कसेही बोलणे,कुणाचा आदर न बाळगणे,बायकोला मारहाण करणे,पोरांना मारणे,हेच काय पण ज्यांनी आपल्यासाठी जीवाचे रान केले,ज्या मातेने स्वतः अंगभर ओले कपडे पांघरुन ज्याला सुक्या कपड्यांमध्ये ठेवले,ज्या बाबाने ज्याला लहानाचे मोठे करण्यासाठी शरिराला जराही विश्रांती न घेता आपल्या पायांचे तळवे झिजवले,जे आई-बाबा ज्याच्यासाठी महीना-महीना उपाशी राहीले त्या आपल्या जन्मदात्या माय-पित्याला हा क्षणार्धात लाथाडतो,म्हणजे बघा हा किती मोठे पाप करतो.अशा माणसांना कधीच सुख-समृध्दी मिळत नाही आणि मोक्षही नाही मिळत.यांच्या मनात कोणत्याही प्रकारची भिती राहीलेली नसते,ना देवाचे डर ना इतर कुणाचे.एखादा समजदार व्यक्ती भांडतांना सुध्दा समोरच्याला एकेरी नावाने बोलताना हजार वेळा विचार करतो आणि यांना मात्र त्याची पर्वाच नसते.सरळ-सरळ कोणालाही कशाही नको-नको त्या घणेरड्या शिव्या देतो.आणि अशांना मरणही लवकर येत नाही.

आता तुम्हाला कळलंच असेल माणसे ही दोन प्रकारची असतात.एक म्हणजे समजदार आणि एक बेजबाबदार.परंतु जबाबदार माणसे देवाला अती प्रिय असतात आणि म्हणूनीच कदाचित माझे मित्र बुवा यांच्यासारख्यांना वरतुन लवकर बोलावणं येतं आणि त्याच्या निमंत्रणाला मान देणं हे भागच असतं.व या बेजबाबदार माणसांना न्यायला देवही कंटाळतो मग हे असेच कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासुन मरणाची वाट बघत असतात.चला तर मग तुम्ही कोण बनणार जबाबदार कि बे जबाबदार???

काहि माणसे तर याही पलीकडची असतात पण प्रकार थोडा वेगळा.अशा प्रकारची माणसे खुप भित्री असतात,त्यांना आई-वडिलांची काळजी,थोरांप्रती आदरी,मुलांचे भविष्य त्यांना कळते पण कष्ट करण्याची क्षमता यांच्या मनातुन दुर पळालेली असते त्यामुळे अशाप्रकारचे लोक सतत अंगारे-धुपारे,भुत-भविष्य,जादु-टोणे अशा गोष्टींमध्ये गुंतलेले असतात,अशा व्यक्तिंना साधु-भोंदुबुवाच आपले मार्गदर्शक आहेत असे वाटतात आणि मग त्यांना त्याच्या कचाट्यातून वाचवणे हे अशक्यच.यांचा अंत म्हणजे शेवट हा त्यांच्या स्वतःच्या कर्मांमुळेच होतो याचे दोश देवाला देऊन चालणार नाही.अनिष्ट रुढींची ही प्रथा बंद करण्यासाठी जे पुढे सरसावतात त्यांची तोंडेच कायमची बंद केली जातात.मग अशा व्यक्तिंवर अशा भोंदुगिरीवर आळा कोण घालणार???तुम्ही आम्ही एकत्र येऊनच हे होऊ शकतं.चला तर आपण एकत्र येऊन या माणसांना वाचवण्याचा प्रयत्न करुया.................

गुलमोहर: