सेंट्रल पार्क..न्यूयॉर्क...जून २००९

Submitted by मानुषी on 25 October, 2010 - 02:28

जून जुलाई २००९ मधे लेकीकडे अमेरिकेत गेलो होतो. तेव्हा सेंट्रल पार्क, न्यूयॉर्कला भेट दिली. ऊन पावसाचा नयन रम्य खेळ चालू होता.
मायकेल जॅक्सनचं २५ जून २००९ ला दु:खद निधन झालं त्यानंतर लगेचच आम्ही सेंट्रल पार्कला गेलो होते. तिथे त्याचे फॅन्स जमले होते. आणि आपापल्या नृत्य,गायनातून ते सर्वजण आपल्या लाडक्या कलाकाराला श्रद्धांजली देत होते. डीजे ही होता. डान्समधे हूला हूप्स, रोलर स्केट्स वरचा डान्स, असे अनेक नृत्य प्रकार चालू होते.
काही ग्रूप्स अगदी बेभान होऊन नाचत होते.

usa1_0.JPGusa2_0.JPGusa3_0.JPGusa4.JPGusa5.JPGusa6.JPGusa7.JPGusa8.JPGusa9.JPGusa10.JPGusa11.JPGusa12.JPGusa13.JPGusa14.JPGusa15.JPGusa16.JPGusa17.JPG

गुलमोहर: 

मस्त फोटो आहेत.
माझं आणि नवर्याचं फिरायला जायचं लाडकं ठिकाण. या वेळी फॉल कलर्स बघायला जातोय वीकेंड्ला.

धन्यवाद प्रज्ञा आणि मॅक.
फॉल कलर्सचे फोटो टाक मग प्रज्ञा!
मॅक इथे फोटो अप्लोड होताना बर्‍याच वेळा साईझ मोठा असण्याचा प्रॉब येतो. म्हणून ते रीसाईझ केले आहेत. आणि काही काही क्रॉपही केले आहेत......कारण आम्ही दोघे आहोत त्या फोटोत!