(योगा)योगी
 प्राणी


Submitted by aschig on 25 October, 2010 - 01:47

(योगा)योगी
 प्राणी
LAMAL 20100829

अनेक वर्षांपासुन पहायच्या असलेल्या तीन राष्ट्रीय उद्यानांना - लासन, रेडवुड्स व क्रेटर लेक - १४ ते २१ अॉगस्ट २०१० दरम्यान आम्ही भेट दिली. प्रत्येक उद्यानाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. रेडवुड्स मध्ये उंचीत परीकथांमधील झाडांना लाजवतील इतक्या उंचीची ती झाडे, त्यात पुन्हा समुद्रकिनार्याजवळ आणी न दिसलेला सुर्य या मुळे आमचे दोन दिवसांचे वास्तव्य सुखावह झाले. लासन आणि क्रेटर लेक दोन्ही ज्वालामुखींची स्थाने. क्रेटर लेक कोसळलेला ज्वालामुखी, तर लासन अजुनही धुमसत असलेला. तेथील वास्तव्य देखिल चांगले झाले.

sP8160240.jpgsP8171023.jpgsP8191074.jpg

इतर अनेक गोष्टी सांगता येतील, पण इथे मी केवळ तिथे दिसलेल्या प्राण्यांबद्दल, त्यासंबंधीच्या एकदोन योगायोगांबद्दल लिहीणार आहे.

लासन मध्ये दिवस नंबर दोनला आम्ही रस्ता न सापडण्यासारखे तसे नेहमीचे प्रकार करुन व एक नयनमनोहर धबधबा पदरात पाडुन घेउन संध्याकाळी जरा उशीराच मुख्य रस्त्यापर्यंत पोचलो. अचानक अनु म्हणाली, 'अरे ते अस्वल बघा', आणि खरेच आम्ही जेथुन १०-१५ मिनीटांपुर्वी आलो होतो त्याजवळच एक भुरे अस्वल चरत होते. (ती आधी गाय म्हणाली, पण मी ते इथे सांगणार नाही). मन भरुन त्याचे दर्शन घेऊन आम्ही निघणार इतक्यात रस्त्याकडे बोट दाखवून अनु म्हणाली, 'ते हरीण बघा'. आणि रस्ता ओलांडुन एक हरीण गेले. रेडवुड्स व क्रेटर लेकला देखिल हरणे दिसली.

sP1010075.jpgsP1010089.jpgsP1010055.jpgsP8190041.jpg

लासनमध्ये व नंतरही अनेक खारी दिसल्या. त्या खारी की चिपमंक्स याबद्दल आधी आमची खात्री नव्हती, पण नंतर त्या Golden-mantled Ground Squirrels असल्याचे कळले. दुसर्याही एका प्रकारची खार दिसली. हे छोटे प्राणी तसेच धिटुकले असतात. त्यात अशा ठिकाणी ते लोकांमुळे जास्तच जाणवते. मी तसा असे मानणारा आहे की नीयम हे तोडण्याकरीताच असतात (नाहीतर ती नैसर्गीक बंधने असती, जसे 'प्रकाशाच्या गतीपेक्षा वेगाने गाडी हाकु नये'). काही बंधने मात्र नेहमी पाळल्या जावी असे वाटते, जसे अनुज्ञा नसेल तेथे पाळीव प्राण्यांना न नेणे. त्याचप्रकारे जंगलातील श्वापदांना खाण्याच्या वस्तु न देणे. लोक खारींना खाद्य देऊन त्यांचा स्वभाव का बदलतात नकळे. एका ठिकाणी ('समीट लेक', लासन) अनुज्ञा नसतांना एका कुत्र्याला घेऊन देखिल एक प्राणी आला होता.

sP8190033.jpgsP8200207.jpgsP8160232.jpgsP8160115.jpg

रेडवुड्स रुझवेल्ट एल्क्स करता प्रसिद्ध आहे. ते खुपच सहजासहजी पहायला मिळाले. क्रेटर लेकला दोन कोल्हे दिसले आणि चक्क एक उंदीर. कॉटेजमध्ये आलेल्या या आगंतुकाला एका ग्लास मध्ये पकडुन बाहेर सोडावे लागले.

sP8171127.jpgsP8190221.jpg

पक्ष्यांमध्ये रॉबीन (एक सुंदर जोडी पण त्यात होती), क्लार्क्स नटक्रॅकर्स, स्टेलर्स जे, नटहॅच, गिधाडे, बदके व अजुनही काही दिसले. एक जंको एका चतुरचा चट्टामट्टा करतांनाही सापडला. लाकडावर रंग मिळवुन मस्त लपलेला एक नाकतोडा व अनेक रंगीबेरंगी फुलपाखरे दिसली.

sP8160107.jpgsP8160220.jpgsP8190226.jpgsP8190229.jpgsP8200194.jpgsP8200122.jpgsP8200116.jpgsP8190063.jpg

लासन किंवा रेडवुड्समध्ये एकही साप दिसला नाही हे मला जाणवले होते. मी असे म्हणताच अनु म्हणाली, 'जयला दिसला होता मी बेरी तोडत असतांना.' (इतर राष्ट्रीय उद्यानांमधुन काही न्यायाची परवानगी नसते. रेडवुड्स मध्ये मात्र खाता येतील तितक्या बेरीज तोडुन खायची मुभा असते.) 'हे असेच गवत होते'. मी तिकडे पाहीले आणि म्हंटले, 'तो पहा साप', कारण मला खरच तिथे एक सळसळत जाणारा साप दिसला. (अनु व जयला देखिल). फोटो मात्र काढता आला नाही.

न लाजता फोटो सेशन्स करु देणारा सरड्याने सुद्धा दिसत नाही म्हणता म्हणता दर्शन दिले.
जयला रेडवुड्स मध्ये जवळजवळ कोणताही पदार्थ खाऊ शकणारा असा 'बनाना स्लग' असतो तो पहायचा होता. रेडवुड सोडायची वेळ झाली तरी तो काही दिसेना. परततांना एका जागेकडे असेच बोट दाखवुन अनु म्हणाली, 'या ठिकाणी पाणी असते तर बनाना स्लग दिसला असता'. आणि लगेच जय तिकडे पाहुन म्हणाला, 'तो काय, आहे तर खरा'. (किंवा तसलेच काही आंग्ल भाषेत).

sP8160006.jpgsP8180219.jpg

गुलमोहर: 

आश्चिगचा आयडी हॅक झालाय का?
मेरेको शब्द न शब्द अथं पासून इति पर्यत कळलेला पहिला(वहिला) लेख. Proud
शैली पण भारी.

धन्यवाद.
फोटो म्हणुन मात्र त्यातले बरेच हललेले किंवा कमी प्रकाशातील आहेत (किंवा कमी प्रकाशामुळे exposure वाढुन त्यामुळे हललेले ((किंवा ...))) Sad
रैना, ईतके दात दाखवुन हसल्याने समजतील असे लेख लिहिणे चांगले की वाईट ते मात्र कळले नाही. Wink

मस्तच. रैनाला अनुमोदन. ऑफिसमधून निघायची वेळ झालीये आणि लेख वर आला. तसं पण कळेल की नाही माहिती नाही तर नुसता चाळावा लेख अशा विचारात उघडला होता Happy

गाय Biggrin

रैना.. अनुमोदन.. Proud छान लिहिलय. Happy

अनु दर दहा तासांनी ऑनलाईन यायची ती हीच ट्रीप का? Proud

अस्चिग, हे असे लेख पण लिही रे. मी पण जरा मनाची तयारी करुनच हा लेख उघडला Proud पण तुझा कुठलाही लेख मी वाचते नक्की.

आम्ही जेथुन १०-१५ मिनीटांपुर्वी आलो होतो त्याजवळच एक भुरे अस्वल चरत होते. (ती आधी गाय म्हणाली, पण मी ते इथे सांगणार नाही). >>>> Happy तू मिश्किल पण आहेस रे भाऊ !

मस्त लेख व फोटो. शीर्षका वरून व्यक्ति तितके देव चा पुढील भाग किकॉय असे वाटून उघडले लेकिन इदर तो अपने भाई बहन ही मिले म्हणून खूप मस्त वाट्ले. क्रेटर लेक मधील बेटाचा आकार एका मोठ्या स्टिंग्रे सारखा नाही वाट्त? तो खुर्ची खाली बसलेला कुत्रा आहे ना? कि कोल्हा? उभी खारोटी अगदी किट्कॅट च्या जाहिरातीतील वाट्तेय.

पहिले रैनाला अनुमोदन. लेख कळाला याचीच एवढी खुषी आहे की तो बेकार असता तरी तारीफ केली असती Happy मला अजूनही शंका आहे की यात काहीतरी आध्यात्मिक undercurrent/read between the lines आहे Happy

पण मस्त फोटो आणि वर्णन - विशेषतः तो क्रेटर लेक चा फोटो. त्याच्या भोवताली (रिम) ड्राईव्ह करता येते ते केले का? तसेच खाली लेक पर्यंत गेला होतात का?

'तो काय, आहे तर खरा'. (किंवा तसलेच काही आंग्ल भाषेत).>>> Happy

येताना/जाताना येथूनच गेला असाल ना? कळवले असते तर एक गटग केले असते.

ह्म्म्म्म.. मी इतके दिवस उघडलेच नव्हते हे, आजिबातच न कळणारे काहीतरी वाचावे लागणार म्हणुन..... Happy

तसेही हे (योगा)योगी प्राणी मनुष्यप्राणी की इतर ते कळलेच नाही, कारण लेखात दोघांचाही (म्हणजे मनुष्यप्राणी आणि इतर ) उल्लेख प्राणी म्हणुन केलाय आणि लेखकासोबतचे दोघेजण कुठल्या कॅटेगरीत ते मात्र लिहिले नाही.

पण लेख आणि फोटु दोन्ही आवडले. सगळ्यात जास्त फोटु क्र. दोन आवडला. फोटोतही मावत नाहीत इतकी मोठी झाडे.......

रैनाला मोठ्ठं अनुमोदन. एका झटक्यात लिहिलेलं सगळं समजलं मला, असं तुमच्या लेखाबाबत बहुतेक पहिल्यांदाच झालं असेल. Happy
स्टाईल आवडली. नेहेमीच्या लेखांबरोबरच असं थोडं सोप्पं लिखाण पण नक्की करा. Happy

अरे काय सुरु आहे? आधीचे लेख कठीण (तुमच्या मते) म्हणुन हा चांगला? अशानीच तर सगळे trivialize होते!
आणि तिनेच लेख लिहिल्यासारखे रैनाचे अनुमोदन!
मला तो लेख समजला नाही (आवडला तरी) नाहीतर मी विश्वाच्या आर्तावर लिहिणार होतो की रैनाचा आयडी हॅक झाला असावा म्हणुन.

पण काय करु, इतके म्हणत असाल, तर धन्यवाद म्हणणे भाग आहे. इतक्या लोकांच्या प्रतिक्रीया येतील असे वाटले नव्हते. करीन प्रयत्न अजुन असे लेख लिहायचा.

४९: हो, परिक्रमा केली. आम्ही सॅक्रॅमेंटोला विमानाने गेलो व मग कार. १३-१४ ला असलात घरी तर मात्र भेटु शकु.
खाली गेलो नाही कारण जायला+यायला लागणारा वेळ + गेलोच तर बोटीवर जावे लागणार व मग नुसतीच चक्कर मारण्याऐवजी त्या मँटा-रे बेटावर जावे लागणार (त्यावर ज्वालामुक्।ईचे एक विवर आहे). वगैरे. त्याऐवजी दूसरे हाईक्स केले.

अमा: तो कुत्राच आहे.

क्रेटर लेक चे उर्वरीत फोटो:
http://avyakta.caltech.edu:8080/photo2010/CraterLakeNP_PUB/index.html

रैना, दिवाळी आहे, पणत्या घे.

सॉरी आशिष. जरा गंमत केली एवढेच. लेख्/फोटो चांगलेच आहेत.

आम्ही गेलो होतो तेव्हा नुकताच बर्फ चालू झाला होता आणि सीझन मधला पहिलाच होता. पण त्यामुळे परिक्रमा बंद होती.

बाकी फोटो ही मस्त आहेत त्या लिन्कवरचे. त्यातीलही क्रेटर लेकचे, तो एक खडकांवरून पाणी खाली येते तो आणि बर्फाळ शिखरांचे (माउंट शास्ता का?) ते मस्त आहेत.

दोन झाडांच्या मधे असलेली गाडी दिसली. एकाच झाडाच्या खोडातून गाडी जातानाचा काढला नाही का? Happy

अरे, सॉरी कशाबद्दल? मी ही गमतीनेच लिहिले आहे सगळे. स्माईलीज न टाकुन लोकांचे पाय ओढण्याची जुनी खोड आहे. कोणत्याही कारणामुळे लोकांनी काहिही चांगले म्हंटले तर ते कुणाला आवडणार नाही? रैनामुळे तर रैनामुळे.

रैना, आकाशकंदील घे.

आश्चिग, कित्ती तो टीआरपी उगाचच (म्हणजे माझ्या नावाने कित्ती ती बोंब) Lol
आणि मी लिहून काही डोंबल फरक पडत असता, तर माझे स्वतःचे लेखन नसते का वाचले लोकांनी. Proud

आणि लोकंहो 'माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळीबार कायको' ? तरीपण अनुमोदनासाठी आभारी आहे. Lol

फारेंड - दे टाळी. मीपण दोनदा वाचला. नक्की काहीतरी अजून असणार असे उगाचच वाटत होते Wink

आणि हो आश्चिगना हसता येतं, म्हणजे अशी शंका घ्यायला वाव आहे. (पळा SSSSSS) Proud

मी पण रैनाच अनुमोदन देणार होते. पण आश्चिगला वाईट वाटेल Wink
एरवी तुझे लेख डोक्यावरुन जातात म्हणून हा उघडतच नव्हते पण चक्क कळला. बुद्धीची लेव्हल वाढली की काय न कळे.
>>>लासन मध्ये दिवस नंबर दोनला>>>> इथे जरा गोंधळ झाला माझा वाचताना Proud
पण फोटो अप्रतिम आहेत. वर्णनही छान.

छान आहे वर्णन, फोटो आवडले.
त्या उभ्या खारीचा फोटो मस्तच, अगदी फोटोसाठी पोझ देउन उभी आहे असे वाटतेय. Happy

@झक्की, खुशाल करा कॉपी. कुठे वापरले तर मात्र नावाचा उल्लेख करा आणि शक्य झाल्यास कळवा.

@सायो, धन्यवाद. पण असे कुणाला काय वाटेल म्हणुन घाबरायचे नाही. शिकायचे इतरांपासुन. करायचे अनुकरण.

@आ..११, काही खायला मिळेल या आशेने आलेली ती एक खार. त्यामुळेच छान मिळाले फोटो.