कल्चर्ड

Submitted by नतद्रष्ट on 24 October, 2010 - 14:46

खोल तळाशी जाउन, हट्टानं शिंपला उघडुन
काय मिळवलंस शेवटी..

तुझ्या गळ्यातल्या सरीतले,
टपोरे मोती त्यापेक्षा किती मोहक,
आणि कल्चर्ड !

गुलमोहर: 

सगळ्यांना आवडली म्हणल्यावर माझा जरा गोंधळ होतोय. आपल्याला जरा नाय समजली. जरा विस्तारुन लिही मग समजेल.

:भावना व्यक्त करायला योग्य स्मायली उपलब्ध नसल्याने गोंधळलेली बाहुली:

कवितेतल्या तिने 'काखेत कळसा, गावाला वळसा' किंवा ' आग सोमेश्वरी...' असं केलं - असं काहीसं कवि तिला सांगू पाहतोय का? (इथेही दात विचकणारी बाहुली टाकावी, की डोमा, की जांभळा चेहर्‍याची ते कळत नाहीये)

तिच्या गळ्यातल्या सरीचे मोती मोहक आणि कल्चर्ड आहेतच ना, पण मध्यंतरी माळ तुटली तेव्हा एक मोती हरवला होता. तस्साच मोती हवा असा तिचा हट्ट असल्याने ती तळाशी गेली, शिंपला उघडला, मोती काढला, शिंपला जागूला देऊन टाकला पाकृसाठी. त्यामुळे तिला मोतीही मिळाला आणि माशाचा पदार्थही मिळाला. काय मिळालं काय विचारतोस?

व्वाह पर्‍या!! बहोत खूब.. Happy

>>>>तिच्या गळ्यातल्या सरीचे मोती मोहक आणि कल्चर्ड आहेतच ना, पण मध्यंतरी माळ तुटली तेव्हा एक मोती हरवला होता. तस्साच मोती हवा असा तिचा हट्ट असल्याने ती तळाशी गेली, शिंपला उघडला, मोती काढला, शिंपला जागूला देऊन टाकला पाकृसाठी. त्यामुळे तिला मोतीही मिळाला आणि माशाचा पदार्थही मिळाला. काय मिळालं काय विचारतो>>>>

एवढं सगळं करण्यापेक्षा तिने एकदा जरी बाजूला वळून कविकडे पाहीलं असतं तर तिला सगळ्यात तेजस्वी मोती सापडला असता.. (शेवटी बायका त्या बायकाच..)
(पर्‍या, तुला मोती म्हणालो रे... Happy आणि हो.. लग्न झाल्यावर नवर्‍याचाही 'मोतीच' होतो शेवटी :फिदी:)

सण्णकन वाजवलीस.
समजेल का एव्हढाच प्रश्न आहे फक्त. >>>>

१००% अनुमोदन Happy फ़क्त एकच अ‍ॅडिशन असुदे, झोपलेला आणि झोपेचं सोंग घेतलेला यातला फरक लक्षात घ्यावा Wink

लिमये, मोहक आणि कल्चर्ड पण शेवटी खोटेच की ते... ओरिजिनल ते ओरिजिनल च..... तेच हवं असेल तुमच्या कवितेतल्या नायिकेला.... तेच कारण असावं तिच्या हट्टाचं Happy

थोडक्यात,
जेव्हा हॉटेलमधला एखादा मस्त, चमचमीत, सुंदर गार्निशिंग वगैरे असणारा पदार्थ आवडतो तेव्हा तसाच्या तसा खावा. घरी बनवण्याचा घाट घालू नये. रेडीमेडच बरा!! उगीच आपलं तळाशी जाऊन इनग्रेडीएंट्स काय, कुठून मिळवायचे, पूर्व तयारी काय करायची, कधी पासून करायला घ्यायची वगैरे नस्ते व्याप कशाला??? Wink

मूळ कवितेपेक्षा रसग्रहणातले शब्द जास्त झाले का??? Uhoh

मंजिरी, मलाही तेच वाटतंय >>आता खर सांगायच तर हाच विचार माझ्याही मनात आला.
पण सद्ध्याच्या माबोच्या वातावरणात कवितेवर आपल्याला खर काय वाटतय हे बोलल रे बोलल की फार गहन विचारवादी लोक तुटुन पडतात... म्हणून मी टाळतो, माझ्याकडे वादाकरता बरेच नामी उपाय असल्याने मी हे टाळतो...

खोटं ते खोटं आणि ओरिजिनल ते ओरिजिनल हे कितिही खरं असलं तरी perfection चा अट्टहास कधीच कोणाला सुखी करत नाही ...

कुठला मोती कल्चर्ड, कुठला म्यान्युफ्याक्चर्ड आणि कुठला अस्सल हे नायिकेला कळलेलंच नाहीये का? ...
(कृपया, 'ड' आणि 'ल' चा उच्चार पूर्ण करावा - हुक्मावरूण) Proud

आणि हो.. लग्न झाल्यावर नवर्‍याचाही 'मोतीच' होतो शेवटी >>> Rofl

मला वाटतं लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ पर्‍याने ही कविता लिवली आहे.

>>>>कुठला मोती कल्चर्ड, कुठला म्यान्युफ्याक्चर्ड आणि कुठला अस्सल हे नायिकेला कळलेलंच नाहीये का?
लले, ते नायिकेला कधीच कळत नाही.. कळलं असतं तर सीतेने रामाला कांचनमृगाच्या मागे धावायला नसतं लावलं. Proud

आत्ये, वीरे.. मलाही हेच म्हणाय्च होत..
मालक तुम्हाला १०००००% अनुमोदन.. पण ते गहन विचारवादी लोक्स परेश्च्या कवितेकडे फिरकणार नाहीतस वाट्टय.. तरीही नकोच ती खरी मतं लिहिणं आणि............ असो..
लग्न झाल्यावर नवर्‍याचाही 'मोतीच' होतो शेवटी फिदीफिदी) >>> किरु.. Lol

मला वाटतं लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ पर्‍याने ही कविता लिवली आहे. << सो लवली.. अजून एकच वर्ष.. Proud पर्‍या... काय रे हे.. कॅलेंडर बदलत नाहीस वाटतं..

कळलं असतं तर सीतेने रामाला कांचनमृगाच्या मागे धावायला नसतं लावलं >>> कांचनमृग जवळ कल्चर्ड मोती बाळगून काय करतोय? (पोस्टात पोलीस काय करतोय - या चालीवर :फिदी:)

कळलं असतं तर सीतेने रामाला कांचनमृगाच्या मागे धावायला नसतं लावलं.>>>>>>>> सीता लाख सांगेल रे किर्‍या, रामाला कळायला नको का?

>>>>सीता लाख सांगेल रे किर्‍या, रामाला कळायला नको का?
'लग्न झाल्यावर नवर्‍याचाही 'मोतीच' होतो शेवटी' हे माझं वरचं वाक्य वाचलस ना मंजे.. Proud

Pages