वेडाच आहे...

Submitted by कौतुक शिरोडकर on 24 October, 2010 - 00:41

अंगाचं मुटकूळं करुन रस्त्याच्या कडेला झोपलेला तो...
निर्विकार, निरागस...
येणार्‍या जाणार्‍यां तुच्छ नजरांचा पायपोस न बाळगता...

पिंजारलेल्या बटा, मळकी लक्तरे...
कालच्या पावसामुळे 'आंघोळ' झाल्यागत वाटणारा..

'वेडा आहे तो' कुणीतरी कुणाला म्हणालं.
मला कीव कराविशी वाटली...
त्याची नाही............" त्या कुणाची"

नेमलेल्या चौकटीत घाण्याच्या बैलागत फिरणारा,
रुढी, नियम, जबाबदार्‍या, बांधिलकी, भावना, इच्छा, अपेक्षा, वगैरे..वगैरे..
कैक बंधनात जखडलेला हा जीव...
त्या सर्वबंधमुक्त जीवाला वेडा म्हणत होता...

बोलणारा 'वेडाच आहे... '
नाही का ?

गुलमोहर: 

कौतुका,कविता आवडली....... पण ह्या बंधनात रहाण्यातच मजा आहे मित्रा... बंधने नात्यांची,बंधने संस्कारांची,बंधने विचारांची,बंधने आधुनिक असण्याची,बंधने शिक्षणाची... बंधने.......... नाही का?

आणि असल्या बंधनांत असलेला '' वेडा'' असतो? घाण्याचा बैल ही उपमा चपखल आहे..... Happy

पुलेशु.

धन्यवाद अंजली.
डॉक, पिंडे पिंडे मतिर्भिन्ना !!! एका बाजूस झोपलेला तो वेडा आणि दुसरीकडे ट्रॅफिकला शिव्या घालत, नाईलाजाने स्टेशनपासून दूर उतरल्याने गाडी पकडताना होणारी चाकरमान्यांची धावपळ, दुकानं उघडण्याच्या यत्नात असलेले दुकानदार.... सगळ्यांचे तुच्छ कटाक्ष.... यातून मला वेगळं काही सुचण्याचा प्रश्नच नव्हता.

व्वा नितांत आवडली. Happy

पिंजारलेल्या बटा, मळकी लक्तरे...
कालच्या पावसामुळे 'आंघोळ' झाल्यागत वाटणारा..

नेमलेल्या चौकटीत घाणीच्या बैलागत फिरणारा,
रुढी, नियम, जबाबदार्‍या, बांधिलकी, भावना, इच्छा, अपेक्षा, वगैरे..वगैरे..
कैक बंधनात जखडलेला हा जीव...
त्या सर्वबंधमुक्त जीवाला वेडा म्हणत होता..
.

पटेश कौतुका, निष्कारण शिव्या घालणारा खरा वेडा,, आणि ट्रॅफिकला वैतागून्,लोकलच्या उशिरास होणार्‍या त्रासास शिव्या घालणारा .... इज कंपेरेबल टू वेडा.... Happy

मी जरा जास्तच आत घुसलो..... Happy पुन्हा वाचल्यावर अजून छान वाटली.

कौत्या, वेडाच्चेस.

वेड्यांनी स्वतःला शहाण सिद्ध करण्यासाठी इतरांना वेडं ठरवण्याची परंपरा जुनीच आहे. आपण त्यांना वेडं म्हणायच त्यांनी आपल्याला Happy

कौतुक, मस्तच कल्पना.......!!!!

माझी एक चारोळी आठवली, सहज टाकतोय :

आम्ही तुला वेडा म्हणून हिणवला
तुझा ध्येयवाद कधी कळलाच नाही
आम्ही तरी काय करणार???
तुझा देह "आमच्यात" कधी रुळलाच नाही. Happy

अम्या, तू बरोबर ओळखलस. अज्ञात, सुकी धन्यवाद.
भुंग्या, तुझी चारोळी अव्वल !

’रस्त्यावरचा वेडा’ याचा,
ध्येय्याने प्रेरित (वेडॆ) झालेल्यांसाठी
रूपक म्हणून उपयोग केला असेल तर
काही गोष्टी पटण्यासारख्या आहेत.

एकदम !!!!
पाउलो कोहीलो चे एक पुस्तकाची आठवण झाली .....
कोणी ठरवायचे कि कोण वेडे....
पण चंद्रशेखर गोखले म्हणतात तसे....
वेडे असण्याचे इथे खूप फायदे आहेत,
शहाण्याला पाळण्यासाठी काटेकोर कायदे आहेत ....

कविता मनात प्रश्नचिन्ह ठेवून जाते....

भावली तुझी कविता खूप. बंधमुक्त जीवन जगायला मला तरी आवडेल
मग कुणी वेडं म्हणलं तरी बेहत्तर.. Happy

बंधनात रहात असलेला वेडा का बंधनमुक्त असलेला वेडा.?
तसे सगळेच एकमेकाला वेडे म्हणतच असतात.
छान कविता.

काही तशी जरुर असतात खरी
नाहीतर पारिस्थिती वेडा बनविते होय ना

<<काळासह धावता धावता,
झिजुन जातात जोडे.
कौतुक,तुझ्या माझ्या सारखे,
जगात खुप आहेत वेडे.>>

पैकी येतात इथेहि थोडी ,
मस्त् जे.डी.

<<नेमलेल्या चौकटीत घाण्याच्या बैलागत फिरणारा,
रुढी, नियम, जबाबदार्‍या, बांधिलकी, भावना, इच्छा, अपेक्षा, वगैरे..वगैरे..
कैक बंधनात जखडलेला हा जीव...
त्या सर्वबंधमुक्त जीवाला वेडा म्हणत होता...>>
हम्म्म्म्म्म्म ! अगदी मनापासून आवडल्या ह्या ओळी.

Pages