वळिव

Submitted by पुरंदरे शशांक on 22 October, 2010 - 07:07

वळिव

कोंदाटल्या दाही दिशा वारा श्वास कोंडलेला
आसमंत जणू सारा मंत्रभूल घातलेला

उठे वार्‍याची लहर फोफावते वेडीपिशी
घुसळुन काढी सारे वृक्ष रान कासाविशी

मेघ गर्जना करोनी विजेलाही कापविती
युद्धभूमिवरी जसे कोणी थैमान घालिती

थेंब टपोरे टपोरे भुईवरी धावले हे
मृग नक्षत्र नभींचे धरेवरी ओघळले

गंध मातीचा हा खरा उराउरात साठला
आवेग हा मिठीतला नि:श्वासात प्रगटला

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

उठे वार्‍याची लहर फोफावते वेडीपिशी
घुसळुन काढी सारे व्रुक्ष रान कासाविशी २

मस्त जमलीय मित्रा,आवडली.झकास !!

नमस्कार - डॉ.साहेब, उल्हासकाका, रुणुझुणु
आवर्जून दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
शशांक

चांगले काव्य. सध्य वातावरणाशी साधर्म्य साधणारे.

किती हजार ओव्या झाल्या हे मोजण्यासाठी आकडे टाकणे योग्य आहे. इथे पाच कडव्यांसाठी का टाकलेत?

तुमचा प्रश्न वाचून एकदम हसूच फुटले.>>> उत्तर फुटले असते तर बरे झाले असते.

प्रश्न पाहून उत्तरच फुटावे असा संकेत आहे. आपणास हासू फुटले....
गुलाब बघून घाम आणि साप पाहून मनात झेंडु फुटत नाहीत ना कविवर्य?

||मना सज्जना भक्तिपंथेची जावे||