ती आणि तो: भाग-३

Submitted by Mia on 15 October, 2010 - 16:17

ती आणि तो १: http://www.maayboli.com/node/20185
ती आणि तो भाग २: http://www.maayboli.com/node/20410

अनिकेत चे मिशन एसी.
अनिकेत : अनुष्का, मला खुप दिवसांपासुन सांगायचे होते पण मला कळत नव्हते कसे सांगु ते...पण आज विचार केला तुला स्पष्टच सांगुन टाकावे....
अनुचे आपले मनात स्वतःशीच वादविवाद चालू.
अनु : हा तसला काही विचार तर करत नाही ना आपल्याला प्रपोज वगैरे करण्याचा?
हा अगदीच गर्लिश विचार अनुच्या मनात आला , आणि तिला त्याबाबत स्वतःवरच राग आला , आपणही ना कसे बावळटासारखे विचार करतो ना...
तसे काही शक्य नाही, हा कसला गुड्लूकींग आहे, प्रोफेशनल , मॅट्युअर्ड आहे वरुन अतिशय बोअरिंग आहे ,त्यामुळे आपल्यात त्याला इन्टरेस्ट असण्याची दुर दुर पर्यंत शक्यता नाही .
मला तर हा मुळीच आवडत नाही ,ह्याच्या तोंडातुन कधीच आपण आवाज ऐकलेला नाही ,कामाशिवाय हा कधी बोलत नाही जेव्हा पहावे तेव्हा सतत स्क्रीन मधे घुसलेला असतो , कानात इअरफोन्स घालुन असतो , दोन अँटीने वाटतात ते इअरफोन्स ह्याच्या मानेसंगे ते सतत हलत राहतात ,त्यात चष्मा ,चष्म्याखाली असलेले ह्याचे लांबलचक नाक ......कंप्लीट पॅकेज एलियन साठीचे....!!!!!!
पण आज काहीतरी गडबड जरुर आहे त्याव्यतिरिक्त हा मि.खडुस आपल्याला एवढे लोणी लावणार नाही. चला बघुया तर सही काय म्हणतोय बच्चु .. अब आया उंट पहाड के नीचे...बोल बाळ बोल आज बघू तु किती बोलतोस ते!!!!!

अनिकेत : ए उठ गं बाई.... झोपली का ही ? का शॉक मधे गेली ही आपल्याला हिच्याशी बोलताना पाहून . .?? अगं बये बोल काही तरी मला असले डोळे फाडुन बघू नकोस !!!उगाच आपण हिच्या तोंडाकडे पाहिले आणि आपले वाक्य मधेच अडखळले हिच्या डोळ्यांकडे पाहुन. अनिकेतराव पुढे सुरु ठेवा आपला लढा. बोला राजे बोला....(मनात)

अनिकेत : हं अनुष्का मला ना तु एसी बंद करतेस ना त्याचा खुप त्रास होतो. मला एसी लागतो , नाही तरी आज काल खुप उकडतय बाहेर देखील!!!

अनुचा मनात विचार चाललेला "कसलाय हा अचानक एकेरीवर येतो , मुलींशी बोलायची अजिबात अक्कल नाही मुर्ख कुणीकड्चा....."

अनु : अहो पण मला एसी चा खुप त्रास होतो हो. मला खुपच सर्दी होते एसी ने.

अनिकेत : तु एक काम का करत नाहीस जॅकेट नाही तर शाल आणत जा कि म्हणजे तुला थंडी नाही लागणार आणि एसी मी लावु शकेल.....

अनु: अहो पण शाल वा जॅकेट माझ्या हातांना वगैरेला थंडी नाही वाजणार पण माझ्या नाकाचे काय त्याला तर थंडी लागणारच ना ?????????? आणि मग मला सर्दी होणारच...

अनिकेत : आता ह्यात नाक कुठुन आणले ह्या कार्टीने??? (मनात)
पण खरे तर अनुच्या ह्या प्रश्नाला काय उत्तर द्यावे आता अनिकेतला खरेच कळत नव्हते . अनुच्या नाकाने मधे नाक खुपसुन अनिकेतच्या मिशन एसी चा फज्जा उडवला होता!!!!!!!! पण अनिकेत अजुन आपले शत्स्र टाकणार नव्हता..

अनिकेत : अगं पण तु नाकाला रुमाल तर लावू शकतेस ना??? दॅट विल सोल्व युर प्रोब्लेम.

अनु : "अहो पण तुम्ही दिवसभर एसी लावणार खरे की नाही ?? मग मी काय दिवसभर माझा एक हात नाकाला रुमाल लावुन धरुन ठेवु???? मग मी कीबोर्ड वर एका हाताने काम कसे करु ???? सांगा ना?
नाही नाही ते शक्य नाहीये."

अनिकेत चे जाम डोके फिरले होते आता...कुठुन आलीये हि बया???आणि हिला बसायला माझाच क्युबिकल मिळाले का ?????? आता हिला हिच्याच भाषेत उत्तर द्यावे लागेल ...(मनात)

अनिकेत : तुला हे रुमाल वापरणे शक्य नाहीये तसेच, मग मला गरम होते म्हणुन मी ऑफिस मध्ये शर्ट काढुन उघडाबंब फिरणे शक्य आहे का ?? तु सांग ना?

अनु : तुम्ही हे काय बड्बड्ताय ? हे पहा कुणाच्या तरी आरोग्याचा प्रश्न आहे तुम्ही असे कसे वागु शकतात त्याबाबतीत?

अनिकेत : बाळ आता तुला काहितरी गुगली आता टाकावीच लागणार नाही तर डाव गेला पाण्यात!!!!!(मनात)
अनिकेत : "अगं तेच सांगतोय मी . हा माझ्या आरोग्याचा प्रश्न आहे . मला खरे तर सांगावेसे नाही वाट्त पण सांगतो मला ना अ‍ॅस्थमा आहे गं .मला ना एसी नसला ना तर कधी कधी सफोकेशन होते , श्वास घ्यायला त्रास होतो मग. "

अनुच्या चेहर्‍यावरचे रागीट भाव क्षणात बदलले , आता चेहर्‍यावर पश्चाताप दिसु लागला. अनिकेतचा हवेत मारलेला तीर एकदम निशान्यावर लागला होता. तो मनातुन खुप खुश झाला अनुच्या चेहर्‍याचा उतरलेला रंग पाहून...

शेवटी अनु म्हणाली..
"तुम्ही मेडियम कुलींग वर चालवत जा एसी . मी करेन अ‍ॅड्जस्ट."

हुर्रे !!!! वाचला जीव आपला!!!! अनिकेतला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या ,विजय चालत त्याच्याकडे आला होता, तरी गंभीर चेहरा ठेवणे आवश्यक होते. मग तो म्हणाला
"थँक्स अनुष्का ,थँक्स अ लॉट. तु खरच खुप चांगली आहेस गं!!!!!!!!"
अनु : "हो ना आहेच मुळी !!!!!"
अनिकेत विचार करत होता कसली बावळट आहे लगेच फसली .हे तर खरेच एक लहान बाळ आहे ज्याला थोडी अक्कल कमी आहे .ही ही ही.......सो मिशन एसी फुल्ली सक्केस्फुल. जिंकलो आपण. ....

क्रमशः

गुलमोहर: 

गोष्ट तर छान वाटते आहे..पण थोडे मोठे भाग लिहीले तर बरे होईल ही प्रेमळ विनंती...कारण गोष्ट वाचायला चालू करेपर्यंत संपूनच जाते.. पु.ले.शु.

सगळे पंच मस्त मारलेत, एक सोडून... ऑफिस मध्ये शर्ट काढुन उघडाबंब फिरणे शक्य आहे का ?? ....या दोघांमधे भविष्यात प्रेम वैगेरे होणार असेल तर गप्प राहणाय्रा अनिकेतच्या मुखात असा डायलॉग खुपच रफ वाटतो.... तु सांग ना Happy ?

बाळबोध लिखाण. शुद्धलेखनाकडे लक्ष द्या . प्रश्नचिन्हे एकेकच पुरतील . मधे मधे शब्द ठळ्क करण्यामागे पाय प्रयोजन ? शब्दावर भर द्यायचा असेल तर साधारण पण इटालिक्स वापरायचे असा संकेत आहे. इमेल, रीपोर्ट, मन्युअल्स, अभ्यासाची पुस्तके अशा लिखाणात महत्वाचे शब्द ठळक करून लिहितात,

<<कानात इअरफोन्स घालुन असतो , दोन अँटीने वाटतात ते इअरफोन्स ह्याच्या मानेसंगे ते सतत हलत राहतात>>
छानच....
पण खरच मोठे भाग टाकत जा....

अश्विनि, काय झाल? काहि प्रोब्लेम आहेत का? नाहि, ब्रेच दिवस झालेत, पुढचा भाग नाहि आला म्हणुन विचारले.
काहिहि प्रोब्लेम असेल तर तो ईथे डीस्कस कर ना, उलट ईथे ईतके चांगले लोक आहेत, ते तुला नक्कि मदत/मार्गदर्शन करतिल, आणि काहि प्रतिसादाच मणावर घ्यायच नसत.

अश्विनी,

टेक युअर टाईम. इथे रेशीमगाठी नावाची कथा आहे ती जवळपास २ वर्षे सुरु आहे आणि अजुन पुर्ण झाली नाही Happy
तुमची गोष्ट तर आताच सुरु झाली आहे..

टेक युअर टाईम. इथे रेशीमगाठी नावाची कथा आहे ती जवळपास २ वर्षे सुरु आहे आणि अजुन पुर्ण झाली नाही
तुमची गोष्ट तर आताच सुरु झाली आहे..>> Happy खरंय!

अश्विनी,

पुढच्या याहून थोड्या मोठ्या भागाची वाट बघतेय...