शिक्षण

Submitted by harish_dangat on 3 October, 2010 - 23:20

घोकून घोकून केली
गणितातली सुत्रे पाठ
पुन्हा पुन्हा वाचून लावली
आम्ही सनावळ्यांची वाट

ठाउक असतो आम्हाला
सार्‍या प्रश्नांचा साचा
थोडे बाहेरचे आले तर
बसते आमची वाचा

ठेउन देतो आम्ही
आमच्या हातातील दप्तरे
बाहेर येतो घेउन
हाती पदव्यांची लक्तरे

खरे प्रश्न काय ते
बाहेर येताच कळते
काही प्रश्नांना उत्तर नाही
हे नव्याने आढळते

बहुपर्यायी प्रश्न सोडा
एकही पर्याय नसतो
अंदाजे उत्तर निवडण्याच्या
आमच्या सवयीस फसतो

हरीश दांगट

गुलमोहर: 

ठाउक असतो आम्हाला
सार्‍या प्रश्नांचा साचा
थोडे बाहेरचे आले तर
बसते आमची वाचा >>>. अगदी अगदी बरोबर आहे

कविता छान Happy

छान.