अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या निकालावर देशात कसलीही उन्मादाची प्रतिक्रिया उमटली नाही या बद्द्ल आपण आपलेच अभिनंदन करुयात! त्याचबरोबर जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी घेतलेल्या संयमी भूमिकेचेही कौतूक करायला हवे.

१९९२ पासून आजपर्यंत आपण देश म्हणून जास्त प्रगल्भ झालो आहोत याचे हा निकाल प्रतिक म्हणायला हवा.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.......

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6661921.cms

Group content visibility: 
Private - accessible only to group members

प्रभातरोडवरचा फ्लॅट ह्याचा सरल अर्थ आहे कि माझ्या आयुष्याचा दर्जा वाढविणे ही माझ्यासाठी महत्वाची गोष्ट आहे तशीच सर्व हिंदुंची, अगदीच झोपडपट्टीत राहण्यार्‍या लोकाम्ची सुध्दा. त्यांनासुध्दा आता मण्दीरा पेक्षा १रूमकिचेनमधे जाण्यात जास्त रस आहे, मंदीरात नाही.

त्यांनासुध्दा आता मण्दीरा पेक्षा १रूमकिचेनमधे जाण्यात जास्त रस आहे, मंदीरात नाही. >>>>>

परत तुमच्या मुद्यात गल्लात होते आहे आर्क. वन रुम किचन ही वैयक्तीक मालमत्ता आहे, सार्वजनीक नाही, एखादे मंदीर बनले किंवा बनले नाही त्यामुळे तुमचा किंवा कोणाचा फ्लॅट घेणे रहित झाले हे मी पहिल्यांचाच ऐकत आहे. Happy

स्वतःच्या जीवनात सुधारना व्यक्ती करतो, व्यक्तीच आपले जीवन पुढे किंवा मागे किंवा स्थगित ठेवू शकतो. माझ्या पगारामुळे माझ्या सख्या भावाचे जीवन (रोजचे आणि तो मरेपर्यंत) मी बदलू शकत नाही हे आपल्या लक्षात येते का? तस्मात कोणा मंदीर मशीदीमुळे वैयक्तीक प्रगती थांबत नाही. तसे झाले असते तर भारत १९४९ (खटला सुरु झाला तेम्व्हापासून) आजपर्यंत बदलला नसता.

जेंव्हा नौकरी की मंदीर म्हणजे (नौकरी मधिल एक महत्वाची मिटिंग की इथे अयोध्यावर चर्चा) हा प्रश्न येईल तेंव्हा मी आणि तुम्ही मिटींगला जाऊ. चर्चा करत बसणार नाही. त्यामूळे आपला मुद्दा निराधार आहे.

राहता राहिला दंगलीचा प्रश्न. मंदीर मशीद नसले तरी भारतात दंगली कायम आहेतच, आता त्याऐवजी बॉम्बस्फोट होतात. जरा त्यांनाही सांगा ना की अहो मला फ्लॅट घायचा आहे, बॉम्बस्फोट नका करु. ऐकतील का? ( इथे ते म्हणजे केवळ मुसलमान नाही, पूर्ण अतिरेकी समाज. उदा उल्फा, नक्षलवादी ब्ला ब्ला) आणि जर्मन बेकरीत स्फोट झाल्यामूळे औंध आणि प्रभात रोडवरचा भाव कमी झाला का? की तिथे लोक फ्लॅट घ्यायचे थांबले?

असो हे अर्थशास्त्र आहे. आणि मुद्दे तर्कशुद्ध असतील तर वाद घालावयास पण मजा येते. वर मी भाकरी बद्दल त्यामुळे अवांतर असे लिहले आहे. तरीही आपला मुद्दा नीट आपणास समजून द्यावा म्हणून पोस्ट प्रपंच, अन्यथा मार्केट मध्ये पोझिशन घ्यायचा विचार करत आहे. ( थोडक्यात मार्केट की राम मंदीरचा बाफ, तर मार्केट (प्रगती) पण पोझिशन घेतली की परत राममंदीर. (चर्चा) Happy )

थोडक्यात आधी पोटोबा मग विठोबा.. हे तर तर कालातीत का त्रिकालाबाधीत सत्त्य आहे. त्यासाठी एव्हडा वाद? Happy
केदार, वि.कु. ने काडी घातली म्हणजे दर वेळी ती विझवायलाच हवी असे कुठे आहे? ईथला एकंदर सूर स्पष्ट आहे- न्यायालयाने दिलेल्या संधीचा फायदा घ्या अन हा वाद मिटवा. बाकी ही घसरलेली गाडी थेट प्रभातरोड वरून जाईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. धन्य ते मा.बो. कर....!!
(ईशारा: दुपारी १ ते ४ वेळात गाडी नेल्यास टायरमधील हवा काढून टाकण्यात येईल) Happy

प्रथम दर्शनी प्रभु श्रीरामांची चुक आहे असे माझ्या लक्षात येते आहे, त्यांनी जर अयोध्येत जन्म घेतलाच नसता तर ? तेथे कोट्यावधी पोट भरलेल्या लोकांच्या श्रद्धा जडल्याच नसत्या, मग बाबराची काळी नजर अयोध्ये कडे वळलीच नसती. मंदिर निर्माण झालेच नसते, न निर्माण झालेले मंदिर पाडणे निव्वळ अशक्य, अडवाणिंचा रथ यात्रेचा त्रास वाचला असता, त्यांच्या आयुष्यातील काळा दिवस काळा म्हणुन राहिला नसता, दंगली करण्याचे -स्फोटांच्या मालिका घडवण्याचे कष्ट वाचले असते... पुढच्या अनेक आपत्या टळुन सर्व मानवजात गुण्यागोविंदाने नांदली असती. दुर्दैवाने तसे होणे प्रभुच्याही मनात नसावे.

कारण "राम तिथे जन्मला" ही भावना, श्रद्धा कायम आहे व राहणार.>>>
कुणाची ? आणी काही मोजक्या लोकांच्या श्रद्धेवरून न्यायलये निर्णय द्यायला लागली तर देश सतराव्या शतकात जाईल. >>>>
विकू, तुम्ही एकदा अयोध्येला जाउन या, रामलला मंदिराबाहेर पु़जेच्या वस्तू विकणारे सर्व दुकानदार मुस्लिम आहेत आणि ती रामजन्मभूमी आहे याबद्द्ल त्यांच्याही मनात शंका नाही.
'राम तिथे जन्मला' ही भारतातल्या बहुसंख्यांची श्रद्धा आहे आणि त्यात सर्व धर्माचे लोक येतात याबद्द्ल माझ्या मनात अजिबात शंका नाही.
याच भावनेचे राजकारण करुन बाबराने तिथे मशिद बांधवली, आणि त्याच राजकारणापायी ती पाडली गेली. कोर्टाने या जनभावनेचा (पुन्हा यात फक्त हिंदू येत नाहीत) मान राखत हा निकाल दिला आहे. '
शुद्ध' कायद्याच्या चौकटीत हा निकाल बसत नाही कारण शुद्ध कायद्याच्या चौकटीत सोडवायचा हा प्रश्नच नाही. इथे ज्युडिशिअल ओव्हररिच आवश्यकच होता.

>>>तुम्हाला हे वाक्य विनोदी वाटत असेल, परंतु ३० सप्टेंबर २०१० रोजी उच्च न्यायालयाने बहुमताने हे वाक्य सत्य म्हणून स्वीकारले आहे.

>> अजाणतेपणे ( कि जाणून बुजून ?) तुम्ही न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करताय असे नाही वाटत? तिथे असलेले रामाचे मंदिर बळजबरीने पाडून मशीद बांधली असे न्यायालयाने म्हणलेले नाही.

अजाणतेपणे नव्हे आणि जाणूनबुजून पण नव्हे. न्यायालयाच्या निर्णयाचा हा अजिबात विपर्यास नाही. ३ पैकी २ न्यायाधिशांनी वादग्रस्त जागेवरील इमारत ही एक मंदीर पाडून बांधल्याचे आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.

>>> पण एखादा व्यक्ती राष्ट्रपुरुष वा देव म्हणून स्विकारला की त्याच्या रिलेटेड असणार्‍या सर्व स्थानांना महत्व प्राप्त होते.

>> कुणी स्विकारले ? कधी ? कोणत्या वटहुकुमाद्वारे ?

कोणताही वटहुकूम नसताना जोतिबा फुल्यांचे राहते घर, गांधीजींना स्थानबध्द करून ठेवलेला आगा़खान पॅलेस, शिवनेरीवरील शिवरायांचे जन्मस्थान या व इतर अनेक स्थानांना महत्व प्राप्त झालेले आहे. तसेच महत्व अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीला आहे.

>>> कारण "राम तिथे जन्मला" ही भावना, श्रद्धा कायम आहे व राहणार.

>> कुणाची ? आणी काही मोजक्या लोकांच्या श्रद्धेवरून न्यायलये निर्णय द्यायला लागली तर देश सतराव्या शतकात जाईल.

श्रीरामचंद्र तिथे जन्मले ही रामभक्तांची श्रध्दा कायमच राहणार. अशी श्रध्दा फक्त काही मोजक्या लोकांची आहे हे आपणास कोठून समजले? आपण निकालपत्र नीट वाचलेले दिसत नाही. ती भूमी श्रीरामजन्मभूमी आहे या एका निर्णयाव्यतिरिक्त इतर सर्व निर्णय साक्षीपुरावे व पुराव्यांवर आधारीत आहेत. या निर्णयामुळे देश अजिबात १७ व्या किंवा १६ व्या किंवा २० व्या शतकात सुध्दा जाणार नाही. तसेच ते मंदीर नसून मशिदच आहे असा निर्णय दिला असता तरी सुध्दा देश एकदम टॉप गिअरमध्ये जाऊन २३ व्या किंवा २४ व्या किंवा अजून पुढच्या शतकात जाणार नाही. देश आपल्या गतीनेच पुढे जात राहणार.

>>> खर्‍या रामभक्तांना या धुमाळीत काडीचाही रस नाही.

त्यांना श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामांचे मंदीर असावे व इतर काही नसावे असे वाटते. फक्त त्यासाठी दंगली, जाळपोळ इ. होऊ नये अशीच त्यांची इच्छा आहे.

रच्याकने, तुम्हाला या धुमाळीत इतका रस का?

आगाऊ, वरील पोस्टला (त्या पोस्टपुरते Proud ) अनुमोदन
बाकी या विकुन्ची "मोजक्या" याशब्दामागिल नेमकी "सन्ख्या" कितीक आहे ते कळले अस्ते तर बरे झाले अस्ते, नै?
नै म्हण्जे एका हाताच्या बोटान्वर मोजता येणारी, वा दोन्ही हाताच्या..... ते नाही पुरत? मग घ्या पायाची बोटे पण मोजणीत, तर अशा हातापायाच्या बोटान्वर, अगदी हात पाय धरुन देखिल, जे जे काय मोजता येते ती सन्ख्या "मोजकी" असे आम्ही तरी मानत आलोत बुवा!
विकुन्च्या मोजदादीमधे हातापायान्शिवाय अजुन काय काय "इन्क्य्लुड" करतात ते बघणे औत्सुक्याचा विषय आहे, नै? रामावर व त्याच्या जन्मभूमी वगैरेवर श्रद्धापूर्वक विश्वास ठेवणार्‍यान्ची सन्ख्या जर विकुन्च्या दोन हात व दोन पाय येवढ्यातच मोजली जात असेल, तर..... बरीच पाण्ढरी शाई वहावतो इथे! Proud

राष्ट्रहित म्हन्जे नक्की काय अभिप्रेत आहे तुम्हाला योग ?
राष्ट्राचं हीत.
विषय मोठा आहे वेगळा बा.फ. काढावा..
ह्या संदर्भाने काश्मिरात ३७० चं काय करावं हाही प्रश्नच आहे.
हा वेगळ्या बीबी चा विषय होईल. >>>>>>>>>>>>>>>>>>

सूचना स्तुत्य आहे, पण वेगळा बा फ काढायची भिती वाटते, त्याच लब्धप्रतिष्ठितांच्या त्याच त्या भूमिका आणि तेच ते प्रतिसाद..... नकोच ते!

श्रध्दा, अस्मिता , चेतना, या गोष्टीचा जेथे अभाव आहे, त्याच्या कडुन हेच अपेक्षित होते. नुसत्या दंगलीच्या भितीने भगवान श्रीरामा सारख्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचे जन्मस्थान नाकारतात आणी तेथे हॉस्पिटल च्या सुचना देतात म्हणजे मुस्लिंमाकडुन सतत मार खात आलेल्या हिंदुना अजुन एक दवाखाण्याची सोय, अन्याय झाल्यावर प्रत्यक्ष्य प्रभु श्रीरामाचंद्रानी युध्द केले होते. दंगल नको म्हणुन जाऊ द्या म्हणाले नव्हते, पण त्याकाळी सुध्दा तिथल्या प्रजेने जाउ द्या म्हटले असेल अन त्यांना वानर सेनेची मदत घ्यावी लागली असेल.

श्रध्दा, अस्मिता , चेतना, या गोष्टीचा जेथे अभाव आहे, त्याच्या कडुन हेच अपेक्षित होते. नुसत्या दंगलीच्या भितीने भगवान श्रीरामा सारख्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचे जन्मस्थान नाकारतात आणी तेथे हॉस्पिटल च्या सुचना देतात म्हणजे मुस्लिंमाकडुन सतत मार खात आलेल्या हिंदुना अजुन एक दवाखाण्याची सोय, अन्याय झाल्यावर प्रत्यक्ष्य प्रभु श्रीरामाचंद्रानी युध्द केले होते. दंगल नको म्हणुन जाऊ द्या म्हणाले नव्हते, पण त्याकाळी सुध्दा तिथल्या प्रजेने जाउ द्या म्हटले असेल अन त्यांना वानर सेनेची मदत घ्यावी लागली असेल.

सहमत आहे.

कधी काळी हिंदु म्हणुन जगण्यालाच अडचण आलीच जशी आज स्वतंत्र भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या काश्मिरात आहे, तेव्हा काही समजेल.

बुध्दीने वाद करणार्‍यांच्या हातात तलवार यावी अशी अपेक्षाच कशी करावी.

अनेक शब्दांपेक्षा एक कृती प्रभावी असते यावर भरवसा ठेवावा. हेच बुध्दीवादी जसे आज किमान छ. शिवरायांना मानतात तसे उद्या कर्तुत्ववान आणखी कुणाला मानतील.

श्रध्दा, अस्मिता , चेतना, या गोष्टीचा जेथे अभाव आहे, त्याच्या कडुन हेच अपेक्षित होते. नुसत्या दंगलीच्या भितीने भगवान श्रीरामा सारख्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचे जन्मस्थान नाकारतात आणी तेथे हॉस्पिटल च्या सुचना देतात म्हणजे मुस्लिंमाकडुन सतत मार खात आलेल्या हिंदुना अजुन एक दवाखाण्याची सोय,>>>>
आली पुन्हा एक चिथावणीखोर प्रतिक्रिया, अहो परत हिंदू-मुस्लिम वाद उकरुन काढायची ही वेळ नाही, इतिहासात झालेल्या चुका सुधारण्याची ही एक संधी आहे.
आत्यंतिक सेक्युलर आणि आत्यंतिक धर्मवेडे (दोन्ही धर्मातील) या दोन्ही अल्पसंख्य गटांना; बहुसंख्य सामान्य भारतीयाला तिथे राम जन्मला हे मान्य आहे आणि हा प्रश्न सामंजस्याने, सहमतीने, भावना न भडकावता सुटावा असेही वाटते याचे काही घेणेदेणे नाही. यांच्या राजकीय-वैचारिक चौकटीला धक्का लागता कामा नये हीच यांची काळजी.

ज्या हिंदुंना काश्मीरातुन पळुन अन्यत्र आसरा घ्यावा लागलाय ती अत्यंत सामान्य माणसे आहेत. आत्यंतिक सेक्युलर आणि आत्यंतिक धर्मवेडे (दोन्ही धर्मातील) नाहीत.

निकाल ऐतीहासीक आहे, त्यात आयोध्येचा भूगोल आहे, धर्मांच्या अनुशंगाने न्यायलयाने केलेला विचार म्हणजे समाजशात्र आहे, लोकांनी निकालाचे पुढे काय करायचे हे ठरवून दिलेल्या अटी, सवलती, मार्ग ई. चे नागरीकशास्त्र आहे- राष्ट्रहिताच्या दृष्टीने हे सर्व पुरेसे असावे.
बाकी ऊगाच कुणाचा जन्म कुठे झाला वगैरे नसता जीवशास्त्रीय गुंता अन कोण कोणाच्या भावनांशी खेळतय असला केमिकल लोचा, त्या अनुशंगाने सामान्य माणसाला प्रभात रोड वर घर मिळेल का धारावीत असल्या निव्वळ भौतीक समस्या, ई. सर्वांची शाब्दीक गणिते मांडून ऊगाच ईथली भूमिती बिघडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी नविन बा.फ. ऊघडून वा.फ. दवडली तर बरे होईल!
---------------------------------------------------------------------------------------
अ‍ॅडमिन,
मला वाटतं आता ईथे काहितरी भलताच ईतीहास घडायच्या आधी या बा.फ. ला कुलूप लावावे.
(घर फोडल्यावर कुलूप नको, चोर जमले आहेत तेव्हा शक्यता ध्यानात घेवून आधीच कुलूप लावणे ऊचीत ठरेल नाही?)
बाकी,
ज्यांना निकाल मंजूर नाही किंव्वा न्याय १००% शुध्ध वाटत नाही त्यांनी सर्वोच्च न्यायालयात किमान जनहित याचिका (राष्ट्रहित नंतर बघू) दाखल करावी. ईथे शाब्दीक तलवारी चालवून काहीच फायदा नाही.

नितिनजी, हा बाफ अयोध्येतील निकालाबद्द्ल आहे, आणि त्याने तडजोडीचा एक नवा रस्ता दाखवला आहे. घडून गेलेल्या प्रत्येक वार-प्रतिवाराची यादी काढत बसलो तर त्याने कोणाचाच फायदा नाही.
माझ्या या पोस्टवर तुम्ही, 'अडचणीत आणणार्‍या मुद्याला बगल दिली आहे' असे म्हणू शकता पण तुमच्या उदाहरणाचा प्रतिवाद करायचा म्हणून मी कुठले तरी उदाहरण काढायचे, मग तुम्ही त्याला उत्तर म्हणून अजून एक उदाहरण द्यायचे यात काही 'राम' नाही.
शुक्रवारच्या प्रार्थनेनंतरच्या आणि या प्रतिक्रियेतल्या चिथावणीत माझ्या दृष्टीने काहीच फरक नाही.
योग, हा बाफ बंद करायची विनंती मी अ‍ॅडमीनला या आधीच केली आहे.

>>>> योग, हा बाफ बंद करायची विनंती मी अ‍ॅडमीनला या आधीच केली आहे. <<<
अरे थाम्बाना जरा! माझी चवलीपावली टाकूदेत की! Proud
काय हे ना, की न्यायालयाचा निर्णय ज्यान्ना झोम्बलाय (खास करुन ज्यान्च्या हुकमी व्होटब्यान्केचे दिवाळे निघण्याची शक्यता निर्माण झालीये) त्यान्ची कोल्हेकुई केव्हाच सुरू झालीये की "हा निर्णय म्हणजे १९९२ च्या पाडापाडीचे समर्थन नाही" वगैरे वगैरे! अरे न्यायालय वा आम्ही तरी कुठे सान्गतोय समर्थनाचे? ते समर्थन आहे की नाही हा वेगळाच प्रश्न, पण ती घटना झाली नस्ती तर उत्खननाद्वारे आजचा निर्णयही लागू शकला नस्ता हे देखिल हा सूर्य हा जयद्रथ या थाटाचे ढळढळीत सत्य! Proud
ते तेवढे मान्डले तर ती "चिथावणी" कशी काय बरे होऊ शकते? Wink
असो!
मात्र न्यायालयाचा निकाल आला काय अन जिथे तिथे मिडीयात हीच १९९२ चे गुन्हेगार(?) ची घिशीपिटी रट उर्फ क्यासेट उर्फ बोम्बाबोम्ब चालूहे! चालुद्यात अन काय!

श्रध्दा, अस्मिता , चेतना, या गोष्टीचा जेथे अभाव आहे, त्याच्या कडुन हेच अपेक्षित होते. नुसत्या दंगलीच्या भितीने भगवान श्रीरामा सारख्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचे जन्मस्थान नाकारतात आणी तेथे हॉस्पिटल च्या सुचना देतात म्हणजे मुस्लिंमाकडुन सतत मार खात आलेल्या हिंदुना अजुन एक दवाखाण्याची सोय,>>>>
आली पुन्हा एक चिथावणीखोर प्रतिक्रिया,

आगाऊसाहेब यात चिथावणीखोर काय आहे ?

अयोध्या मथुरा माया ... हे हिंदुंच प्रातस्मरण आहे. ती ठिकाण जर हॉस्पीटल आणि मानव मंदीर झाली तर प्रातःस्मरण कशाच करायच ?

कोणी केलाय का सर्व्हे सर्वसामान्य हिंदुना काय हवे आहे याचा ?

हिंदुंना राममंदीरच हवय कारण १९८९ ते १९९२ या काळात ८ कोटी हिंदुनी ८.२५ कोटि रुपये ( प्रत्येकी १.२५ रुपये ) व राममंदीर याच ठिकाणी हव अस संमतीपत्र दिल होत. हे सज्जड पुरावे जेव्हा न्यायालयात दिले गेले तेव्हाच आज न्यायालयाने हा निकाल दिलाय.

राममंदीर नको तिथे हॉस्पीटल हव असे म्हणणारे किती होते ?

यात काही हिंसक प्रतिक्रिया आल्या. दंगली घडल्या हा भाग कुणालाच नको होता. याचा अर्थ राममंदिर नको असा मात्र होत नाही.

नको ते तारे तोडायला लागल्यावर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या वाचुन हा बाफ नको म्हणण म्हणजे कहर आहे.

<<<अनेक शब्दांपेक्षा एक कृती प्रभावी असते यावर भरवसा ठेवावा>>>

या 'एका' कृतीतून मग प्रतिक्रिया, मग प्रतिक्रियेची प्रतिक्रिया अशी साखळी सुरू होते.
ही साखळी तोडायला पुन्हा शब्दच उपयोगी ठरतात.
६ डिसेंबर १९९२ ते ३० सप्टेंबर २०१० : या घटनाचक्रातून हेच दिसले.

काहीच्या काही. ६ डिसेंबरची घटना फक्त आठवते. त्या आधीचा घटनाक्रम कुणी आठवत नाही. अतिशय संयम बाळगुन १ डिसेंबर पासुन सहा दिवस फक्त कारसेवा करायला आलेल्या कारसेवकांना जेव्हा ११ डिसेंबरला कारसेवा करता येईल किंवा नाही हे न्यायालय सांगेल अस जेव्हा सांगितल तेव्हा कार्यकर्त्यांचा संयम संपला.

६ डिसेंबर नंतर जवळ जवळ हे आंदोलन स्थगितच झाले कारण न्यायालयीन लढाई सुरु झाली.

वर उल्लेख आलाच आहे की एक चालु मशीद सोमनाथाला पाडुन तिथे मंदिर उभारण्यात आल. इथे तर ती वादग्रस्त वास्तु होती.

अजुनही जर ती वादग्रस्त वास्तु पाडली याच दुखः कोणाला होत असेल तर तथाकथीत बुध्दीजीवी लोकांनो आजही महात्मा गांधी उपास करायचे तसा उपास करा तुमच्या जीवाला बर वाटेल. हा उपाय सुचवायच कारण एकदा व्ही. पी. सिंगांनी मुम्बईला येऊन असा प्रयोग केलाय.

उन्दराला मांजर साक्ष ! ही हिणकस वाक्य मुद्दे संपले की येतात.

प्रत्यक्ष्य प्रभु श्रीरामाचंद्रानी युध्द केले होते. दंगल नको म्हणुन जाऊ द्या म्हणाले नव्हते, पण त्याकाळी सुध्दा तिथल्या प्रजेने जाउ द्या म्हटले असेल अन त्यांना वानर सेनेची मदत घ्यावी लागली असेल.>>>>> राजा काय , प्रजा काय .... प्रत्यक्ष व्यासाम्ना देखिल अशी कल्पना सुचली नसेल ..... Sad बघा बाबा कुणाच्या सामाजिक्/धार्मिक/कौटुंबिक्/राष्ट्रीय/ वैयक्तिक भावना दुखवतात काय? Happy

आगाउ... बाफ चा विषय काहीही असो.... चर्चेचा सुर बाकी ओढुन ताणुन जिकडे पाहिजे तिकडे नेणे आणि मग मनातील ' गरळ' ओकणे असाच प्रकार झालाय.... काही पोष्ट तरी ' हिंदू' खतरे में असं वाटायला लावण्याचा जाणिवपुर्वक केलेला प्रयत्न आहे....

आगाऊजी,
हा बीबी बंद व्हायला आला आहे हे मान्य पण

राम तिथे जन्मला' ही भारतातल्या बहुसंख्यांची श्रद्धा आहे आणि त्यात सर्व धर्माचे लोक येतात याबद्द्ल माझ्या मनात अजिबात शंका नाही.
हे कशावरून, आणी त्याचा या टायटल सूट शी संबंध काय? it is a slippery slope

याच भावनेचे राजकारण करुन बाबराने तिथे मशिद बांधवली,
मग तुलसीदासने का लिहिले नाही ?
आणि त्याच राजकारणापायी ती पाडली गेली. कोर्टाने या जनभावनेचा (पुन्हा यात फक्त हिंदू येत नाहीत) मान राखत हा निकाल दिला आहे
कोर्टाने जनभावनेचा नव्हे तर श्रद्धेचा आधार घेतला आहे.

नानबा, पोस्टीमधला विचार आवडला, फक्त येवढच सांगावंस वाटतं की विकुंचा रोख अल्प संख्यांकांची बाजु लावून धरणे असा नाही वाटत मला. त्यांचे गाडी पहिल्यापासून सरकारनी श्रद्धेचा आधार घेऊन निकाल दिला इथेच अडकली आहे.
विकु, तुम्ही ज्या लेखाला "सामनातला अग्रलेख वाटतो" असं म्हणालात आणि मुख्य म्हणजे त्यातलं "देव, धर्मावर विश्वास नसलेल्या लोकांनी मधे लुडबुड करु नये" हे वाक्य जे तुम्हाला आक्षेपार्ह वाटलं ते आणि नानबाची पोस्टं ह्या दोन्ही गोष्टींची सांगड घालून जरा विचार करा. सेक्युलर(त्याच बरोबर बुप्रावादी सुद्धा) असणं म्हणजे नुसता मंदिर मशीद वादाच्या बुडाशी असलेल्या भुखंडाविषयी देव, धर्म ह्याला आजिबात महत्व न देता निकाल देणं आहे का?
१० वर्षापुर्वी ती मशीद पाडली गेली, कोणालाही न जुमानता! हे झाल्यानंतर आता कोर्टानी निकाल परत हिंदुंच्या बाजूनी का नाही दिला? असे पायंडे पडले असते तुमचा स्लिपरी स्लोप अजून गुळगुळीत होऊन त्यावर कोर्टानी फक्त हिंदुंनाच मस्त घसरत जाऊन अजून खालच्या पातळ्या गाठायची मुभा दिली असती (आतापर्यंत).
भारत हळू हळू सेक्युलर होत चालला आहे (आपल्या नकळत), हा निकाल सुद्धा तेच सांगतो.

>>> कोर्टाने जनभावनेचा नव्हे तर श्रद्धेचा आधार घेतला आहे.

न्यायालयाने दिलेल्या अनेक निर्णयांपैकी फक्त एक सोडून बाकी सर्व निकाल हे साक्षीपुराव्यांवर आधारीत आहेत हे अनेकवेळा अनेकांनी लिहिले, वृत्तपत्रात यांविषयी लेख व अग्रलेख आले, दूरदर्शनवर अनेक वकीलांनी व पुढार्‍यांनी सुध्दा यावर चर्चा केली, तरीसुद्धा, "वेताळाने आपला हट्ट सोडला नाही" या चालीवर कुलकर्णी पुन्हापुन्हा न्यायालयाने श्रध्देवर निकाल दिला असे म्हणत आहेत. असो.

कुलकर्णी - समजा वादाकरता क्षणभर हे मान्य करूया की हा निकाल अयोग्य आहे. हा दिलेला निकाल चुकीचा आहे असे सतत म्हणण्यापेक्षा या दिलेल्या निकालापेक्षा अजून कोणता चांगला निकाल देता आला असता हे आपण सांगावे.

राम तिथे जन्मला' ही भारतातल्या बहुसंख्यांची श्रद्धा आहे आणि त्यात सर्व धर्माचे लोक येतात याबद्द्ल माझ्या मनात अजिबात शंका नाही.
हे कशावरून >>> चला रामजन्माचा मुद्दा उपस्थित झाला!

मग तुलसीदासने का लिहिले नाही ? >>>
तुलसीदास इतिहासकार नव्हता, आपणच इतरत्र सिरियस इतिहासकारांबद्दल भाष्य केले आहे, इथे का वेगळी भुमीका?
तुलसीदासाबद्दल मी पण अनेक मुद्दे (त्याचा रामायणातून, राम होता ह्याबद्दल उपस्थित करु शकतो) पण मला राम कुठे जन्मला, राम होता का? देव मानावा का? ह्यात चर्चेत स्वारस्य नाही .

बाकी चर्चा ह्याच वळणावर जाणार होती हे मी कालच ओळखले होते. गाडी तिकडे वळणारच. Happy

त्यांचे गाडी पहिल्यापासून सरकारनी श्रद्धेचा आधार घेऊन निकाल दिला इथेच अडकली आहे

हा आक्षेप मला मान्य आहे. कदाचित लोकांना इरिटेट होत असेल तर मी लिहिणे थांबवेन.

कुलकर्णी - समजा वादाकरता क्षणभर हे मान्य करूया की हा निकाल अयोग्य आहे.

निकाल अयोग्य आहे असे मला म्हणायचे नाही. खरे तर या गुंतागुंतीच्या प्रकरणात 'योग्य निकाल' असा काही असणे अशक्य आहे.

कोर्टाने समजा सारी शंभर टक्के जागा मंदिरासाठी दिली असती आणी निकालात फक्त वहिवाट, कागदपत्रे, pragmatism ई ई आधार घेतले असते तर त्यात मला खटकले नसते. पण

१ श्रद्धेचा आधार घेतल्याने एक अनिष्ट पायंडा पडेल अशी मला भिती वाटते. पंढरपूरचे विठोबा मंदीर स्तूपावर बांधलेले आहे अशी काही जणांची श्रद्धा आहे. या निकालाचा आधार घेउन ते कोर्टात गेले तर ? आमच्या मंदिरात अस्पृशांना प्रवेश दिला तर पावित्र्य नष्ट होईल अशी आमची श्रद्धा आहे हा मुद्दा घेउन काही देवळाचे लोक कोर्टात गेले तर? slippery slope म्हणतो तो हाच.

२ निकालात श्रद्धेचा आधार घेतल्याने ६ डिसे. च्या घटनेला post facto legitimacy प्राप्त करून दिल्यासारखे होईल.

निकालात वहिवाट, कागदपत्रे, pragmatism ई ई आधार घेतले असते तर त्यात मला खटकले नसते. पण >>>

असे तुम्हाला का वाटते? आपण निकालाचा गोषवारा वाचला का? दुसर्‍या दिवशी इ सकाळ नामक साईटवर देखील तीन न्यायाधिशांच्या तीन पिडिएफ आल्या होत्या. त्यात तर हे सर्व विचारात घेतले आहे असे मी वाचले आहे.

Pages