माझं गाव - भाग २

Submitted by गिरीविहार on 27 September, 2010 - 03:27

इतका सुंदर गाव... Happy एकदा भेट द्यायलाच हवी.. त्या किड्याचा फोटू, बैलाचा फोटू.. क्लासच... नो वर्डस.. टू डिस्क्राईब द नॅचरल ब्युटी विथ बेस्ट कलर्स.. !

हिम्सला अनूमोदन.. वाटरमार्क हवाच.

सर्वच फोटो छान. त्या दिव्याच्या फोटोमधला, प्रकाश आणखी वाढवता येईल. (पिकासा मधे आहे सोय.)
रानपडवळाचे फूल, सोनटक्का, भोपळ्याची कळी, निळी फूले, लाजाळूचे फूल, खिडकीतला झरोका मस्तच टिपलाय.

सगळेच फोटो अप्रतिम Happy

गिरीविहारजी आता तुमच्या गावीच एखादं गटग ठरवा Happy

अतिशय सुंदर. धावणारया बैलाचा आणि स्वयंपाक घरात पडलेल्या सुर्यकिरणांचा कवडसा हे दोन फोटो सुरेख. एकदम माझ्या कोकणातल्या मामाच्या गावी गेल्यासारख वाटल. गाव कोकणातल दिसतय....नाव काय गावाच?

अप्रतिम ! छान ! सुंदर...
वासरू... पायवाट....फुलं....गुरं.... केळीचा मखर....पाण्यातली वाट.....नारळ.....खिडकीतला प्रकाश.... नदी............ सगळच मस्त मस्त !
Happy

सुंदर ! कल्पक !! मोकळा श्वास घेतल्यासारखं वाटलं बघून. धन्यवाद.
[खिडकीच्या गजातून दिसणारं घर तर आमचंच वाटल मला; सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं .]

वा ! सुरेख !
गावतर सुरेखच. पण फोटो फारच अप्रतिम सुंदर ! मुळात तुमची दृष्टी फार वेगळी जाणवते. प्रत्येक फोटोतला अँगल ,
बॅक्राउंडची निवड, त्याचे फोकसिंग वा ब्लरपना, कंपोझिशन या सगळ्यात तुमचे वेगळेपण उठून दिसतेय.
काही का।इ फोटो थोडे जास्त एक्स्पोज्ड वाटले, पण त्यातही एक गंमत आहे Happy
४,६,७,८,९,१४,१६,१७,२०,२३,२७,३१३४,३६३७,३८,४०,शेवटून दुसरा मस्त !
अळीचा, झाडाच्या फांद्यातून दिसणारा सुर्यास्त, बुजगावण अन कौलं खासच ! आपण तर बुवा फॅन !
एका वाइल्ड्लाईफ फोटोग्राफिच्या शिबीरात साम्गितलं होतं की " प्राण्यांचे फोटो काढताना सहसा डोळ्यांवरच फोकस करावा, जनरली नाकावर फोकस केला जातो अन मग प्राण्यांच्या नाक आणि डोळ्यांमध्ये बरेच अम्तर असल्याने फोटो फोकस्ड वाटत नाही " याचा विचार केला तर?

सगळे फोटो खूपच छान. अगदी माझ्या मामाच्या गावासारखच दिसतय. (सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं.) Please Please Please गावाचे नाव सांगा.