सारे वसंत...

Submitted by विद्यानंद हाडके on 26 September, 2010 - 06:21

सारे वसंत मजला छळू लागले
ऐकेक पान माझे गळू लागले

कोठेच रंग नाही मनासारखा
दु:खात सौख्य आहे कळू लागले

सांगा कुणी मला मी कसा सावरु
आधारस्तम्भ सारे ढळू लागले

आता नवीन कोठे मरण राहिले
आयुष्य रोज येथे दळू लागले

हासून जीवनाशी जरा बोलता
ईर्शेत लोक सारे जळू लागले

हाका कुणास देऊ अता शेवटी
सारेच ऐनवेळी पळू लागले

गुलमोहर: 

आपली रचना वाचून्,सुरेशभट.इन वरची एक जुनी गझलचर्चा स्मरली.विद्यानंदजी,आपली गझल पूर्णतः स्वतंत्र आहे ही चर्चा निव्वळ योगायोग म्हणून स्मरली,गैरसमज नसावा.

http://www.sureshbhat.in/node/1896

कैलाशजी,
या गझलेच्या निमीत्तानं आपण माझी रचना "सुरेश भट" या संकेत स्थळावर चर्चेचा विषय करवली त्याबद्दल लाख लाख धन्यवाद............. गैरसमज नाहीच.
एवढ्या मोठ्या दिग्गजांच्या गझला त्या ओळीत माझ्या रचनेचा उल्लेख खरे तर हा सम्मानच...
"या अशा चर्चासत्रानं बळ मिळतं बळी जात नाही."
या गझलेच्या क्षेत्रात मी लेकरुच आहे, आपणा सर्वांच्या मार्गदर्शनात मला ठेवा हेच आपणाकडे मागणं...
छाया देसाईजी,
गंगाधर मुटेजी

धन्यवाद.......