बहरता बहरता गळतील माणसे

Submitted by ह.बा. on 25 September, 2010 - 02:04

पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे

तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

पत्थरांशी हबा का खेळ मांडतो?
बावळ्याला कधी कळतील माणसे?

गुलमोहर: 

पत्थरांशी हबा का खेळ मांडतो?
बावळ्याला कधी कळतील माणसे?

यह दुनिया है इन्सानों की इन्सान मगर ढुंढे ना मिला
पत्थर के बुतों से क्या कीजे फर्याद भला टूटे दिल की

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

हा जास्त आवडला. सुंदर गझल. Happy

पत्थरांशी हबा का खेळ मांडतो?
बावळ्याला कधी कळतील माणसे?

धर्मांधतेवर केलेला हा प्रहार आवडला
मतला तर सुंदर आहेच ते वेगळे सांगणे न लगे....

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे-------- हा शेर फार आवडला !

सुंदर गझल हबा जी............मतला आणि मक्ता खास आवडला!!

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

अप्रतिम............ याचीच वाट पहात होतो बरेच दिवस.......... येऊ द्या......!!!

पांचाळांची माणसे आठवली. Happy

एवढे घाव का देतोस सावळ्या?
खेळण्याने तुझ्या चळतील माणसे

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे

दोन्ही आवडले.

देव दाऊ नको दैत्यांस येथल्या
बांधुनी मठ तुला छळतील माणसे
>>> हा सगळ्यात आवडला.

(हे जी जी रं जी नको करुस रे कुणाला. आदर दाखवण्यासाठी 'जी'ची गरज नसते Happy )

मिल्याजी, वीरा

प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

(हे जी जी रं जी नको करुस रे कुणाला. आदर दाखवण्यासाठी 'जी'ची गरज नसते ) >>> खरं आहे. पण मी आदर दाखविण्यासाठीच म्हणतो असे नाही. वयस्कर आणि अनोळखी लोकांसाठी जी वापरतो. भेट झाल्यावर मी आपोआप मूळ जागेवर येतो.

अतिशय सुंदर गझलेतील दुधात,

तू तिची एवढी चिंता नको करू
जा तुझ्या वेगळी रुळतील माणसे

हा मिठाचा खडा वाटतो. कृपया वाईट मानू नये. पण हा शेर इतक्या चांगल्या गझलेत खरंच नको होता.
अजून लिहा.

पालवी सारखी मिळतील माणसे
बहरता बहरता गळतील माणसे
सत्य आहे. गझल लाजवाब!!!!!!!!!!

हणमंता

मित्रा,
तुझ्या काही द्विपदी लैच खास..
मला मीटर (गण) कुठला घेतलाहेस ते सांगशील का ?

( वाचता वाचता विडंबन सुचले. परवानगी असेल तर टाकतो..)

पान खावूनि ते गिळतील माणसे
लोळता लोळता मळतील माणसे

सगळ्यांना चुना हा लावतो भय्या
ध्यान झाले तर खवळतील माणसे

यूपिची एवढी चिंता नको करू
येथली बावळी पळतील माणसे

काम दाऊ नको मूर्खांस येथल्या
बांधुनी मग तुला छळतील माणसे

मी मराठीच, भावाशीहि भांडतो
सोडुनी गावकी गळतील माणसे

Pages