क्रोशा स्वेटर - टोपी आणि पर्स आणि छोटीशी मॉडेल :)

Submitted by मीन्वा on 21 September, 2010 - 01:20

माझा आधीचा स्वेटर पाहून मला मिळालेली ही पहीली ऑर्डर.
खूप जणींनी वीण आणि स्वेटर कसा करायचा ते लिहायला सांगीतलंय ते मी लिहीणारे पण वेळेची मारामारी आहे. वेळ झाला की लिहीन. हे मी इकडे लिहीलंय. http://www.maayboli.com/node/19914

174.JPG

स्वेटर घालून रमा:

2.JPG

टोपी वरच्या चित्रात जी दाखवली होती ती जरा लहान होत होती. मग ती जरा उसवून मोठी टोपी केली तेव्हा पॅटर्न थोडा बदलला आणि मिनोतीने सांगीतलेलं करेक्शन पण केलं. टोपी आणि स्वेटर घालून रमा.

3.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्तच आहे ग हे. हात एकदम सफाईदार आहे तुझा Happy

टोपीमध्ये एक सुधारणा सुचवू का?

तू चेनची रिंग करुन पहिला खांब घालतेस ना तर तिथे आधी ३ साखळ्या घालून घे मग खांब घाल. म्हणजे शेवटचा खांब तो पहिल्या साखळीच्या खांबाला जोडून घेता येतो. मग पुढची ओळ घालताना परत ३ साखळ्या -- जोडुन पुढे असे करत जायचे. म्हणाजे मग चकलीसारखे दिसत नाही जे तुझे टोपीत दिसतेय.

सुचना केली म्हणुन रागावू नकोस. इतके सुंदर काम अजुनही छान दिसावे असे वाटले म्हणुन सांगते आहे.

मिनोती, मी तसंच केलंय गं दोन साखळ्या घातल्यात प्रत्येक नवी ओळ सुरु करताना. पण मी जोडून नाही घेतलं. पहाते करुन. सूचना द्यायला काहीच प्रश्न नाहीये. मी करुन पाहीन दोन्ही मधे काय फरक दिसतो ते.

धन्यवाद सगळ्यांना. मंजू अगं ऑफीसमधल्या एका कलिगची मुलगी रमा Happy

अप्रतिम !!
खूप गोड दिस्तंय Happy
मिनोती म्हणतेय ते बरोबर आहे. तसं केल्याने एक वर्तुळ पूर्ण दिसतं. चकलीसारखं दिसत नाही Happy

मीन्वा जबरीच झालाय अंगा आणि टोपी पण. माझी पण ऑर्ड्र तुला, मैथिलीसाठी फ्रॉक करायची क्रोशात विणलेला. आणि मला शिकवायची जबाब्दारी ही तुझीच. Happy

सुरेखचेय... कृतीही टाक ना लवकर...
नविन ओळीची सुरुवात नेहमी साखळ्यांनीच करत जा म्हणजे दिसायलाही सुरेख दिसते आणि मोजायलाही सोपे जाते...

वा हे तर अजूनच गोड झाले आहे. नंदिनीच्या मुलीला परफेक्ट होईल. ते खांब साखळ्या वगैरे समजावून सांगा ना. का मिनोतीचा वेगळा ब्लॉग आहे त्यासाठी?

आतनं हल्का कॉटन चा फ्रॉक घालायचा नाहीतर बॅनलॉनचा व हे वरून घातले कि छोटी राणी अगदी ऐट बाज दिसेल. मोजे पण हवेत. पर्स मध्ये एक एक्लेअर Happy

धन्यवाद समद्यांना..

डॅफो पर्स सोप्पीये की ऑर्डर घेऊ का Wink ?
अमा लिहीणारे मी वेळ झाला की.. (म्हणजे कधी विचारु नका.. )
दिमडे मैथिलीसाठी फ्रॉक करु की, पण तुला शिकवायचं म्हणजे Proud
मंजू मीच शिकतेय गं अजून, तरी लिहीन जमेल तितकं. हे करणं जितकं इंटरेस्टींग आहे तितकंच ते लिहीणं बोरींग म्हणून मागे पडतं मग.

सुंदर आहे!

मिनोती म्हणते तसे ३ चेन घातल्या सुरुवातीला घालून व मग शेवटी फक्त एक स्लिप स्टीच केले के ते शेवटचे जॉइन होते.

डॅफो पर्स सोप्पीये की>>> मनातल्या मनात विणून पण झाली गं मिन्वा माझी Lol
हल्ली टाईम इल्ला. घेउन टाक ऑर्डर.. हा छोटा सेट पण चालेल माझ्या छोट्या परी साठी Happy

Pages