निसर्ग असा आहे ग

Submitted by मराठी शब्द on 15 September, 2010 - 10:43

पहील्यांदाच काव्य लिहीले आहे. सांभाळुन घ्या.

रक्तवर्णी पानझडी
दिल्या मी तुला ग
दूर तेथे शीळ घाली
राघू तो हिरवा ग

धूर-दुलई पांघरली
सरीतेच्या पाण्यानं
ती आली झूळकन
चमकती मासोळी ग

शांततेची नीरवता
ऐकलीस का ग
भूलून त्यास येई
ससूला बाहेर ग

भूंगा काळा कडक
त्यामागे मधूभक्षी ग
त्याच्याकडे चावी तर
माशी करे चोरी ग

किती सांगू अन कसे
माझे असे वर्णन
मी तुझ्या भोवतीचा
निसर्ग असा आहे ग

गुलमोहर: 
शब्दखुणा: