आमचे ऑटोमेटेड लग्न

Submitted by रुपाली अलबुर on 15 September, 2010 - 08:46

हा लेख हि आमच्या अति तंत्रज्ञ बुद्धीतून जन्माला आलेल्या कल्पना आहेत !!

आम्ही सगळेच कॉम्पुटर चे विद्यार्थी !! एखाद्या लग्नाला जाऊन आलो कि हे असे केले तर किती मजा येईल अशी चर्चा व्हायची !! माझे लग्न ठरले तेव्हा पण अशा किती तरी अभिनव कल्पनांचा उगम झाला !! त्याच इथे लिहित आहे !!

१. कन्व्हेयर बेल्ट वरून आशीर्वाद द्यायला आलेले लोक -

लग्नात सगळ्यात जास्त कोण दमते.. तर वधू आणि वर !! वर खाली करूनच त्यांची वाट लागते !! त्यात भरीस भर मुलगी सांगते " या कि नै आमच्या काकुच्या काकू हम्म !! " (याचा गर्भित अर्थ " पाया पडा " असा असतो ) आणि मग वाका !! पुन्हा नवीन काकू येईपर्यंत वाकून राहता येत नाही म्हणून काकू येई पर्यंत वर या !! वाका वाका ( शकीराचे नाही हो !! ) मध्ये कंबर " मला जाऊ द्या न घरी आता वाजले कि बारा " असे ओरडून सांगायला लागते !! म्हणून आमच्या एका मैत्रिणीने सुचवलेला उपाय !!

लग्नात कन्व्हेयर बेल्ट बनवायचा !! वधू वराने खाली वाकून उभे राहायचे आणि बेल्ट वर मोठ्यांनी चढायचे . एकाच्या पाया पडून झाले कि दुसर्याने यायचे आणि विमानतळावर सरकणाऱ्या सामानाप्रमाणे मोठे पुढे पुढे सरकत राहतील !! यांनी मात्र हात जोडून खाली वाकून उभे राहायचे !!

२. आहेर न देणाऱ्याला जेवण मिळू नये अशी सोय !!

हल्ली आहेर आणू नये अशी तळटीप असते !! पण तरीही मनातून कोणीतरी काहीतरी आणले आहे का असे चपापून पहिले जात असतेच !! तर मग अशी तळटीप लिहिलीच नाही आणि आहेर आणला नाही त्याला जेवण मिळू नये अशी सोय केली तर ?? अशी एक अभिनव कल्पना एका सुपीक डोक्यातून आली .

त्यातून उगम झाला स्क्राच कार्डाचा . आहेर मिळाला कि करवलीने स्क्राच कार्ड द्यायचे आणि मग त्यात आलेला नंबर टाईप केला कि भोजन समयी चविष्ट पदार्थांच्या चवीचा आनंद घेता येऊ शकेल !! हि एक सुपीक कल्पना !!

३. आहेर नाहीतर बाहेर !!

तळटीप बदलून आहेर नाही तर बाहेर अशी केली तर कसे ?? हि आणखीन एक अभिनव कल्पना !!

४. अक्षता टाकणारे मशीन

मुला मुलीच्या डोक्यापर्यंत अक्षता क्वचितच पोहोचतात !! हल्ली काही लग्नांमध्ये रांगेत उभे राहून त्यांच्या जवळ जाऊन डोक्यावर अक्षता टाकणे असा एक प्रकार मी पहिला !! पण तो मंत्र पुष्पांजली नंतर देवापाशी जाऊन फुले वाहण्यासारखे झाले आणि ती कल्पना काही रुचली नाही आम्हाला !! म्हणजे मंगलाष्टके संपली कि मग डोक्यावर अक्षता !! त्यात मजा नाही .

म्हणून दारातून आत येताना पाहुण्यांनी अक्षतांच्या ताटावर हात ठेवायचा !! मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी त्या अक्षता मशीन मध्ये टाकायच्या !! आणि सावधान असा शब्द आला कि मशीन मधून मुला मुलीच्या डोक्यावर अक्षता पडायला पाहिजेत अशी सोय करायची !! मोठ्यांच्या आशीर्वादाचा आणि अक्षता मुला मुलीच्या डोक्यावर बरोबर पोचतील याचा पूर्ण लाभ मिळेल !!

५. नाव सुचवणारे मशीन

नाव घेणे हा आणखीन एक कठीण जाणारा प्रकार !!

म्हणून डिजिटल स्लायडिंग साईन बोर्ड अशी एक कल्पना आली !! म्हणजे प्रत्येक विधीच्या वेळी घायचे नाव त्याच्यावर दिसेल अशी सोय !!
जो विधी सुरु होईल त्या विधीशी संबंधित नाव त्या बोर्डावर दिसेल आणि मुलासाठी आणि मुलीसाठी अशी वेगळी वेगळी उखाण्यांची यादी सरकत राहील !! यादीतली २ एक नावे घेतली तरी पुरेल !!

अशा किती तरी विनोदी कल्पना मला गप्पा मारताना बहिणी नाहीतर मैत्रिणी सुचवत राहतात !! तुमच्या डोक्यात आहे का काही ऑटोमेशन ची कल्पना ?? आमचे ऑटोमेटेड लग्न बहारदार बनवायला ??

तळटीप : या प्रयोगांची कल्पना एक विनोदाचा भाग म्हणून घ्यावी !! गंभीरपणे घेतल्यास लग्नात ऑटोमेशनचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

गुलमोहर: 

वधू किंवा वर स्वतःच्या लग्नास पोहोचू न शकल्यास Webcam/Monitor वगैरे वापरून लग्न लावणे...
(काही वर्षांपूर्वी US मधून वेळेवर न येऊ शकल्यामुळे वराच्या फोटोला हार घालून लग्न लावल्याची कथा ऐकली होती)

त्यापेक्षा ई लग्न का करु नये.

पत्रिका ईमेल कराव्यात, एखाद्या साईटवरुन डायरेक्ट टेलिकाष्ट करावे. इष्टमित्रांनी, नातेवाईकांनी घरबसल्या पहावे व आशिर्वाद द्यावेत. (येण्याजाण्याचा त्रास नाही, गाडीघोड्याचा प्रश्न नाही, हॉलचे भाडे नाही ) यू ट्यूबसारखे क्लिक्स वरुन किती पाहुणे आले तेही कळतील. जेवणाच्या डिशेसचे फोटो दाखवायचे कंत्राट मी घेऊ शकेन.
भटजी पण आपल्या घरातून मंगलाष्टके म्हणेल.
नवरा नवरी ए.वे.ए.ठी. असले तर बरे, नाहीतर वेब कॅमेरा आहेच.
(हे पण हलक्यानेच घ्यायचे बरं का )

@ दिनेशदा - इ लग्न करायला मान्यता मिळाली नाही तर म्हणून ऑटोमेशन करणार Happy . रजिस्टर लग्नालाच मान्यता मिळत नाही अजून
@परदेसाई - माणूस गेला कि हार घालतात हे ठावूक होते Happy हे नवीनच ऐकायला मिळाले !! " मेला बिचारा !! " असा म्हणतात लग्नानंतर !! हा वास्तव प्रत्यय आला असेल Happy
@स्वरूप - आभार

पूर्वी Greencard अडकले असताना Parole visa मिळताना अनेक दिव्य असायची. पण लग्न तर करायचे होतेच. मग... Proud

आता Webcam ची सोय आहेच.. भटजीने 'हाताला हात लावा...' म्हटले की Monitor चा उपयोग..
(कल्पनाशक्तीला आवर घालावा).

" मेला बिचारा !! " असा म्हणतात लग्नानंतर<<<< सत्य आहे Proud

मुठीतील सुपारी ओळखणे
चपला लपविणे
हे जुनाट खेळ झाले.
त्यापेक्शा वधु-वर पक्शातील लोकान्नी संगणक किंवा सेलफोन वर खेळ खेळावेत व
जिंकणार्या गटासाठी common निधीतुन पारितोषिके असावित.

मुठीतील सुपारी ओळखणे
चपला लपविणे
हे जुनाट खेळ झाले.
त्यापेक्शा वधु-वर पक्शातील लोकान्नी संगणक किंवा सेलफोन वर खेळ खेळावेत व
जिंकणार्या गटासाठी common निधीतुन पारितोषिके असावित.

वधु -वरांच्या मागे फुलांची सजावट लावण्या ऐवजी Flat screen tv ठेवावा.
त्यावर कधी समुद्राच्या तळाशी, कधी अंतराळात वधु वर आहेत असे आभास निर्माण करता येतील.
या TV मध्उनच थोड्या वेळाने भटजी येउन मंत्र म्हणेल.

लई भारी आयड्या ,
conveyor belt ने लोकांची सोय होईल पण नवरा-नवरी कमरेत वाकुन राहिल्यामुळे त्यांची कंबर जाईल ना कामातुन , त्यापेक्षा साष्टांग दंडवत घालताना जसं पालथं पडतात तस नवरा-नवरीने त्या conveyor belt समोर पालथं पडुन रहायचं Proud
नाव सुचवणारे मशीन पण भारी आयडिया आहे , पण आधीची नावं डिलिट करायला विसरले नाही म्हणजे मिळवली. नाही तर लग्न एकाशी आणि बिल तिसर्‍याच्याच नावावर Proud

आणि अनाउन्समेंटपण हवी (तीन भाषांतून) , नाशिकसे आनेवाले नातेवाईक, कन्व्हेयर बेल्ट नं ३ पे आयेंगे, मुंबईसे आने वाले कन्व्हेयर नं २ पर.

सही कल्पना आहे...आता माझ्याकडून पण काही...आलेला आहेरसुद्धा conveyor belt वरुन गाडीत जाऊन पडेल आणि पाहुण्यांना आहेर देल्याचे एक कुपन मिळेल.ते वेंडींग मशिनमध्ये घातले कि लाडू-चिवडा,ओटीची पिशवी आणि return gift मिळेल Proud

माझ्याकडून अजून एक आयडिया Wink
लग्नाच्या सीडीज/ व्हिसीडीज इत्यादी लग्नानंतर वर-वधूंचे जवळचे नातेवाईक सोडून फारसे कोणी बघत नाही.
तर त्या लग्नाच्या विधींचे लाईव्ह टेलिकास्ट कार्यालयात मोठा स्क्रीन लावून चालू ठेवायचे.... त्याचा फायदा असा होईल की आपण जे काही करतोय ते स्क्रीनवर सर्वांना दिसत असल्यामुळे निमंत्रित लोक जरा शिस्तीत वागतील/ बसतील Proud आणि त्या विधींचा आनंद पुढच्या ओळीत बसलेल्यांपासून मागील ओळीत बसलेल्या सर्वांना घेता येईल. (शिवाय आपण स्क्रीनवर कसे दिसतो वगैरे टीपी तर करता येईलच! ;-))

>>गंभीरपणे घेतल्यास लग्नात ऑटोमेशनचे गंभीर परिणाम भोगावे लागतील

फक्त लग्नात नै कै, लग्नानंतर सुद्धा भोगावे लागतील Wink Light 1 Biggrin

त्याहून बेस्ट म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या घरातच लग्न करायचे आणि त्याचे इ-प्रसारण करायचे निमंत्रितांना. आणि इमेलवर फूड कूपन आपल्याला हवे तिथले पाठवून द्यायचे. जेवतील जेवायचं तेव्हा.. Happy

Lol मस्तच.
नवर्‍या मुलाचे जोडे लपवल्यानंतर ते शोधण्यासाठी ऑटोमेटेड कुत्रा तयार करावा अशा विचारात आहे.

Lol
या सगळ्याबरोबर साड्या, दागिने [घातलेल्या आणि आहेरातल्या] इ.इ. च्या खर्‍या किंमती अचूक सांगणारा एक स्कॅनर असावा, बहुतेक बायकांच्या शंकांना त्वरित उत्तर मिळेल. पाकिटात किती रक्कम आहे ते उघडता सांगणारा स्कॅनरपण हवा. Lol

छे लग्नाला कोणी हजरच रहाणार नाहीयेत ना. लग्नाचे इप्रसारण, जेवणाच्या ऐवजी फूड कुपन्स असं असेल तर आहेराच्या ऐवजी गिफ्ट कूपन्स हे जास्त सोपं ना. Happy

Pages