किलबिल - नचिकेत छत्रे : टाकाऊतून टिकाऊ चिमणीचे घरटे

Submitted by संयोजक on 14 September, 2010 - 13:53

मायबोली आयडी : पौर्णिमा
नांव : नचिकेत छत्रे
वय : ७ वर्षे
वापरलेले साहित्य : नारळाच्या शेंड्या, झाडाची वाळलेली पानं, वाळलेलं गवत, कापूस, एक पेपर प्लेट (नारळाची करवंटीही वापरू शकतो), चिमणीचं चित्र, काडेपेटीची एक काडी, फेव्हिकॉल.

माझी मदत- साहित्य गोळा करून देणे, थोड्या कल्पना देणे..

शाळेमध्ये 'पक्ष्याचे घरटे' असं प्रोजेक्ट होतं.. त्यासाठी वापरलेले सर्व मुख्य साहित्य हे टाकाऊ आहे.

:Kilbil_TT_Paurnima.jpg

१) एका पेपरप्लेटवर मधोमध कापूस ठेवून, बाजूने वाळलेले गवत, नारळाची शेंडी, वाळलेली पाने इत्यादी फेव्हिकॉलने चिकटवले.
२) साध्या कागदावर एका पक्ष्याचा कटआऊट काढला, तो रंगवला.
३) काडेपेटीच्या काडीला हा कटआऊट चिकटवला आणि ही काडी मध्ये कापसावर चिकटवली.
४) घरटे तयार.

हे कोणाला भेट देता येणार नाही अर्थातच, पण प्रोजेक्टसाठी सगळे टाकाऊ साहित्य वापरूनही प्रोजेक्टला शाळेत 'ए' मिळाला आणि स्टारही Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages