आभाळ लागले मिळू

Submitted by स्वानंद on 14 September, 2010 - 11:44

आता कुठे उजाडले आभाळ लागले मिळू
सविता प्रकाश लागला या चांदण्यात विरघळू

वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला
तव चोरटा कटाक्ष गे मग लागला जिवा छळू

येशील भेटण्यास तू जेव्हा पुन्हा मला प्रिये
प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू

ना सांगता कधी तुला ना बोलता कधी मला
माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू

नाही कुठे उणेपणा संसारवेल मोहरे
एकेक स्वप्न साजिरे साकारते हळूहळू

-स्वानंद
http://amrutsanchay.blogspot.com/

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

वेडेपणा सुखावला मी पाहिले जधी तुला

जधी म्हनजे काय?
मराथी शब्द कोशतिल नविन शब्द?

माझे तुला तुझे मला मनमीत लागले कळू

मनमित लागले कळु? मनमित कि मनोगत?
मनातले कलु लागले अस आपल्याला सांगायच आहे ना?मग मनमित कस येइल?

बाळकवी,
प्रतिसादासाठी आभारी आहे.

जधी हा शब्द जेव्हा या अर्थाने वापरतात
जसे
वार्ता ही सुखद जधी पोचली जनी
गेहातून राजपथी धावले कुणी

'मनमीत लागले कळू' यातून आपल्याला जो उमगला तोच भाव पोचवायचा आहे.

जधी हा शब्द जेव्हा म्हणुन वापरतात हे आताच समजले. आभारि आहे.

मनमित म्हणजे मनातिल व्यक्ति किंवा आपला प्रेमि,पन आपल्या गजलेत माझे तुला तुझे मला मनमित लागले कळु येथे प्रेमि पटत नहि.मनातिल भाव हे योग्य आहे.पन मनतिल भाव मनमित मधुन पोचत नाहि.

आनंदयात्री शी सहमत अवघड वृत्त आहे..

मतल्यातला उला मिसरा जमून आलाय

प्राणात माळ केवडा दोघे मिठीत दरवळू >>> ह्यावरून नुकताच लिहिलेला माझा एक शेर आठवला... लवकरच टाकेन ती गझल