काहीतरी. नव्या स्वरुपात.

Submitted by बाळकवी on 14 September, 2010 - 11:41

काहितरि कराव अस वाटत
काहितरि भराव अस वाटत

दुखन द्याव फेकुन आनि
सुख चराव अस वाटत

मरन जगाव आनि
जगन मराव अस वाटत

हातातल फेकुन द्याव आनि
पलत धराव अस वाटत

सगल संपाव आनि
फक्त आपनच उराव अस वाटत.

-बाळकवी

आशय तोच्,अर्थ तोच.त्यात काही बदल नाहि.

वाटते काहीतरी मी ही करावे
जीवना सुख शांति,प्रेमा ने भरावे

का बसू दु:खास जोपासून आता?
आज का सुखनैव मी नाही चरावे?

माझिया जगण्यास मरण्याची उपाधी
प्रश्न हा पडला,जगावे की मरावे?

योग्य ना जाणे जरी पळत्या गमानी
वाटते मम फेकुनी ,पळते धरावे

एकटा मी काय कंठू जिंदगानी
वाटते संपून सारे,'मी' उरावे.

गुलमोहर: 

ही स्टाइल/भाषाशैली(?) ओळखीची वाटतेय.

आपनाला हि कविता कशि वाटलि?
मि मायबोलिचा नविन सदश्य आहे.माझे नाव बाळकवी आहे. खरे नाव बाळ असे आहे.

भरत Lol

अप्रतिम काव्य..... !!!!!!!!!!!!!!!!!!!!

थोडेसे रसग्रहण करतोय.

अगदी सहज साध्या शब्दांतून बरेचकाही सांगून जाणे, असे अपरंपार कौशल्य सर्वांनाच जमेल असा खाक्या नियतीला कधीच पाळला आला नसावा म्हणुन तर फारच क्वचित कवींनाच अशी अलौकीक प्रतिभा प्राप्त झाली असावी. आता प्रस्तूत कवीच्या वरवर साध्यासुध्या भासनार्‍या पण अर्थाने ओतप्रोत भरलेल्या या ओळी बघा.

काहितरि कराव अस वाटत
काहितरि भराव अस वाटत

काहीतरी हालचाल करणे हीच तर सजीवसृष्ठीची मुलभूत प्रेरणा. पण ती प्रेरनाच जेंव्हा लोप पावलेली असते तेंव्हा मृतावस्था प्राप्त होउन जीवनजगण्याची उमेदच नैराश्याकडे झुकायला लागते. सगळीकडे अंधारही अंधार भासायला लागतो, जगणे कठीन होऊन जाते, मग कोणाला हे जग "जग हे बंदिशाळा" असे वाटायला लागते तर कधी हीच अवस्था प्राप्त झाल्यामुळे शतकाच्या महानायकाला " ये जीना भी कोई जीना है लल्लू?" असे वाटायला लागते.
पण प्रस्तुत कवितेचा कवी जरी नावाने बाळ असला तरी मात्र विचाराने मात्र खूपच पक्व भासतो कारण त्याने ती अवस्था अगदी लीलया ओलांडलेली आहे, म्हणुन तर त्याला "काहितरि कराव अस वाटत " अशा नव्या उमेदीच्या, जगाला "आहेरे" च्या चैतन्यशिल अवस्थेकडे नेऊ पाहणार्‍या सहजसुंदर आणि बोलक्या ओळी सहज सुचून आल्या आहेत.
एवढेच नव्हे तर सबंध विश्वात सध्या जी एक नाकर्तेपणाची प्रचंड पोकळी निर्माण झाली असल्याचे बघून कवीचे अंतकरण द्रवलेले असनार. आता या पोकळीत काहीतरी भरायला हवे, अशी जाण कवीला होणे, ही बाब कवीची सामाजीक बांधिलकी अधोरेखित करते. शिवाय हा कवी जे काही करायचे इतरांनी करावे, मी मात्र नुसते पलंगावर लोळून, लालीपॉप चघळत चघळत नुसत्याच कविता करेन असे अजिबात म्हणत नाही.
आपन सर्व मिळून करू म्हणतोय. आणि जर का त्याला या कार्यात या बेदर्दी जमान्याची साथ लाभणार नसेल तरीही या कवीचे काहीही बिघडत नाहीये. प्रसंगी मी "एकटाच" करेन, मागे हटणार नाही असे म्हणतो आणि हीच
तर क्रियाशिल काव्यकवीची मुख्य खूण आहे. या सद्कार्यात कवीला माझ्या अनंत शुभेच्छा.
ब्लॅक होल म्हणा की कृष्णविवर म्हना, त्याला कोणत्या शब्दाने म्हणायचे यापेक्षा त्याला कशानी भरायचे हा विचार फारच महत्वाचा आहे. ब्रम्हांडातील या सर्व पोकळ्या भरायलाच हव्यात. या कामी कवीने जो पुढाकर घेतलाय त्याचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे म्हणुन "काहितरि भराव अस वाटत" या ओळी औचित्याला धरूनच आहे, याबद्द्ल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही.

उर्वरीत ४ कडव्यांचे रसग्रहण यथावकाश. Happy

एक अंमळ अर्थहीन, अगम्य आणि असंबद्ध जड कविता वाचून बद्दकोष्ठ व्हायची वेळ आली होती,
पण कवीचे हे हलकं फुलकं जिवन गाणे ऐकून बरंssssss वाटलं. Proud

बाळ कवी झालेले पाहून मायबाप खूश झाले असतील... त्यात अशी कवीता म्हणजे तर सोन्याहून पिवळे... सदिच्छा!!! जिवन गाणे खरे असेल तर विपूत तसे कळवा.

ही रचना दिशाभूल करणारी 'वाटते'.

बाळकवी म्हणजे कोण याचा अंदाज आहे. ही रचना त्यांनी मुद्दाम त्यांच्या असलेल्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची केलेली असावी.

ते आता स्वतःला बाळकवी मानतात हे मराठी या भाषेवर त्यांचे उपकार आहेत.

तू भूत हो'उ'नी दा'खि'व मुडद्या डरतो का 'नै' बघ अशी एक ओळ मला आत्ता सुचली. उगीचच! हा हा हा हा!

-'बेफिकीर'!

बेफिकिरजी सहमत. Happy

पण बाळकवी म्हणजे नक्की कोण याचा अंदाज मला (खात्रीपुर्वक) आलेला नाही,
मात्र बाळकवी म्हणजे "जिवन गाणे" मात्र नक्किच नाही.
आणि तसे असेल तर बिच्चारा "जिवन गाणे" (जिगा), न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. Sad

एवढे प्रतिसाद बघून मन (?) भरुन आलं.
माझ्या प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल आधी प्रतिसादकांची क्षमा मागतो.इथे नवीन असल्याने व टायपिंग मध्ये बर्‍याच चुका होत असल्याने आधी टायपिंग नीट शिकलो.इथल्या कविता,गजल विभागाचे यथेच्छ वाचन केले आणि मगच आपणा सर्वांना उत्तर्,माफ करा प्रतिसाद देण्यास आलो,म्हणून उशीर झाला.

भरत्,आनंदयात्री,शशांक प्रतापवार,विशाल कुलकर्णी,हंसा,मंदार जोशी,मधुकर्,हबा यांच्या जिवन गाणे च्या वारंवार होणार्‍या उल्लेखामुळे जिवन गाणे व त्यातील जिगा ही अक्षरे ठळक करण्या मागचे रहस्य २ दिवसांत शोधले व कविश्रेष्ठ जितेंद्र गावंडे हे रहस्यमयी व्यक्तीमत्व सापडले.आपणा सर्वांना मी शपथेवर सांगतो,मी कवीश्रेष्ठ जितेंद्र गावंडे नाही.

आपण सर्वांनी दिलेल्या प्रतिसादात माझा उपहास व थट्टा झाली आहे हे उघड आहे.गंगाधर मुटे यांनी तर रसग्रहण करुन खिल्ली उडविण्याचा कळस केला आहे.

फक्त बेफिकिर या सद्गृहस्थाच्या प्रतिसादाचा मला काही अंदाज बांधता आला नाही.

ते आता स्वतःला बाळकवी मानतात हे मराठी या भाषेवर त्यांचे उपकार आहेत.

ह्या वाक्यावरुन माझी त्यांनी सुद्धा थट्टाच केली आहे असे मी गृहित धरतो.

माझ्या काव्याची टर उडविणार्‍या सन्माननीय मायबोली सदस्य बंधु आणि सदस्य भगिनींनो,

माझ्या याच कवितेचं रसग्रहण मी माझ्या पुढील प्रतिसादात करतोय.तो पर्यंत आपल्या प्रतिसादांच्या अपेक्षेत आहे.

<< जिवन गाणे व त्यातील जिगा ही अक्षरे ठळक करण्या मागचे रहस्य २ दिवसांत शोधले>>

संबधित पहिल्या प्रतिसादाची वेळ - shashank pratapwar | 15 September, 2010 - 08:20
आताच्या प्रतिसादाची वेळ - बाळकवी | 15 September, 2010 - 19:48 नवीन

२ दिवस?
....................................
मी टर उडविली नाही. माझ्या मते त्या ओळींमध्ये तेवढा किंवा त्याहूनही जास्त अर्थ दडलेला आहेच. Happy

ही रचना त्यांनी मुद्दाम त्यांच्या असलेल्या क्षमतेपेक्षा कमी क्षमतेची केलेली असावी.
>>>

हे माझे आधीच्या प्रतिसादातील एकंदर मतांपैकी एक मत! हे मत थट्टा नाही. बाकी थट्टा आहे. पण ती आपली (जर आपण 'ते' नसाल तर) मुळीच नाही.

मात्र, आपली कविता थट्टेस पात्र जरूर आहे असे माझे प्रामाणिक मत आहे.

'रसग्रहण' या शब्दाची भीती बसलेली आहे.

शुभेच्छा!

shashank pratapwar | 14 September, 2010 - 22:50
भरत मयेकरांना अनुमोदन!
हि कविता नाही हे तर जिवन गाणे आहे कोण्या ओळखीच्या माणसाचे...

बाळकवी | 15 September, 2010 - 10:18
एवढे प्रतिसाद बघून मन (?) भरुन आलं.

१४ सप्टेंबर आणि १५ सप्टेंबर असे दोन दिवस .

मायबोलीवरील कथा वाचुन मीही काहीतरी लिहावे असे वाटत होते --- पण असे प्रतीसाद -- बापरे हिम्मतच नाही होत Happy
शाळेत निबन्धही नीट लिहीत येत न्हवता -- मी आपली वाचक म्हणुनच ठिक आहे Wink

रश्मीजी, तुमचे मत मी समजू शकतो. पण मायबोलीवरील माझ्या ४२ आठवड्याच्या अनुभवावरून मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू इच्छितो की मायबोलीवर टर उडवणारे, नाउमेद करणारे जेवढे आहेत ना त्यापेक्षा संख्येने कितीतरीपट अधिक चांगल्याला समर्थन देणारे, वेळोवेळी मदत करणारे, इतरांना लिखानास चालना देणारे आहेत.
त्यामूळे नाउमेद न होता नक्की लिहा.:)
आणि लिहिले की मला लिंक द्यायला विसरू नका.
(नाउमेद करणार्‍यांकडे दुर्लक्ष करा.)

आशय चांगला कवितेचा...
पण....
कुणीतरी आहे इथे....
एवढ्या टायपो मिस्टेक का पण....?

.

मित्रहो............ ही कविता माझी नाही आहे.....................

क्रुपया बाळवचिच्या भावना समजुन घ्याव्या ही विंनती...............

मित्रा जितेंद्रा, ही तुझी कविता नाही हे तू अधिकृत जाहिर केलेस, हे छान केलेस.
तू न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आम्ही तुला दिली, तरीही तू रागावला नाहीस, "हे उंटावरच्या शहाण्यांनो,अकलेचे तारे तोडणार्‍यांनो....माझी माफी मागा" असे म्हणाला नाहीस, हा तुझ्यातला एक गुण मला फार आवडून गेलाय. दुर्मिळ झालाय रे आजकाल हा गुण.

तरीही नकळत माझ्याहातून घडलेल्या चुकीमुळे मी तुझी जाहिर माफी मागतो. Happy

माझी थोडी शी समीक्षा :

काहितरि कराव अस वाटत
काहितरि भराव अस वाटत >>>> बहुदा कवीला सकाळच्या पारी बायकोने नळावर पाणी भरण्यास पाठवले असावे . कवीला काही तरी "करावं " असं वाटंतय ..एकदा घाघर भरली की पळता येईल या विचाराने कवी "काही तरी भराव अस वाट्त" असं म्हण्त असावा .

दुखन द्याव फेकुन आनि
सुख चराव अस वाटत >>>>>>>>>>> वरील कडव्या वरुन कवीला काय "फेकुन" द्यायचे आहे हे कळते पण लगेच सुख चराव Uhoh

मरन जगाव आनि
जगन मराव अस वाटत >>>>> बहुदा मरन आणि जगाव , जगन आणि मराव हे जुळे भाउ असावेत ..कवीचा त्यांना ओळखण्यात घोळ होत असावा ...पण त्याचा येथे काय संबंध .....ते ही "लायनीत" उभे असावेत कदाचित .......पाणी भरणयाच्या

हातातल फेकुन द्याव आनि
पलत धराव अस वाटत >>>>> कवीच्या भावना समजण्या सारख्या आहेत ...

सगल संपाव आनि
फक्त आपनच उराव अस वाटत. >>>> येथे ही "पटकन लाईन संपावी अन फक्त आपण उराव " हे कवी ची भावना किती उत्स्फुर्त पणे व्यक्त होत आहे...

तात्पर्य : कविने त्याचा "तीव्र "भावना अतिशय "हळुवार" शब्दात प़कडल्या आहेत .....नितांत सुंदर !!!

पुलेशु

प्रसाद,
काहितरि भराव अस वाटत >>>> बहुदा कवीला सकाळच्या पारी बायकोने नळावर पाणी भरण्यास पाठवले असावे . कवीला काही तरी "करावं " असं वाटंतय ..एकदा घाघर भरली की पळता येईल या विचाराने कवी "काही तरी भराव अस वाट्त" असं म्हण्त असावा . Happy

pahilya kadvyache rasagrahan mastach!!!

>>काहितरि कराव अस वाटत
काहितरि भराव अस वाटत

प्रगो शी असहमत.
इथे कवी फार चावट/रोमँटीक मूड मध्ये असावा असं वाटतं. बाकी सुज्ञ समजतीलच Wink

>>दुखन द्याव फेकुन आनि
सुख चराव अस वाटत

वरचे ग्राह्य धरल्यास, काय चरावं हे स्पष्ट आहे.

>>मरन जगाव आनि
जगन मराव अस वाटत

कवीला बायकोने घराबाहेर काढल्यावरचं हे सुचलेलं शहाणपण आहे.

>>हातातल फेकुन द्याव आनि
पलत धराव अस वाटत

कवीने असं करू नये. शेवटी बायको आणि नोकरी-दुसर्‍याची चांगली वाटली तरी त्यामागे पळू नये असं जुनेजाणते सांगतात.

>>सगल संपाव आनि
फक्त आपनच उराव अस वाटत.

येथे कवीची मोक्षप्राप्तीची आकांक्षा दिसून येते. यावरून कवी आध्यात्मिक वृत्तीचा असावा असे वाटते.

Pages