श्रींची आरती

Submitted by रत्नाकर अनिल कमलाकर on 11 September, 2010 - 13:11

जय देव जय देव जय श्री गणेशा
नमन गणपतीबाप्पा कृपाळू अनंता

धुप फुल उदबत्तीने सुरुवातच व्हावी
मधुरनजर बाप्पा मोरयाची पडावी
अडचण कसली आता नको बुद्धीवंता
सुरळित भगवंता सर्व व्हावेच आता
जय देव जय देव जय श्री गणेशा
नमन गणपतीबाप्पा कृपाळू अनंता

जप-स्मरण सहस्त्रवेळ होते तुझे ते
सहजच मग होती प्रश्न सारे मुके ते
तुळस, पत्र शमीचे, एकवीसच दुर्वा
प्रथम स्मरण देवा श्री गणेशायनमः
जय देव जय देव जय श्री गणेशा
नमन गणपतीबाप्पा कृपाळू अनंता

धुसर, पुसट रस्ता तो त्वरे सापडावा
मग यशमयच शिंतोडा तरी तो पडावा
धुसर, पुसट रस्ता तो त्वरे सापडावा
मग यशमयच शिंतोडा तरी तो पडावा
जय देव जय देव जय श्री गणेशा
नमन गणपतीबाप्पा कृपाळू अनंता

नकळत घडल्या चुकास माफी असावी
जन मन दुखवावे ती कृती ना घडावी
सततच शुभ वार्ता मंगलाची कळाव्या
विसर पळभरासाठी तुझा ना पडावा
जय देव जय देव जय श्री गणेशा
नमन गणपतीबाप्पा कृपाळू अनंता

गुलमोहर: