माझी बाग

Submitted by मानुषी on 11 September, 2010 - 05:44

माझ्या बागेत सध्या पेरू , कारली, मिरच्या, नारळ आणि काय काय आलंय. जास्वंदी, गुलाब, तगर, जरबेरा, फ्लाइंग स्पॅरो(बर्ड ऑफ पॅरडाइज)...आणि बरीच शोभेची फुलं सुद्धा.
गणपतीसाठी कमळं सुद्धा फुलताहेत रोज!
m chafa.JPGm coconut.JPGm gardan.JPGm garden.JPGm garden b.JPGmy chilis.JPGmy garden.JPGmy karli.JPGflower_0.JPG

गुलमोहर: 

माधुरी काकू , मस्त बाग आहे Happy . पेरू खाऊन बराच काळ लोटला , कच्चे पेरू खाल्ल्याला तर कित्येक वर्षं उलटली Sad . आता नगरला यायला हवं . Happy

संपदा, ये ना नगरला...आहे का यंदा डिसेंबरात देशवारी?
आशुतोष ते फ्लाइंग स्पॅरो(बर्ड ऑफ पॅरडाइज) आहे.
सूकी, बरोब्बर!.
योगेश, स्वाती, दिनेशदा, रैना सर्वांना धन्यवाद.
दिनेशदा बाग खूप घरभर पसरलेली आहे. नारळ गेटमधे, उजवीकडे सेपरेट वाफा फ्ला. स्पॅरोचा, बाकी मिरची, कारली वगैरे छुटपुट गोष्टी वर..सिटाउटमधे.

मानुषी,
तुमची बाग बहरली आहे तर !
मला तर तो पेरु तोडुन घ्यावासा वाटला... Lol
मी या महिन्यात गावी गेलो की इकडे २-४ नविन रोप आणतोय,
जस खाऊची पानाची वेल, द्राक्षे,सदाफुली .... ही रोपे जगली तर ठिक, प्रयत्न करुन बघायला काय जातयं !
Happy

माधुरी काकू , या वर्षी भारतवारी नाही Sad . पुढच्या वर्षी ऑगस्ट बहुतेक . तेव्हा चक्कर मारायचा नक्कीच विचार करेन . Happy