पहाट

Submitted by रत्नाकर अनिल कमलाकर on 10 September, 2010 - 15:08

सूर्याने एकदा
आकाशात प्रकाशाचे जाळे टाकले
चंद्रच फसला
जाळ्यात

चंद्राचे त्याने काप केले
डोळा चुकवून सूर्याचा
एक कोर हळुवार ऊजाडली

सूर्य प्रसन्न झाला
देखण्या कोरीला
'रात्र' भेट दिली

कोर हळुहळू मोठी झाली
गोल झाली
आणि
नेमके सूर्याने परत
प्रकाशाचे टाकले.

गुलमोहर: