Submitted by गुंड्याभाऊ on 9 September, 2010 - 03:56
साधी सोपि पण झकास शेझवॉन चटणी तयार करण्याची पद्ध्त मला हवी आहे. तरी कृपया ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावी....
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=EIK_N6e3TIc
हि लिंक चांगली आहे.
शेझवॉन चटणी तयार करण्याची
शेझवॉन चटणी तयार करण्याची पद्ध्त मलाही हवी आहे. कृपया ज्यांना माहीत आहे त्यांनी मला सांगावी.
मलाही...लेक खुप दिवस मागे
मलाही...लेक खुप दिवस मागे आहे, टिफीन मधे देण्यासाठी
शेझवान चटणी
शेझवान चटणी
सहित्यः
१०-१२ लाल सुक्या लाल मिरच्या.
दोन गड्डे लसुण.
५-६ पाकळ्या लसुण बारीक चिरुन.
१ कांदा बारीक चिरुन. (पांढरा असल्यास उत्तम)
२ इंच आल किसुन.
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरुन.
मीठ.
तेल.
१ चमचा कॉन फ्लॉवर.
कृती:
दोन गड्डे लसुण सोलुन, लाल मिरच्यां बरोबर १५-२० मिनिटं पाण्यात शिजत ठेवावा.
गार झाल्यावर. पाणी गाळुन मिरच्या आणि लसुण मिक्सर मध्ये वाटुन त्याची घट्ट पेस्ट करावी. पाणी फेकुन देउ नये.
एका भांड्यात २ चमचे तेल टाकुन त्यात मिरची लसुण आल परतुन घ्याव.
त्यात कांदा टाकुन तो चांगला गुलाबी होइस्तव परतुन घ्यावा. लाल रंगासाठी १ चमचा काश्मिरी मिरची पुड टाकुन चांगल परतुन घ्याव.
मग त्यात मिरची लसणाची पेस्ट टाकुन ३-४ मिनिट शिजवावे.
गाळलेले पाणी यात टाकुन योग्य प्रमाणात घनता आणावी.
उकळी आली की १चमचा कॉन फ्लॉवर पाण्यात मिसळुन यात टाकुन १-२ मिनिट शिजवाव.
पुर्ण पणे गार झाल्यावर हवाबंद बाटलीत काढुन फ्रिज मध्ये ठेवा.