आयुष्य

Submitted by kiran chitale on 5 September, 2010 - 16:53

आयुष्य

आयुष्य ही मजा आहे ... ... ती लुट्णा-यांना
आयुष्य ही सजा आहे ... ... ती भोगणा-यांना
आयुष्य हे व्यर्थ आहे ... ... ते अनर्थ जगणा-यांना
आयुष्य हे रूक्ष आहे ... ... त्यात रस न घेणा-यांना
आयुष्य हा खेळ आहे ... ... त्यात रमून खेळणा-यांना
आयुष्य हा रंगमंच आहे ..... त्याकडे एक भूमिका म्हणून पाहणा-यांना
आयुष्य ही कथा आहे ... ... तिच्याकडे गोष्ट म्हणून पहाणा-यांना
आयुष्य ही व्यथा आहे ... ... दु:खात बुडलेल्या जीवांना
आयुष्य हे अंतर आहे ... जन्म आणि मृत्यु मधील ... तत्ववेत्त्यांना
आयुष्य आही एक संधी आहे ... ... तिचा उपयोग करणा-यांना
आयुष्य ही कक्षा आहे ... ... बंधनात राहून जगणा-यांना
आयुष्य हे बेसूर आहे ... ... कधी सूर गवसलाच नाही अशांना
आयुष्य हा वैताग आहे ... ... परिस्थितीचा इलाज नसणा-यांना
आयुष्य निव्व्ळ दैनंदीन आहे ... ... घड्याळाच्या मागे धावणा-यांना
आयुष्य हा प्रवास आहे ... ... अनुभव घेत-घेत पुढे जाणा-या वाटसरूला
आयुष्य ही सक्ती आहे ... ... नाईलाज म्हणून जगणा-यांना
आयुष्य ही देव-भक्ती आहे ... ... परमेश्वराशिवाय दुसरे काहीच नसणा-यांना
आयुष्य ही अभिव्यक्ती आहे ... ... प्रतिभासंपन्न व्यक्तीमत्वाला
आयुष्य हा चैतन्याविष्कार आहे ... ... समाधीवस्थेत रहाणा-यांना

- किरण म. चितळे, पुणे

गुलमोहर: 
शब्दखुणा: