तो एक सरकारी नोकर....

Submitted by सुनिल जोग on 4 September, 2010 - 01:45

सरकारी नोकर ... लक्षण समास
चिंधीचोर, कामचोर,
भांडखोर, चिडखोर !!
मत्सरग्रस्त
महागाई त्रस्त
वरीष्ठ्ग्रस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //१//
उगाचच व्यस्त
आठ्या ग्रस्त
अ‍ॅसिडीने त्रस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //२//
राजकारण व्यस्त
ऑडीटर त्रस्त
चकाट्यात व्यस्त
कटींग चहा मस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //३//
चहाड्खोर,
चमचाचोर,
फ्री गीफ्ट खोर
डिस्कॉऊंट्,सेल ग्रस्त
दिवाळी पोस्त
चिरीमिरी ग्रस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //४//
बढाईखोर,
आढयताखोर
सवलतीचोर्,फुकट्खोर
हरामखोर

तो एक चाकर सरकारी नोकर //५//
संप्,मोर्चावरी जोर
टीकाखोर्,मलईचोर
छोटाचोर्,मोठाचोर
महाचोर
तो एक चाकर सरकारी नोकर //६//
खाणे फुकट्,पिणे फुकट
निद्रा फुकट्,सद्रा फुकट
जीवन फुकट्,मरणही फुकट
सर्वच फुकट्खोर
तो एक चाकर सरकारी नोकर //७//
घरी..
अर्धी भाकर
ढेकर देई हातभर
दारी..
चिकन हांडी
आणि लिकर
यावर सर्व जोर
तो एक चाकर सरकारी नोकर //८//
बदलीने त्रस्त
इंक्रीमेंट्मधे व्यस्त
TA/DA वर भिस्त
कन्व्हेअंसला शिस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //९//
४था आयोग्,५वा आयोग,
६वा आयोग
आयोगावर आयोग
सर्व प्रयोग फस्त
तरीही जीवन स्वस्त
तो एक चाकर सरकारी नोकर //१०//

गुलमोहर: 

चालायचच हो सुनीलदा, ती सुध्दा माणस आहेत. पुर्वी पगार कमी म्हणुन आता मंत्र्यांनी दिलेली टारगेट्स पुर्ण करण्याकरता खातात.

सर्वजण असे नसतात. Sad

तुम्हाला काहीतरी अनुभव आला म्हणून तुम्ही हे एकांगी लिखाण केलय. 'चोर' वगैरे शब्द वापरले आहेत.

तुम्हाला काय म्हणायचय खाजगी क्षेत्रातले लोक सदगुणांचे पुतळे असतात? ते इन्र्किंमेंटसाठी भांडत नाहीत? ते लाच घेत नाहीत? ते महागाईग्रस्त नसतात? ते कंपनीच्या पैशावर पार्ट्या, कॉन्फरंसेस मध्ये जाऊन लिकर आणि चिकनवर ताव मारत नाहीत?