म्हणते मी....

Submitted by सानी on 2 September, 2010 - 08:23

सगळे चांगले चालू असतांना
हे काय झाले म्हणते मी
विनाकारण तुझ्याच बाबतीत
असे का घडावे म्हणते मी

विद्या विनयेन शोभते
शाळेत शिकले होते मी
विनय सोडण्याचे कारण
काय घडले म्हणते मी

तुझी प्रतिभा, तुझी शैली
यावर फिदा इतके सारे
तरी नको तिथे डोकावायला
जायचे कशाला म्हणते मी

खरा तो एकची धर्म
जगाला प्रेम अर्पावे
ठाऊक असूनही द्वेष अर्पायला
जायचे कशाला म्हणते मी

त्रास होतोय बघून सारी
जुगलबंदी चाललेली
कंपूशाही माबोवर ही
हवी कशाला म्हणते मी

इतका संवेदनशील आहेस तू
फिकीर नको ती सोडून दे
पुढच्या कथेची वाट पाहतेय
लिहिणार कधी म्हणते मी

गुलमोहर: 

अन्यत्र पुन्हा पुन्हा पहावयास मिळालेला एक प्रतिसाद आठवला; 'झणझणीत अंजन.'
पण घट्ट मिटून घेतलेल्या डोळ्यात जाईल का?

लहान तोंडी मोठा घास
शोभत नाही मुळी मला
तुला काही शिकवायला
लिहिलं नाही बरं मी

उद्विग्न झालं मन जरा
म्हणून मोकळं केलं इथे
चांगला अर्थच काढ यातून
बाकी विसर म्हणते मी

"लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते''.

सुरेश भट साहेबांची ही वाक्ये आठवली...

सानीजी,आपण खूप निर्मळ मनाच्या आहात आणि त्यामुळे अत्यंत निर्मळता या कवितेत व्यक्त झाली आहे....

लिहित रहा ''बेफिकिर''पणे.

सानी खुप सुंदर कवीता केलीस..
किति सहजतेने तु सत्य परीस्थीति मांडलीस..
मनापासुन आवडली.. Happy

khup sundar

सानीजी,
छान प्रेमळ कानउघडणी कम चपराक !
Happy
आपण खूप निर्मळ मनाच्या आहात आणि त्यामुळे अत्यंत निर्मळता या कवितेत व्यक्त झाली आहे ..
अनुमोदन !
Happy

छान!

*क्रोध* गुलमोहर वर कायम स्वरूपी आरत्यांचा वेगळा विभाग करायला अ‍ॅडमिन ला सुचवायलाच हवे *भयानक क्रोध*
... small minds discuss people.... हे वाक्य कुठल्यातरी दर्शनी भिंतीवर लटकवलेले स्मरते... पण कुठल्या ?

मस्त...नेमक्या शब्दांत मांडलंय. डॉ.कैलास ह्यांचा प्रतिसादच सगळं सांगून जातोय.

प्रकाश, राजेश्वर, नितीन्, मुक्तेश्वर, शशांक, अनिल, रुणुझुणू...मैत्रीपूर्ण प्रतिसादाबद्दल खुप खुप आभारी आहे... Happy

"लिहिणारा माणूस कवितेत लपत नसतो. तो आपल्या कवितेत लपूच शकत नाही. कविता आरशाचे काम करते. ती स्वच्छ व निकोप चेहरे दाखवते आणि लबाड व घाणेरडे चेहरेही दाखवते. केवळ नक्षीदार शब्दांमुळे कवितेत यश मिळत नसते. सुबक, गोंडस व नक्षीदार शब्दांमुळे कविता सुंदर होत नसते आणि शब्दांचा थयथयाट घातला म्हणून कविता शक्तिशाली बनत नसते''.

सानी,
डॉ.कैलास यांची वरील प्रतिक्रिया मला आठवली...
त्यांना अनुमोदन !
Happy
अगदी माझ्या मनातली वाक्यं त्यांनी टायपलीत (कि चोरलीत !) Lol

इतका संवेदनशील आहेस तू
फिकीर नको ती सोडून दे
पुढच्या कथेची वाट पाहतेय
लिहिणार कधी म्हणते मी
.....छान ग सानी......खर सान्गु का.......ते डॉं. नाही का लहान मुलाना कडु औषध देतात पन साखरेचा लेप देउन तशी तुझी कवीता बर का......खुप आवडली.....थोड्क्यात पण खुप काही सान्गुन गेली.........
मस्त आहे..........अप्रतिम.......

सावरी