चला गड्यांनो, शेतीबद्दल बोलू काही!

Submitted by नरेंद्र गोळे on 31 August, 2010 - 05:21

घरातला कर्ता पुरूष जर अपयशी ठरला, त्याची नोकरी गेली, तो हताश झाला, त्याचा आत्मविश्वास ढळला तर सार्‍या घरासच अवकळा प्राप्त होते. इतर सदस्य मग आपापल्या परीने अर्थार्जन करून समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही घराला मुळातली संपन्नता काही पुन्हा प्राप्त होऊ शकत नाही.

आपल्या भारताचे तसेच झाले असावे असा मला संशय येतो आहे. भारतात ७०% व्यवसाय शेतीचा समजला जातो. म्हणून भारतातला कर्ता व्यवसाय, शेतीच म्हणायला हवा. मग भारत जर दारिद्र्यरेषेवरच घुटमळत असेल तर, तो दोषही कर्त्यालाच चिकटायला हवा ना!

सर्व जगात थेट कर-आकारणी तिथल्या प्रमुख व्यवसायांवर केली जाते. मॉरिशससारख्या देशात तो पर्यटनव्यवसाय असतो, जपानसारख्या देशात उद्योगधंदे असतात, मग भारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते. कर्त्या पुरूषाच्या आमदनीवर घर चालावे अशी अपेक्षा काय अवाजवी आहे? मग इतर छोट्यामोठ्या व्यवसायांना वेठीस धरून त्यांच्या जीवावर राज्य चालवणे ह्यात कर्त्याचा पुरूषार्थ तो काय राहिला?

एक जमाना होता जेव्हा भारतातील शेतकरी ताठ कण्याने जगत असे. आपला मुलगा आपल्याच व्यवसायात रहावा तरच तो संपन्न होऊ शकेल अशी त्याची खात्री असे. मुंबईला जाऊन शिकू पाहणार्‍या मुलासही बाप विचारत असे, "ही काय तुला अवदसा आठवली? इथेच शेती कर. जमीन भरभरून संपत्ती देते आहे. त्या काळ्या आईची सेवा कर. ती तुला काहीही कमी पडू देणार नाही." पण असे म्हणणारा बापच आज दिसेनासा झाला आहे. कुठे शोधायचे त्याला?

आजचा शेतकरी असलेला बाप म्हणतो, "शेतीत काही राम राहिला नाही. पावसाच्या कृपेवर अवलंबून असणारी शेती दिवसेंदिवस बे-भरवशाची ठरू लागली आहे. इथे राहिलात तर पोटापाण्याचे वांधे होतील. तेव्हा शिकूनसवरून उद्योगाला लागा. नोकरीधंदे करा, पण शेती करू नका. का? तर ती फायदेशीर राहिलेली नाही!" खरच का हो शेती फायदेशीर राहिलेली नाही?

विदर्भात शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. सिंधुताई सपकाळ म्हणतात, "शेतकरी आत्महत्या करतो. पण शेतकर्‍याची बायको आत्महत्या करत नाही. ती, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याची चिल्लीपिल्ली हर प्रयत्नांनी वाढवते. त्यांचा सांभाळ करते. म्हातार्‍या आईवडलांना आधार देते आणि त्याच शेतीला पुन्हा नांदती करून, आयुष्य सुखरूप करते." असे जर असेल तर मग तो शेतकरीच ते का साध्य करू शकत नाही हो? तोच कुठे तरी अपुरा पडतो आहे की काय?

मला वाटायचे की घरपट्टीत वाढ होते, पाणीपट्टीत वाढ होते तशी शेतसार्‍यातही नियमित वाढ होत असणार. पण तशी स्थिती नाही. वीसवीस वर्षे तोच शेतसारा भरणारे शेतकरी, शेतीचे उत्पन्न मात्र कायमच चढत्या दरांनी विकून आमदनी वाढवत आहेत. म्हणजे खर्च कमी होत आहे, उत्पन्न वाढतच आहे. तरीही शेती परवडत नाही असे बव्हंशी शेतकरी का बरे म्हणत असतात?

विहीरी, बी-बियाणे, अवजारे, पंप यांकरता घेतलेली कर्जे सदा-अन-कदा माफ केली जातात. शेतीच्या पंपांना वीज कमी दराने दिली जाते व कित्येकदा तिची बिलेही माफ केली जातात. खते, बी-बियाणे, अवजारे यांकरता सरकारे कायमच अनुदाने (सबसिडी) देतांना दिसतात. दर पावसाळ्यापश्चात आपापल्या भागांना अवर्षण ग्रस्त जाहीर करवून घेऊन, सरकारी अनुदाने मिळवण्याची त्यांच्यात होड लागते. अनेकांना तीही हरसाल मिळतांना दिसते आहे. तरीही शेती अनुत्पादक कशी बरे ठरत आहे?

एकदा मी असाही विचार केला की, समजा शेतकरीच ना-करता ठरत आहे म्हणा, किंवा चांगले हुशार लोक या व्यवसायातच येत नाही आहेत म्हणा, म्हणून पुरेशा प्रयासां-अभावी शेती अनुत्पादक ठरत असावी. मग इतर व्यवसायात जाणार्‍या हुशार लोकांना, ती तर पर्वणीच वाटली पाहिजे. म्हणजे शेतीस उत्पादक बनवा आणि संपन्न व्हा. साधेसोपे खुले आव्हान. पण नाही. अशी कुणालाही शेती खरीदता येत नाही हो, भारतात. तुम्ही शेतकरी असलात तरच शेती खरेदी करू शकता, असे मला कळले (म्हणजे आमची संधी गेलीच म्हणायची! कारण आम्ही वंशपरंपरागत भूमीहीन!! – आठवा, "उंबरठ्यास कैसे शिवू, आम्ही जातीहीन"). म्हणजे होतकरू व्यावसायिकांना शेती करण्यास मज्जाव आणि परंपरागत शेतकर्‍याची ढासळती उमेद, अशा दुष्टचक्रात शेतीचा व्यवसाय अडकलेला दिसत आहे!

शेतमालाचे भाव, मागणी आणि पुरवठ्यावर अवलंबून राहतात. उत्पादनखर्चावर किंवा शेतकर्‍याच्या गरजांवर नाही. त्यामुळे वस्तूंच्या कृत्रिमरीत्या निर्माण केल्या गेलेल्या सुकाळ-दुष्काळाने, सृजनशील शेतकर्‍यांनी कष्टाने निर्माण केलेल्या शेतमालास, कवडीमोल किंमतीत फुकून टाकण्याची वेळ, वायदे-बाजारात दलाली करणारे सृजनाशी संबंध नसणारे दलाल, पैशाच्या ताकतीवर आणतांना दिसतात. केंद्रीभूत अर्थव्यवस्थेचा हा अनिवार्य दुष्परिणाम आहे.

शेतकर्‍यांनी केंद्रीभूत अर्थव्यवस्थेपेक्षा विभक्तघटकाधारित अर्थव्यवस्था स्वतःहून निर्माण करण्याची गरज आहे. पाणी, वीज, बी-बियाणे, खते यांकरता आपल्या जमीनीबाहेरच्या कुठल्याही मदतीची अपेक्षा न करता स्वतःच्याच जमीनीवर केलेल्या पर्जन्यशेती, सौरवीजशेती, पशुपालन आणि पारंपारिक शेती यांच्या आधारे स्वयंपूर्णता प्राप्त करून घेणे शक्य आहे का? असे शक्य असेल तर चार जणांच्या एका कुटुंबास स्वयंपूर्णता साधण्याकरता जमीनीचा केवढा तुकडा जरूर ठरेल?

इथे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे की भारताची लोकसंख्या जवळपास १०० कोटी आहे तर भारताचे क्षेत्रफळ ८७ कोटी एकर आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत एका माणसास अर्ध्या एकरापेक्षा जास्त जमीन याकरता मिळण्यासारखी नाही!

खालील पत्त्यावरील माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे!
http://swayambhuu.blogspot.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला, म्हणजे शेती बळीराजा याबाबतची कळकळ अखेर स्वतःपुरते एक घर बांधणे इथेच येऊन संपली म्हणायची... सर्वाना शुभेच्छा... आता एन ए जमीन कशी करावी, कोणता बिल्डर गाठावा याबाबतही पोस्ट येतील ही अपेक्षा..

नाही नाही जामोप्या सर्वांनी एकत्र राहून कम्यून व शेती करायची असे आहे. इकॉलॉजिकली फ्रेंड्ली जीवन.स्वतःचा संसार कमिट्मेंट्स सावरल्यावर कम्युनिटीसाठी निसर्गासाठी काहीतरी करावे असे मनात आहे.

ऑरोविल खरेच इंप्रेसिव आहे. त्यातील बरेच लोक माझे कस्ट्मर आहेत. व अतिशय मृदू स्वभावाचे खरेच असतात.

मुटे साहेबांसाठी खास : भारत सरकारच्या शेती मंत्रालयाने शेतकर्‍यांसाठी खास फोन सुविधा सुरु केली आहे. एक १-८०० नंबर आहे व फोन वरून शेतकी सल्ला देण्यात येणार आहे. नंबर लिहून घेइपरेन्त तो गायबला.काही उपयोग आहे का त्याचा?

आंध्रात तरी बरीच शेती पाण्याखाली गेली आहे. कापूस, शेंगदाणे वगैरे. आताओला दुष्काळ का?

अमा, तुम्ही म्हणताः
It is a lifestyle choice really.>>>>
सत्यवचन!

हा सर्व विषय प्रत्यक्षात, एका ’चिरंजीवी’ जीवनशैलीची जाणीवपूर्वक निवड करण्याशी संबंधित आहे. जीवनास आवश्यक त्या सगळ्या किमान संसाधनांचा पुरेपूर वापर करा, पुनर्नविनीक्षम संसाधने निर्माण/विकसित करा, एकल मानवी कुटुंबजीवन छोट्याशा जमीनीच्या तुकड्यावर धारणा करू शकेल अशा ’चिरंजीवी’ जीवनशैलीचा जाणीवपूर्वक स्वीकार करा, आणि स्वतःच्या कुटुंबजीवनास गरजेच्या वस्तू शक्यतोवर स्वतःच घडवलेल्या असाव्यात याची काळजी घ्या, असे केल्यास आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करूनही, एकल कुटुंबजीवन स्वयंपूर्ण-स्वावलंबी राहू शकेल.

केंद्रिभूत सुविधा मोजक्या आणि विकेंद्रित आम एकल कुटुंबजीवन, अशाप्रकारच्या नव्या समाजजीवनाची संकल्पना रुजवण्याची आज गरज आहे.

गणेश बेहेरे, sustainable = चिरंजीवी. शाश्वत = secured, कायमस्वरूपी, अढळ (धृवपद).

श्रद्धा, तुम्ही म्हणताः
तुम्ही 'नवदर्शनम'बद्दल ऐकले आहे का? तुम्ही आणि अश्विनीमामींनी ज्या कल्पना मांडल्या आहेत जवळपास त्याच धर्तीवर यांचे काम चालते. कृपया येथे पहा. यांच्याकडून माहिती मिळवणेही उपयोगी ठरू शकेल.>>>>> नक्कीच.

मात्र नव्या ’चिरंजीवी’ जीवनशैलीचा स्वीकार करत असतांनाच नव्या ’चिरंजीवी’ आहारशैलीचाही स्वीकार करायला हवा आहे. उदाहरणार्थ अशी शैली म्हणते की "जे जे नाशिवंत, सजीव, ताजे आहे; ते ते शक्यतोवर कच्चे, नाश होण्यास सुरूवात होण्यापूर्वीचे, मात्र ’टिकवून’ न ठेवलेले खाद्य उत्तम". ‘Nd’ मधील लोणची, मुरंबे अशाप्रकारच्या अन्नपदार्थ टिकवून खाण्याच्या पद्धती, ’चिरंजीवी’ आहारशैलीशी सुसंगत नाहीत. ‘Nd’ चे धुरीण ज्या काळात त्यांची कार्यकारी जीवने जगले, त्या काळच्या सर्वोत्तम जीवनशैलीगत परिवर्तनांचा त्यांनी पुरस्कार/अवलंब केला असावा असे त्यांच्या संकेतस्थळावरून वाटते आहे. मला आणखी खोलात जाऊन ते वाचावे लागेल. ही फक्त प्राथमिक प्रतिक्रियाच आहे.

आर्क,
गौरी देशपांडे यांच्या विंचुर्णीच्या प्रयोगाबद्दल मला मुळीच काहीही माहिती नाही.
अरोव्हिलाला मात्र २५ वर्षांपूर्वी मी अनेकदा गेलेलो आहे. तिथल्या समूहजीवनाने मीही प्रभावित झालेलो आहे. मात्र, ते एकल कुटुंबजीवन नाही. समूहजीवन आहे. तेही समर्पित लोकांपुरतेच. त्यामुळे ते सर्वजन-धारणायोग्य समजता येत नाही.

चंपक,
केवळ काही लोकांना असे करणे शक्य झाले तरी तो प्रयोग 'सर्वोत्तम' आहे आहे असे मानले जाउ शकत नाही.>>>
अगदी खरे आहे. केंद्रिभूत सुविधा मोजक्या आणि विकेंद्रित आम एकल कुटुंबजीवन, अशाप्रकारच्या नव्या समाजजीवनाची संकल्पना रुजवण्याची आज गरज आहे. हेच मी पुन्हा एकदा म्हणेन.

जामोप्या,
शेती, बळीराजा याबाबतची कळकळ अखेर स्वतःपुरते एक घर बांधणे इथेच येऊन संपली>>>
असा निष्कर्ष तुम्ही काढावा हे दुर्दैव आहे. बळीराजा हा कायम राजाच असायला हवा. त्याचेकडे कायमच शेकडो एकर शेती असायला हवी. नाहीतर तो आत्महत्या करेल. असे असेल तर तो आत्महत्येसच लायक आहे असे नाइलाजाने म्हणावे लागेल. नव्या विभक्तकुटुंब पद्धतीस अनुकूल छोट्या शेतीचा संबंध आपोआपच घराशी येऊन थांबतो. शिवाय प्रत्येक माणसास जमीन कसणे अनिवार्य करायचे असेल तर जमीनीचे लहान लहान तुकडेच असायाला हवेत. मग ते एन ए असोत की ए. मात्र शेतजमीन म्हटली की ज्या चौकटीत चर्चा अडकते त्यातून बाहेर पडण्याचा एक मार्ग म्हणून मी एन ए बद्दल बोललो. मला स्वतःपुरता प्लॉट घ्यायचा असता तर तसा बाफ उघडणेही मला शक्य होतेच की. पण मी तसे केलेले नाही. इथली सर्व चर्चाही काळजीपूर्वक वाचलीत तरीही असे लक्षात येईल की ही चर्चा एका नव्या स्वरूपाच्या शेतीविषयक आहे. पारंपारिक शेतीचे स्वरूप आपण जाणीवपूर्वक स्वतःस धार्जिणे करून घेतले नाही तर ते आपाततः निराळ्याच अस्वीकारार्ह स्वरूपात बदलणे असंभवनीय नाही.

अमा,
आंध्रात तरी बरीच शेती पाण्याखाली गेली आहे. कापूस, शेंगदाणे वगैरे. आताओला दुष्काळ का?>>>
अशा नैसर्गिक आपत्ती येऊनही एकल मानवी कुटुंबजीवन विस्कळीत होणार नाही याची शाश्वती निर्माण करणे हेच आपले (सरकारचे) उद्दिष्ट असायला हवे. मात्र, स्वातंत्र्य मिळून साठ वर्षांवर वर्षे होऊनही, इतकेही साधता आलेले नाही. जिथे हरसाल पूर येतात तिथे त्यांच्या अनिष्टांपासून मानवी जीवन सुरक्षित राखण्याच्या योजनाही कार्यान्वित करता आलेल्या नाहीत. सोनिया गांधी आजही अन्न-शाश्वती-food-security, ऊर्जा-शाश्वती-energy-security इत्यादींवर भाषणे देत आहेत.

शेती बळीराजा याबाबतची कळकळ अखेर स्वतःपुरते एक घर बांधणे इथेच येऊन संपली म्हणायची... >.
कळकळ तळमळ..मळमळ ही काही विशिष्ठ भावनाप्रधान लोकाम्ची मक्तेदारी आहे.
इथे काही लोक ज्यांना खरेच शेतात जाउन रहायचे आहे,ecofriendly आयुष्य जगायचे आहे, ते कुठल्याही भावना/वेदना/संवेदना मधे न आणता,प्रॅक्टिकली शक्य आहे का ,आहे तर कसे याची चाचपणी करत आहेत.ज्यांनी असे प्रयोग पाहिले आहेत तेसुध्दा कुठल्याही भावनांचे कढ ,दुखा:चे उमाळे न काढता आपले inputs देत आहेत.आणि बाफ सुरु करणार्‍या व्यक्तीला हेच अपेक्षित असावे.

अरोव्हिलाला मात्र २५ वर्षांपूर्वी मी अनेकदा गेलेलो आहे. तिथल्या समूहजीवनाने मीही प्रभावित झालेलो आहे. मात्र, ते एकल कुटुंबजीवन नाही. समूहजीवन आहे. तेही समर्पित लोकांपुरतेच. त्यामुळे ते सर्वजन-धारणायोग्य समजता येत नाही.
>.things must have changed after 25 years.मी गेल्या वर्षी भेट दिली होती.मला तरी बरेच सगळ्यांसाठी शक्य वाटले जगणे.फक्त त्यामागचा विचार समजणे फार गरजेचे आहे. किमान ८००-१००० समविचारी लोक ज्यांना खरेच असे आयुष्य हवे आहे, नक्कीच ऑरोव्हीलला इतर ठिकाणी replicate करु शकतात.
मला तिथे काही कुटुंबेही भेटली.जी स्वतःच्या हाताने बांधलेल्या पक्क्या बैठ्या,दुमजली घरात राहत होती. मी तर प्रेमात पडले त्या घरांच्या, नजरेत भरावे असे crafting .त्यांची छोटी गोड लहान मुले पण होती.लहानांची शाळा अर्थात conventional नाही.
काही student hostels होती.सुर्यप्रकाश,वारा ह्याच जास्तीत जास्त वापर व्हावा असे बांधकाम,waterless toilets.

ऑस्ट्रेलिया सिनेमातील हिरॉइन ज्या चिकाटीने जगते व अड्चणींतून मार्ग काढते ते पाहिल्यास आपणही ते करू शकतो यावर माझा विश्वास आहे. तिच्या मानाने आपल्या हातात खूप साधने व संसाधने आहेत. सिस्टिम्स डेवलप झाल्या आहेत. एक आर्किटेक्ट विनू काळे यांनी अभिनव पद्धतीच्या बांबूच्या झोपड्या व मचाणावरील घरे बांधली आहेत. पूर्वी मी अश्या एका घराला भेट दिली होती( विशीत असताना) त्या बद्दल माहिती घ्यावी.

गौरी देशपांडे माझ्यासाठी सायकॉलॉजिकली आईच्या जागी आहेत. विचारांना दिशा देणारी, जगायची हिंमत देते ती खरी आई. त्यामुळे विंचुर्णी प्रकल्प हे तर आद्य पण त्याहून जरा जास्त पॉझिटिव प्रकल्प करावा विथ
२१स्ट सेंच्युरी सेन्सिबिलिटी.

‘Nd’ मधील लोणची, मुरंबे अशाप्रकारच्या अन्नपदार्थ टिकवून खाण्याच्या पद्धती, ’चिरंजीवी’ आहारशैलीशी सुसंगत नाहीत <<<<<<
मुळात बिकट परिस्थितीला तोंड द्यायला प्राणी (यात मनुष्यही आला) अन्न टिकवून / साठवून ठेवतात. राजस्थानात गेले असताना तिथे वाळवलेल्या भाज्यांची दुकाने दिसली. ताज्या भाज्या कायम मिळत राहणे तिथे शक्य नाही म्हणून अशा गोष्टी केल्या जातात. (भाज्या खायच्याच नाहीत, ही कल्पना तितकीशी योग्य नाही.) तसंच, एखादेवेळी नैसर्गिक आपत्ती आल्या, ताजे अन्न मिळणे दुरापास्त झाले तर लोकांनी काय करायचे?

त्यामुळे चिरंजीवी आहारपद्धतीचे
जे जे नाशिवंत, सजीव, ताजे आहे; ते ते शक्यतोवर कच्चे, नाश होण्यास सुरूवात होण्यापूर्वीचे, मात्र ’टिकवून’ न ठेवलेले खाद्य उत्तम
हे जे तुम्ही सूत्र लिहिले आहे ते मला अतिरेकी, टोकाचे वाटते. परिस्थितीनुरूप बदलता येण्याजोग्या लवचिक गोष्टी हव्यात. कुठलीही नवी व्यवस्था राबवताना ती जितकी सर्वसमावेशक, लवचिक असेल तितकी ती लवकर रुजू शकते.

त्यामुळे नवदर्शनम् निर्माण करत असलेली उत्पादने मला योग्यच वाटतात.

तसेच ती संस्था ही लोणची व इतर ऑरगॅनिक उत्पादने यांची शक्य होईल तितकी विक्रीही करते. यातून त्यांना थोडाफार पैसाही (जो गरजेचा आहेच!) मिळत असावा आणि लोकांना अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या, रासायनिक खते न वापरता पिकवलेल्या गोष्टी व त्यापासून निर्मित पदार्थ.

ऑस्ट्रेलिया सिनेमातील हिरॉइन ज्या चिकाटीने जगते व अड्चणींतून मार्ग काढते ते पाहिल्यास आपणही ते करू शकतो यावर माझा विश्वास आहे
अश्विनीमामी,
ही वरील हिरोईन नक्की कोण आहे का कुठल्या सिनेमात दाखवल आहे ? मला पण बघता येईल म्हणुन
संदर्भ द्या ...

अश्विनीमामी, नरेंद्रजी आणि मंडळी !
हाही एक शेतीबद्दल (सार्वत्रीक म्हणता येईल असा) प्रश्न आहे, यावर सल्ला द्याल अशी अपेक्षा !

आमची सांगलीजवळ घरची एकुण ८ एकर (मला ४ एकर) शेती आहे, मला तर अगदी कॉलेजला असल्यापासुन नेहमी मनापासुन आपण फक्त शेती आणि शेतीच (सेंद्रीय शेती ,तसेच औषधी वनस्पती) तिही थोडी वेगळी करायची अस वाटतं होत, अजुनही तस वाटतं ..
पण तरीसुध्हा गेल्या ८-९ वर्षापासुन मनाविरुद्ध नाईलाजानं नोकरी करतोय, (पण या काळात अभ्यास/वाचन शेतीचा जास्त झालाय) अर्थातच गेल्या दहा वर्षात माझी नोकरीतली प्रगती काहीच नाही (त्यामुळे त्यात रस नाही हे सिद्ध तर झालय) पण घरच्यांना नोकरी करतोय म्हणुन बरं वाटतयं.
नोकरी सोडुन शेती करु पाहणार्‍याला घरात, गावाकडे सर्वजण वेड्यातच काढणारेच भेटले, पण तरीही शेती फायद्यात करता येते,नोकरीपेक्षा ती खरच परवडते, शेती करुनही मानान,सुखानं जगता येतं यावर त्यांचा विश्वास नाही किंवा तो कधीच उडालाय, त्यांना हे पटतही नाही, पण मला हे (इतरांनी केल्याप्रमाणे) सिद्ध तर करायच आहे, तसं स्वप्न/जिद्द/इच्छा/आवड आहे, पण परवानगी नाही, निर्णय तर घ्यायचा आहे, सुरुवात कशी करायची हे बघतोय ...
Happy

मुटे साहेबांसाठी खास : भारत सरकारच्या शेती मंत्रालयाने शेतकर्‍यांसाठी खास फोन सुविधा सुरु केली आहे. एक १-८०० नंबर आहे व फोन वरून शेतकी सल्ला देण्यात येणार आहे.

अश्विनीमामी,
ही बरीच जुनी गोष्ट आहे. नविन काहीच नाही.
अशा फोनवर एक छापील कागद घेऊन कुणितरी बसला असतो.
प्रश्न कोणताही विचारा. तो तेवढाच छापील कागद वाचून दाखवत असतो. Lol

अशा फोनवर एक छापील कागद घेऊन कुणितरी बसला असतो.
प्रश्न कोणताही विचारा. तो तेवढाच छापील कागद वाचून दाखवत असतो

Lol
मुटेजी,
ते तर स्वाभाविकच आहे, याचा फायदा किती झाला हे पाहायला या सरकारकडे वेळ तरी कुठे आहे ?

चिंतामणजी, तुमचा लेख मायबोलीसाठी युनिकोड फॉण्ट मध्ये बदलून घेतला आहे. धन्यवाद!

४ हजाराच्या दराला भुलू नका, भुलवूही नका
चिंतामण पाटील
जळगाव, दि १२ वाढत्या महागाइर्स ाठी झगडा सरुु असताना महागाइर्च ा पहिला फटका शते कऱ्याला बसता े ह्याची जाण फारशी
कोणाला नाही त्यामुळे शेती मालाचे दर वाढले म्हणजे शेतकऱ्याचे चांगले दिवस आले अशी आवई उठवली जाते आता
कापसाला खरेदीच्या सुरुवातीला व्यापारी ४ हजाराचा दर देत असल्याने शेतकरी तसा समाधानी दिसतो परंतु हा दर विचारात घेता
कापसाच्या एकेका बोंडामागे शेतकऱ्याला किती कष्ट उपसावे लागतात आणि किती खर्च करावा लागतो त्याचाही विचार करणे
गरजेचे आहे
फक्त चारच महिन्यात घरात पैसा येतो म्हणूनच शेतकरी या पिकाकडे वळत असले तरी हे पिक शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत
लोटत असल्याचे चित्र दिसू लागले आहे कसे घेतले जाते हे पिक आणि किती वेळा त्यासाठी खपावे लागते ते येथे पाहाणे गरजेचे
आहे इतर कोणत्याही पिकापेक्षा बागायती कापसासाठी फार खपावे लागते लावणीपूर्वी शेताची नांगरणी केली जाते काही
शेतकरी ट्रॅŠटरच्या सहाय्याने ट्रिलर करुनही शेत तयार करतात नंतर वखरणी करुन ट्रॅŠटरच्या अगर बैलजोडीच्या सहाय्याने सऱ्या
पाडल्या जातात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना या सऱ्यांची ओलवणी केली जाते त्या नंतर लगेच दुसऱ्या दिवशी अगर
वाफसा आल्यावर मजूर लावून लावणी केली जाते नंतर आठवड्याभरानंतर रासायनिक खताचा पहिला डोस दिला जातो १५
मेच्या सुमारास लावणी केलेली असल्यास १५ जूनच्या आसपास सऱ्या मोडण्यासाठी वखरणी केली जाते लगेच पाऊस येईल हि
अपेक्षा पाऊस न आल्यास पुन्हा उगवलेल्या कापसाच्या झाडालगत सऱ्या ओढून पुन्हा पाणी द्यावे लागते सऱ्यांमध्ये तण झाले
असल्यास ते याच कालावधीत मजूर लावून काढावे लागते
एव्हाना पावसाळा सुरु होत असतो महिनादीड महिन्याचे पीक झाल्यावर रासायनिक खताचा दुसरा हप्ता दिला जातो त्यासाठी
मजूर लावले जातात बियाण्यावर प्रक्रिया केलेली असल्याने दीड महिन्याचे पीक होईस्तोवर कापसावर कोणताही रोग येत नाही दीड
महिन्यानंतर मात्र तुडतुडे, मावा या सारख्या रसशोषक किडीचा उपद्रव सुरु होतो त्यासाठी दोनदोन, तीनतीन औषधे एकत्र करुन
फवारणी सुरु होते ती आता येथून पुढे पीक साडे तीन ते चार महिन्याचे होई पर्यंत दर आठवड्याला अगर पंधरा दिवसाला सुरु राहते
दरम्यानच्या काळात कधी पाऊस लांबणीवर पडला तर पीक धोŠयात सापडते तर कधी अतिवृष्टीनेही कोमेजून जाण्याचे संकट
कोसळते फुले पात्या लागण्याच्या सुमारास पाऊस सुरु राहिला तर ओल्याव्यामुळे बुरशीजन्य रोगांचे आक्रमण होऊन पीक हातचे
जाऊ पाहते यातूनही पीक सहीसलामत सुटलेच आणि सप्टेबरच्या दुसऱ्याही आठवड्यात पाऊस येऊ लागला तर फुटण्याच्या
अवस्थेत असलेल्या पक्व कैऱ्या कुजू लागतात याच कालखंडात व्यापारी कापसाची खरेदी सुरु करतात त्यावेळी कापसाचा दर
फारच चांगला वाटतो परंतु हा दर कापूस विकणाऱ्या उत्पादक शेतकऱ्या कसा वाटतो ते त्यालाच माहिती ज्यावेळेस त्याच्या हाता
हा पैसा पडतो त्यावेळी तो लावणीपूर्व व लावणी पासून कापसासाठी आलेल्या खर्चाचा हिशेब करीत नाही करील तर त्याच दिवशी
कापूस न घेण्याचा निर्णय घेऊन टाकेल कारण भरपूर राबविणारं, मजूरी लागणारं, खतं खाणारं आणि किटनाशकाची फवारणी करावं
लागणारं हे पीक आहे त्यामुळे यंदा ४ हजाराचा दर मिळाला म्हणून शेतकरी हुरळून गेले आहेत असे कोणी समजत असेल तर ते
स्वप्नांच्या दुनियेत वावरत आहेत असे समजावे
कापासाचे दर मागच्यावर्षीही ३५००च्या आसपास होते त्यात यंदा ५०० रुपयांचीच फक्त वाढ झाली आहे मात्र कापूस पिक
घेण्यासाठी जो खर्च लागतो त्यात गेल्यावर्षाच्या तुलनेत दुप्पट खर्च झाला आहे खतांचा विचार केल्यास युरियासाठी रांगेत उभे
राहूनही गेल्यावर्षी २५० ला घेतलेला युरीया यंदा ३७० ते ४०० रुपयाला एक गोणी खरेदी खरावी लागली मजुरीचा विचार केला
तर लावणी, निंदणीसाठी येणाऱ्या महिला मजुराला गेल्यावर्षी ४० ते ५० रू द्यावे लागत यंदा ७० ते १०० रुपये द्यावे लागले
आंतरमशागतीसाठी बैलोजोडीचे भाडे गेल्यावर्षी २५० रुपये होते ते यंदा ४०० ते ५०० झाले फवारणीसाठी येणाऱ्या मजुराला
गेल्यावर्षी ७० ते १०० रुपये मजुरी दिली जायची ती यंदा १२५ ते १५० वर जाऊन पोहोचली एकूण खर्चात दुप्पटीने वाढ झालेली
असल्याने कापसाचा दर ४ हजार फार आहे का? असा प्रश्न पडतोच शिवाय कापसाच्या घसरलेल्या उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय
मार्केटमध्ये भारताच्या कापसाला मोठी मागणी असली तरी सरकारचे निर्यात धोरण येथील कारखानदारांच्या हिताच्या बाजूने आणि
शेतकरी विरोधात असल्याने निर्यात बंदी आणून सरकार शेतकऱ्याची गळचेपी करतेच त्यामुळे हा भावही टिकण्याची शŠयता तशी
कमीच असे असल्याने कापसाला मिळणाऱ्या ४ हजाराच्या दराला शेतकरी भूलणार नाही हे नक्की

अनिल अवचटांच्या कार्यरत मधे अनिल देशपांड्यांच्या अशाच प्रयोगाबद्दल वाचलेलं आणि खूप कुतुहल निर्माण झालेलं..
मागच्या वर्षी (फेब्रुवारी २००९) अवचटांकडून अनिल देशपांड्यांचा नंबरही मिळालेला. देशपांड्याची अ‍ॅन्जिओप्लास्टी झाल्यानं, त्यांना त्या प्रकल्पावर काम करणं शक्य नाही आणि म्हणून ते तो प्रकल्प विकू इच्छितात असं ऐकलेलं.
कुणाला चौकशी करायची असेल तर करू शकता..

ऊस दरासाठी शेतकरी एकत्र येत आहेत,योद्य दरासाठी आंन्दोलन करत आहेत,पण कारखानदारांना हे अजिबात आवडलेले नाही, त्यासाठी आपले माननीय कृषीमंत्री यांना शेतकर्‍यांना दिलेला सल्ला बघा ..

http://72.78.249.107/esakal/20101102/5645843321061212609.htm
म्हणजे शेतकर्‍यांनी १२-१४ महिने काबाड कष्ट करुन पिकवलेला ऊस किंवा पिकाला योग्य ,बाजारभावाप्रमाणे दर मागण्याचा प्रयत्नदेखील करु नये .. ?

समजा शेतकरीच ना-करता ठरत आहे म्हणा, किंवा चांगले हुशार लोक या व्यवसायातच येत नाही आहेत म्हणा, म्हणून पुरेशा प्रयासां-अभावी शेती अनुत्पादक ठरत असावी.

>>>१०१% सहमत.......नव्या युगात...नव्या वातावरणात...नव्या तन्त्राची... विचाराची गरज आहे.

काही जुन्या आयुर्वेदिक वनस्पती,झाडे यांच्या शेतीबद्दल काही माहिती असेल तर शेअर करावं

तुम्ही शेतकरी असलात तरच शेती खरेदी करू शकता, असे मला कळले (म्हणजे आमची संधी गेलीच म्हणायची! कारण आम्ही वंशपरंपरागत भूमीहीन!! – आठवा, "उंबरठ्यास कैसे शिवू, आम्ही जातीहीन"). >>>>>>
भारतासारख्या शेतीप्रधान देशात थेट कर आकारणीत, शेती का बरे वगळली जाते >>>>

----------------------------------------------------------------------------

गोळे साहेब माझी १ एकर बागायत शेती, १ एकर हंगामी बागायत आणि १ एकर जिरायत शेती भाडेतत्वावर द्यायची आहे...

भाडे: ४००० रुपाये प्रती महीना (३ एकर जमीनीची किम्मत १५ लाख (विहीरीसह)).
विजपंपाचे बिल, घसारा, Maintenance, शेतीचा सारा खर्च भाडेकरुला द्यावा लागेल..
भाडेकरु BSc Agree, MSc Agree असल्यास प्राधान्य.
भाडेकरुला थेट व्यावसाय कर भरावा लागेल (तुमच्या म्हणण्याप्रमाणे).

आकर्षक ऑफरः
पहीले वर्ष १ रुपाया भाडे.
पहीले ३ वर्ष मोफत सल्ला.
भाडेकरु देणा-यास ४% कमीशन.

स्वीकारेल का कोणी अव्हान?
(आणखी काही लीहीत नाही...)

Pages