कवितेचे मानांकन

Submitted by भूत on 31 August, 2010 - 02:26

आजकाल माबो वर कवितांचा सुकाळ झाला आहे ....त्यातही नवकवी खास अघाडीवर आहेत ,

बर्‍याचदा असं होतं की उगाच एखाद्या भंकस कवितेवर भारंभार प्रतिसाद पडतात ...अन उगाचच टीआर्पी वाढतो फालतु कवितेचा Sad

हे कसे टाळता येईल ...यावर बरेच वादविवाद झाले ...अनुल्लेखाने मारणे....असंबध प्रतिसाद असे काही प्रयोगही आम्ही करुन पाहीले ...पण ...कवितांचा फ्लो जबरदस्त आहे .....

मग आता काय करता येईल असा विचार करता करता एक आयडीया आली .

आपण Happy
Rofl
Sad
Angry

असले प्रतिसाद देण्या पेक्षा जर कवीतेचे स्केलीन्ग केले तर ? Light 1

आयडीया सोप्पी आहे : कवितेचे खालील ५ पॉईन्ट वर मानांकन करायचे प्रत्येकाने अन प्रतिसाद म्हणुन एक नंबर द्यायचा .

१) विषयाची निवड/ हाताळणी/ अभिव्यक्ती =२०
२)तान्त्रिक बाबी : छंद/ वृत्त/ गेयता =२०
३) भाषेची समृध्दता : किती छान अलंकार वापरलेत वगैरे वगैरे ...=२०
४)समीक्षक दृष्टीकोन : = २०
५) रसिक दृष्टीकोन =२०

टोटल =१००

मी फार रफ स्केच दिले आहे ( पुढे मागे स्टॅन्डर्डाईझेड स्कोरीन्गही करता येईल गी आर ई सारखे !!)
यावर अजुन चर्चा करा येईल .... काय म्हणता ???

गुलमोहर: 

.

प्रगो..... चांगला विषय.....
अमित... खरंच गंभीर तेने घ्यायची गोष्ट आहे.... काही तरी स्टँडर्ड प्रोटोकॉल बनवू या...

समीक्षक दृष्टीकोन>>> अहो इथे सगळेच समिक्षेची गोळी खाउन येतात, कुणाकुणाचा दॄष्टीकोन बघायचा?
त्यात पुन्हा पेशल काव्यसमिक्षकांच्या आपापसातच मारामार्‍या आहेत, हझल-फझल-गझल करीत.
हे रँकिंग म्हणजे समस्येपेक्षा उपाय भयंकर होईल, नविन आलेल्या कविता नविन लेखनमधे न दिसता वेगळ्या पेजवर असाव्यात आणि ज्यांना वाचायच्यात त्यांनी तिथे जावे हा एक उपाय आहे.

अहो इथे सगळेच समिक्षेची गोळी खाउन येतात, कुणाकुणाचा दॄष्टीकोन बघायचा?

>>>

प्रत्येकाने त्याला काय वाट्ते हे ठरवुन १०० पैकी गुण द्यायचे ....

हे रँकिंग म्हणजे समस्येपेक्षा उपाय भयंकर होईल>>> मला तरी असे वाट्त नाही .... प्रतिसादात फक्त मार्क्स चा एक आकडा वाढेल इतकेच ...

ज्यांना वाचायच्यात त्यांनी तिथे जावे हा एक उपाय आहे.>>>> हे होत नाही . कोणी काहीच्या काही सदरात कविता टाकली असेल तरी ही लोक तिथे जावुन ज्ञान पाजळतातच

एक्झॅक्ट्ली डॉ,!!

आता उदाहरणार्थ :
बाप. http://www.maayboli.com/node/16671

ह्या कवितेवर माझा प्रतिसाद असा असेलः
१) विषयाची निवड/ हाताळणी/ अभिव्यक्ती =२०/२०
२)तान्त्रिक बाबी : छंद/ वृत्त/ गेयता =०/२०
३) भाषेची समृध्दता : किती छान अलंकार वापरलेत वगैरे वगैरे ...=१५/२०
४)समीक्षक दृष्टीकोन : = १२/२०
५) रसिक दृष्टीकोन =१८/२०

टोटल = ६५/१००

( केवळ उदाहरण म्हणुन घेतले आहे .....)

यामुळे खालील गोष्टी कश्या थांबतील ते कळले नाही.
१. येणार्‍या वाईटातल्या वाईट कविता कशा
२. प्रतिक्रियेवरून होणारे वाद-विवाद
३. एकमेकांना कच्चा-पक्का म्हणणे
४. एखाद्याची कविता आली की वैयक्तिक भांडणं घेऊन तिथे टोमणे मारत रहाणे

तसेच या गोष्टीमुळे कोणी कुणाला किती मार्क दिलेत ते सगळ्यांनाच दिसल्याने अजून तेढ वाढणे किंवा वाहवा वादी कंपू अजून घट्टपणे तयार होणे हे घडणार नाही असं काही वाटत नाहीये.

थोडक्यात साध्य काय करायचंय आणि ते कसं होईल या उपायातून हे मला तरी स्पष्ट दिसत नाही.

माबो वर वेळोवेळी काही वेगवेगळे उपक्रम राबवले गेले आहेत यापूर्वीही. ते बंद पडायची वेगवेगळी कारणे होतीच. पण उपक्रमांसकट किंवा शिवायही आप, जिगा, निउ अश्यासारख्या लोकांना आळा कधीच बसला नाही. बसू शकणार नाही.

याचे सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे माबो या व्यासपीठाचा मुक्तपणा. आता हा मुक्तपणाच माबोची सगळ्यात मोठी ताकदही आहे तेव्हा त्याबरोबर येणारं वाईट आपल्याला झेलणे भाग आहे.

तुम्ही जे जे प्रयोग केलेत (स्पष्ट टिका ते टवाळी ते अनुल्लेख.. सर्व) पूर्वी वेळोवेळी इथल्या सदस्यांनी करून बघितलेच आहेत. ज्यांच्याबाबतीत केले गेले त्यातले काही खरंच सुधारून चांगलं लिहू लागले, काही पळून गेले आणि काही न थांबता वाईटच लिहीत राह्यले.

असो तरीही एक चाचणीवजा हा उपक्रम राबवायचा असेल तर मी होईन सहभागी.

नीधप यांचं म्हणणं रास्त आहे......
मानांकनात कमी जरी असली/राहिली.. तरी ही कवी मंडळी ''तसलं'' काव्य प्रसवायची रहाणार नाही... वर उलट ही पद्धत कशी चुकीची आहे वगैरे बोलायला मोकळे......

सगळ्यात चांगली बाब मला अनुल्;लेख वाटतेय..... ह्या नवकवींपैकी काहींनी ''मनोगत'' वर सेम कविता पोस्ट केल्यायत पण त्यास एकही प्रतिसाद मिळाला नाही......त्यामुळे अजून नवीन नवीन कविता पोस्ट करणं थांबलं...

१०० मार्क्स बद्दल प्रयत्न करण्यास हरकत नाही.

तसेच हे मार्क देण्याने कवीला काही उपयोग होईल असेही मला वाटत नाही.
कधी कधी अतिशय सच्चेपणाने दिलेली प्रतिक्रिया कवीसाठी महत्वाची असते. कधी कधी रसग्रहणात्मक प्रतिक्रिया अनेकांसाठी महत्वाची ठरू शकते. हे माझ्याच अनुभवात इथे घडलेले आहे. मार्क सिस्टीम मुळे संवाद बंद होणार.
वादावर पडदा टाकण्यासाठी संवादच बंद करायचा हे मला तरी भले वाटत नाही.

मार्क्स देणे ही तशी फार ग्रेट आयडीया नाही पण अनुल्लेखापेक्षा चांगली आहे. त्यामुळे ते सोबत राहतील व सुधारणांसाठी प्रयत्न करतील. काही अंशी फरक पडतो (समीतीच्या प्रयत्नाने पडलेला)हे काही दिवसांपुर्वीच आपण पाहिले आहे.

खरं तर ह्या कवींना संवादांतुन काय चुकतंय हे सांगितलं गेलं... पण त्यांनी हेतुपुरस्सर त्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष केलं अन म्हणून हिणकस प्रतिक्रिया वाढत गेल्या.... आपलं काही चुकतंय हे मान्य करणं.. काही तरी शिकण्याची पुढची पायरी असते... पण यांची शिकण्याची इच्छाच दिसत नाही,म्हणून प्रगोने हा धागा काढला आहे.

गेल्या दहा वर्षात विविध प्रयत्न झाले जे अल्पगुणी आणि म्हणून अल्पायुषी ठरले.

जो सुधारणार असतो तो लिहित राहूनच सुधारतो. लिहिलेलं प्रकाशित करायचं की नाही करायचं की कुठलं करायचं हा ज्याच्या त्याच्या तारतम्याचा भाग आहे. आणि ते शिकवून येत नाही. तसेच सांगून शिकण्याच्या बाबतीत कोणाचा इगो कितीकाळपर्यंत शिकण्याची दारं बंद ठेवेल हा ज्याचा त्याचा भाग आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला एक समीकरण बनवता येणं मुश्कील आहे.

पण अनुल्लेख हा प्रकार आजवर तरी सगळ्यात जास्त परिणामकारक ठरलाय. (गेल्या १० वर्षात!).

निजलेल्या देहाला
साखरेचं वाण
चिंतेचं भस्म
निद्रेंतरी...................

शेषाची निद्रा
शांतीच आसन
श्रवण दिनाच
विचारांतरी...................

परिवर्तित कुस
जडावलेले नेत्र
प्रवास सुखाचा
स्वप्नांतरी.....................

एक सोनपरी
ठाव घेत
हास्य खुलवित
गालावरी.....................

विचारांची झुंबड
गोंधळाची वर्दळ
स्वप्नांचे भास
मध्यांतरी.........................

वर्तमानाचे चिंतन
भविष्याचे नियोजन
चित्रफितीत चल
डोळ्यासमोरी............

आ.प.ची ही कविता पहा....;.... देअर इज अ डिफरन्स

नीधपच्या प्रतिक्रिया फारच निराशावादी वाटत आहेत .( नो ऑफेन्स)

Numbers always create pressure !!

कॉलेजचे नॅक ने मानांकन करायला सुरवात झाल्या पासुन कॉलेजे बरीच सुधारली आहेत. बोगस कॉलेजेस येणे बंद नसेल झाले ...पण ....किमान प्रश्तापित कॉलेजेस ची तुलना तरी करता येते ....

तसेच कवितेच्या मानंकनात अपेक्षित आहे .
( नोट : इथे कवितेचे मानांकन म्हणले आहे , कवी चे नाही याकडे विषेश लक्ष द्यावे )

प्रसाद,
कॉलेजच्या नॅकशी तू सुचवतोयस त्या मानांकन पद्धतीची तुलना करु नकोस.... नॅकसाठी वेगळी कमिटी असते.... तसे जर इथे होणार असेल तर स्वागत आहे!
नाहीतर या कॉलेजेसना जर एकमेकांना मानांकने द्यायला सांगितले तर विचार कर काय होईल.

मॉडरेशन हा सगळ्यात उत्तम पर्याय..... मायबोलीच्या मुक्तपणाच्या तत्वात हे बसणार नाही पण दर्जा टिकवायचा असेल तर मॉडरेशन मस्ट आहे!
आणि काहीच करता येत नसेल तर कविता हा विभागच काही दिवस बंद ठेवा!

मॉडरेशन हा सगळ्यात उत्तम पर्याय..... मायबोलीच्या मुक्तपणाच्या तत्वात हे बसणार नाही पण दर्जा टिकवायचा असेल तर मॉडरेशन मस्ट आहे!
आणि काहीच करता येत नसेल तर कविता हा विभागच काही दिवस बंद ठेवा!

>>> कैच्याकै .....आतातायी सुचवणुक ......हे म्हण्जे सर्दी झालीये ना ....आता काही दिवस नाक बंद ठेवा असं म्हणण्या सारखं आहे Proud

प्रगो,
उपाय नक्की चांगला आहे,यामुळे आपला वेळ वाचेल ...
पण मार्क कुठे द्यायचे ...ते तरी सांगा !
Happy

केवळ आपले समाधान होईल या रेटिंगने...फारसा काही फरक नाही पडणार..... Sad

त्यापेक्षा अजुन एक पॉसिटिव्ह सुचना............
अरे चांगल्या कवितांचा एवढा भडिमार करुया की त्या एकमेकांच्या उकृष्ट कविता वाचताना आणि प्रतिसाद देताना आपले आपोआप या फालतु कवितांकडे दुर्लक्ष होईल........ Happy

त्याने आपणही थोडे मनावर घेऊन चांगले लिहुच की.........आणि नेहमी चांगले लिहिणारे थोडे थंडावलेसे वाटले की त्याना विपुत जाऊन छळायचे की काहितरी चांगले लिहा....... शेवटी चांगले देणार्‍यावर वाचकाचे पॉझिटिव्ह प्रेशर हवेच ना...... Lol

चांगल्या कविंना हेरुन त्यांना अधिक चांगले लिहायला लावुया........ मग हे सगळे तद्दन फालतु दुर्लक्षित होतिलच आणि हळु हळु बण्दही होतील्.....कदाचित......... !!!!!

मी नीधप शी सहमत आहे.

शिवाय, अशा पध्दतीचे नामांकन objevtive असले पाहिजे पण ते शक्य नाही. त्यातून अधिक वाद-विवाद होण्याचा संभव जास्त. एक रसिक म्हणून कविता चांगली-वाईट ठरवणे वेगळे आणि स्वतःकडे examiner चा रोल घेऊन कवितेला मार्कस देणे वेगळे.

खरंतर, वाईट कविता आली तर (ती अगदी खूप म्हणजे खूपच वाईट नसेल) तर त्यामुळे आणि त्यावरच्या प्रतिसादांमुळे भरपूर करमणूक होते. विरंगुळातील कुठल्याही सदरापेक्षा जास्त! Happy

प्रसाद,
मान्य आहे की उपाय टोकाचा आहे....पण आजार पण मामुली नाहीये असे मला तरी वाटते!

मायबोलीवर पडणार्‍या बालिश कवितेच्या (?) रतीबाकडे पाहिल्यावर (काही अपवाद वगळता) असे वाटते की हे अपरिहार्य आहे!

आणि या कविता ज्यांना दर्जेदार वाटतात त्यांनी जरा जुन्या हितगुजवर जाउन गुलमोहर अर्काइव्ह वाचा म्हणजे दर्जातील घसरण लक्षात येईल!

कविता करत असतो तर बोम्बीशी लग्न केले असते की नाही, ते मस ठाऊक नाही. पण बोम्बीला मानान्कन नि नामान्कन करण्याची आमच्या पिताश्रीन्ची देखील हिम्मत राहिलेली नाही. कुणी तिला डिस्टिन्ग्शात गुणान्कन केले तर ती एखादे वेळी खुश होईलही, पण 'मी बोम्बीला फक्त चाळीस गुण देणार, आणि हे माझे गुणान्कन बरोबरच आहे' असा कुणी आग्रह धरला, तर मात्र ती त्या गुणान्सकट त्यास फाट्यावर मारेल. या उलट मी सत्यनारायणाची पूजा सान्गितल्यानन्तर मुठभर गहु-तान्दुळ मिळाले तर यजमानान्ना 'भिक्कारी मेले!'; पसाभर मिळाले तर 'आत्ता ठीक हेत, पण लागतील भिकेस काही दिवसात'; केळी सफरचन्दादि फळे मिळाली तर 'ठीक आहे, बन्गला दिसायलाच आहे फक्त! काजू बदाम काय हे खातच नसतील काय?' आणि मुठभर काजू बदाम मिळाले तर 'बरे आहेत, पण यजमानीन बाईन्चा हात काय सुटत नाही मोकळा!' असे मुक्ताफळान्कन मिळते. तिकडे यजमान कुणी धोतरातले, कुणी पॅन्टीतले, कुणी ओवळ्यातले तर कुणी सोवळ्यातले- ते बोम्ब्या भटास 'हावरट मेला!' पासून 'पोथीत कसे अगदी लक्षच नसते बोम्ब्याचे. दक्षिणा मात्र तोन्ड पसरून मागायला मोकळा!' असे निरनिराळ्या पातळीवरचे गुणान्कन करतात ते निराळेच. काय करावे बोम्ब्या भटाने? बोम्बी म्हणते ते काय खोटे नाही. ती नेहेमी ठोठो बोम्बलत असते- पोथी ऐकताना नीट मान्डि घालून बसावे, पूजा करताना कमीत कमी उअपरणे खान्द्याडोक्यावर घ्यावे हे ज्या यजमानान्ना कळत नाही ते कसले करणार डोम्बलाचे मानान्कन? कुणी काही म्हणू देत. आपले गुणान्कन आपण करावे, नि लायकी-बियकीचा विचार न करता वट्ट खोळ भरून काजू बदाम मागावेत. बाकी गुणान्कन नि मानान्कन गेले उडत. कसे?

कुणाची कविता वाचून त्या कवितेला गुण द्यायची माझी लायकी आहे असे मला खरेच वाटत नाही...कविता आवडली की नाही, आवडली किंवा नाही तर का? काही खूप आवडले किंवा काही खटकले का ते सांगता येईल...ज्यांच्या कविता आवडतात त्यांच्या एखाद्या कवितेतले काही खटकले तर ते बहुधा विपुमधे जाऊन मी नोंदवतो.
पुन्हा हे मानांकन तटस्थपणे दिले/घेतले जाईल का? याबाबतही शंकाच आहे.
मागे इथे भेटवस्तू देण्याघेण्यातल्या व्यवहाराबद्दल चर्चा वाचली होती, तेच या मानांकनातही होणार नाही का?

मानांकन करायचे म्हटले तर प्रत्येकाचे निकष वेगळे असू शकतात.(अर्थात चर्चेपुरतेच म्हणतो आहे, इथे प्रसाद यांनी मांडलेल्या निकषांवर टिप्पण्णी करताना ते मत खोडून काढायचा हेतू नाही.
१) विषयाची निवड/ हाताळणी/ अभिव्यक्ती : विषय निवडून कविता करता येतही असेल, पण तो विषय तुम्हाला निवडून सांगतो , लिही मला त्यातली मजा आगळीच.
विषय किती नावीन्यपूर्ण आहे, सनातन (जसे प्रेम/निसर्ग) तर अभिव्यक्ती विषयाला अनुरूप आहे का?
२)तान्त्रिक बाबी : छंद/ वृत्त/ गेयता =२० . यात पुन्हा मुक्तछंदाला कविता मानले गेलेच नाही (० गुण?) तर बाकीचे ८० पैकी गुण तरी का आणि कसे द्यावेत.
मयुरेशची बाप किंवा पेशवा यांची विस्फोटानंतर या कवितेला २० पैकी ० गुण?

त्याऐवजी इथे शुद्धलेखनाचा अंतर्भाव करता येईल. वृत्तात बसवलेल्या कवितेत किती ठिकाणी झटापट करावी लागली,
३) भाषेची समृध्दता : किती छान अलंकार वापरलेत वगैरे वगैरे ...=२०
४)समीक्षक दृष्टीकोन : = २० (हा कशाशी खातात?- समीक्षा लेखनच मी मुळात खूप कमी वाचलेय. वृत्तपत्रात येणारे पुस्तक परीक्षण ही समीक्षा मानायची?)
५) रसिक दृष्टीकोन =२० (समीक्षक हा आस्वादक असू शकत नाही का?)

तांत्रिक बाबी आणि भाषेची समृद्धता या अनुषंगिक बाबी आहेत, त्यांना विषय, आशय अभिव्यक्ती यांच्या इतकेच वेटेज? समजा मी वृत्तात बसणारी आणि अलंकारयुक्त कविता लिहिली पण त्याचा विषय हा कविता लिहायच्या लायकीचाच नसेल, किंवा काहीच लिहायच्या लायकीचा नसेल तर मला ४० गुण तसेच देऊन पास करणार?

शेवटचे, हे आ.प., जि.गा., नि.उ इ.च्या कवितावरून करावेसे वाटले असेल तर तेही
इतरांच्या कवितांना मानांकने देतील. आताच त्यांच्या कवितांना नावे ठेवणार्‍यांच्या कवितांना 'यात यमक कुठे आहे' वगैरे (उसन्या घेतलेल्या )लाल शाईने ताशेरे द्यायला त्यांनी सुरुवात केली आहे.

Pages