महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-
तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-
नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-
कै.श्री.सरला भिडे ह्या माझ्या आईच्या गुरु. त्यांनी साधारण तीस-बत्तीस वर्षांपूर्वी हे गाणं आईला शिकवले. मात्र गाण्याचे धॄवपद आणि पहिले कडवेच शिकवले गेले होते. हे गाणं आम्हाला शिकवताना आईने दुसरे कडवे स्वत: रचून त्याला चाल लावली. ह्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार कोण हे आम्हाला माहित नाही आणि सरलाबाईंनी शिकवल्यावर इतक्या वर्षांत ह्याची रेकॉर्डही कधी ऐकलेली नाही.
हे गाणे मी अगदी घरगुती स्वरुपात फक्त इलेक्ट्रॉनिक तानपुरा लावून गायले आहे.
गणरायाच्या कॄपेनेच लाभलेलं हे स्वरपुष्प त्याच्या चरणी अर्पण करते !
मस्तच म्हटलयंस..सुरुवातीचा
मस्तच म्हटलयंस..सुरुवातीचा आलाप फारच छान घेतलास. रियाज करत रहा आणि अशीच गात रहा.
अहाहा. अगो , काय सुरेख गायली
अहाहा. अगो , काय सुरेख गायली आहेस गं. मस्त. गात रहा. फार सुंदर आवाज आहे तुझा.
तुझा आवाज पहिल्यांदाच ऐकला
तुझा आवाज पहिल्यांदाच ऐकला आज. खुप आवडल तुझं गाणं, तुझा आवाज सुरेख आहे.
सही आहे गाणं अगो ! तुझा आवाज
सही आहे गाणं अगो !
तुझा आवाज एकदम शास्त्रीय गायिकेसारखा आहे. जोरदार, दमदार
इथे एक वाद्यवृंद सेक्शन काढून तू, मो, झारा, स्वाती, योग वगैरे मंडळींची गाणी रेग्युलरली अपलोड केली पाहिजेत.
अगो, खूप खूप छान गाणं!!! तुझा
अगो, खूप खूप छान गाणं!!! तुझा आवाजही फार गोड आहे
वा वा! अतिशय सुंदर! परागला
वा वा! अतिशय सुंदर!
परागला अनुमोदन!
खूपच सुरेख म्हटलं आहेस गं,गात
खूपच सुरेख म्हटलं आहेस गं,गात रहा ,जमेल तेव्हा जरूर ऐकवत रहा इथे.
सुंदर गायली आहेस अगो.
सुंदर गायली आहेस अगो.
अगो, सुंदर आवाज आहे तुझा.
अगो, सुंदर आवाज आहे तुझा. एकदम प्रसन्न वाटलं गाणं ऐकून
मस्तच झालय गाणं अगो.
मस्तच झालय गाणं अगो.
अर्रे वा! सुंदर म्हटलंयस!
अर्रे वा! सुंदर म्हटलंयस!

सूर आणि उच्चार - दोन्ही किती स्वच्छ आणि नेमके लागलेत!
मस्त अगो. आताच पाहिलं हे. मी
मस्त अगो. आताच पाहिलं हे.
मी वेगळ्या चालीतलं शिकले होते.
खुप छान गायलेय!!
खुप छान गायलेय!!
मस्तच अगो!
मस्तच अगो!
खुप सुंदर!!
खुप सुंदर!!
वा! सूर आणि उच्चार नेमके -
वा! सूर आणि उच्चार नेमके - स्वातीशी सहमत.
अरे वा! अगो, तुझा आणखी एक
अरे वा! अगो, तुझा आणखी एक पैलू.
खुप छान गायलीस अगो! आवाज पण
खुप छान गायलीस अगो! आवाज पण छान आहे तुझा!
वा अतिशय सुंदर गाणं आणि तितकच
वा अतिशय सुंदर गाणं आणि तितकच सुंदर गायलय सुद्धा
सुंदर! छान आवाज आहे तुझा.
सुंदर! छान आवाज आहे तुझा. गाणं पण सुरेख आहे.
विलक्षण गोडवा आहे तुझ्या
विलक्षण गोडवा आहे तुझ्या गळ्यात! किती सुंदर गायली आहेस..... फारच छान!
वा...! अश्विनी...! खूपच मस्त
वा...! अश्विनी...! खूपच मस्त गातेस गं..!
मस्तच ! एकदम सुरेख आवाज !!
मस्तच ! एकदम सुरेख आवाज !!
अतिशय सुंदर आणि सुरेल !!
अतिशय सुंदर आणि सुरेल !!
अहाहा! श्रवणीय! अगो, नवीन
अहाहा! श्रवणीय! अगो, नवीन गाणं इतकं सुंदर ऐकवलंस त्याबद्दल धन्यवाद. आईने रचलेले दुसरे कडवेही सुरेख. व्वाह!
खूप सुंदर गायलंयस अगो शांत,
खूप सुंदर गायलंयस अगो
शांत, स्पष्ट आणि पवित्र असं.
अगो फार छान गायलं आहेस आणि
अगो फार छान गायलं आहेस आणि गाणंही छान आहे.
मस्त . आवाज सुरेख आहे ग तुझा.
मस्त . आवाज सुरेख आहे ग तुझा. अजून गाणी ऐकायला आवडतील.
अगं किती छान गातेस
अगं किती छान गातेस तू....प्लीज गणपतीत डॅलसला गा...
अतिशय सुरेल आणि गोऽऽड
अतिशय सुरेल आणि गोऽऽड गायलंय!
केवळ तानपुर्याच्या साथीत गाऊनही कुठे काही कमी नाही वाटलं.
अगो, तुझ्या आवाजात जादू आहे.
Pages