... पण उशीर झालेला असतो

Submitted by सुनिल जोग on 24 August, 2010 - 23:06

काल असाच एकटा विचार करत बसलो होतो, प्लेअरवर एक झकास पहाडी धून वाजत होती मन प्रसन्न होत होते आणि आठवले की लहानपणी आपण काही दिवस सतार शिकायला जात होतो पण रियाजाचा कंटाळा आणि काही करून दाखवण्याची उर्मी कमी असल्यामुळे मागे पडलो आणि मग शिकायचे राहून गेले आता हळहळ वाटत होती.
....पण उशीर झालेला होता. आता वेळ नाही.शिकायला मेंदू उशीर करतो वगैरे...
तसंच पालकांनी कानीकपाळी सांगितलेलं असतं अभ्यास कर मोठा हो काहीतरी करुन दाखव..
पण झोपण्याने मनाचा पूर्ण ताबा घेतलेला असतो
काही दशकानी शेजारचा अमित भेटतो.. एका मल्टिन्याशनल मधे एशिया रिजनचा हेड असतो तेंव्हा आईवडीलच बरोबर होते हे पटते
....पण उशीर झालेला असतो.
खूप वेळा व्यायाम करायचा असतो. काही दिवस जिम पण लाउन झालेली असते पण पावसाळा येतो,सर्दीचे निमित्त होते आणि आपण सलमान काही होत नाही. बी.पी. चेक केल्यावर डॉ.सांगतात थोडा व्यायाम केलात तर बरे व्हाल. आता आठवण येते अरेच्या आपण कधिकाळी जिम चा विचार केला होता की.
... पण उशीर झालेला असतो.
कॉलेजमधे कुणावर मरत असतो पण सांगायचा धीर नस्तो. ती मुलाला पोचवायला शाळेत भेटते. आपल्याकडे बघुन गोड हसते. आपण आपआपल्या मुलांची ओळख करून देतो. कालांतराने आपण 'तो' विषय काढतो. ती खळाळून हसते आणि म्हणते .. ' मी खूप वाट पाहीली पण तू काही प्रपोझ केले नाहीस मग काय करणार पम्याला पटवले"
... पण उशीर झालेला असतो.
बर्‍याच गोष्टी आपण मनातल्या मनात ठरवत असतो पण वेळच्या वेळी करत नसतो
आणि म्हणूनच उशीर झालेला असतो.
आणि म्हणूनच मनात असलेल्या गोष्टी आत्ताच्या आत्ता करून टाका
नाहीतर खूप उशीर झालेला असेल गड्यानों!

गुलमोहर: 

खरय सुनीलभाऊ....
असं बर्‍याचदा होतं...!
बारावी झाल्यावर पुण्याला अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घायचं ठरवलं होतं. (त्यासाठी आधी फाऊंडेशनही केलेलं होतं) फाईन आर्ट मध्ये करिअर करायचं होतं. पण घरच्यांच्या आग्रहाला बळी पडलो. इंजीनीअर झालो. आता वाटत्ण जर त्यावेळी मोह टाळला असता तर...... Sad